नाडी ज्योतिष , Nadi Jyotish

91 views
Skip to first unread message

Barves BK

unread,
Apr 19, 2020, 6:58:37 AM4/19/20
to VSNL VRS, golde...@googlegroups.com, BK India, makar...@gmail.com
Here is an interesting email I received on whatsapp from some one originated by  Shri Makarand Karandikar.
I do not know him personally but will thank him for this contribution.
My friends ( like my OCS friend..VRS) having Agasti Gotra would be very proud..
Please see this mail.
Thanks
Dnyaneshwar Barve (Gyani)
Whatsapp..9225562956
---------------------
नाडी ज्योतिषाची " नाडी परीक्षा " ! भविष्य का चुकते ?

                                           नाडी ज्योतिष हा एक अजब प्रकार आहे असे ऐकलं होते. मला हे अत्यंत अविश्वसनीय वाटल्याने प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कांही बोलायचे नाही असे ठरवून मी त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवीत राहिलो. 

                        आपल्या प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये सूर्य. चंद्र,शनी, मंगळ इत्यादी ग्रहतारे  हे ब्रह्मांडामध्ये सहज वावरत असून ते कुठेही, अगदी पृथ्वीवरसुद्धा, प्रकट झाल्याच्या कथा आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोचणे, उतरणे अशा गोष्टींचा विचारही केलेला नाही. त्यांच्या गती आणि स्थितीमुळे  विश्वात घडणारे बदल, परिणाम यांचा अभ्यास करून, माणसाचे आयुष्य कसे सुखी होईल याचा ऋषी मुनींनी, हजारो वर्षे अभ्यास केला होता. अशाच विविध प्रकारच्या आणि ठिकाणांच्या अभ्यासामुळे हातावरील रेषा, कुंडली, अंगलक्षणे, अंगावरील तीळ / जन्मखुणा, हस्ताक्षर, माणसाची सावली इत्यादी अनेक गोष्टींवरून माणसाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणून घेण्याच्या शाखा अस्तित्वात आल्या. कवड्या, फासे, रुद्राक्ष यांच्या साहाय्यानेही भविष्यात घडणाऱ्या
गोष्टींचा वेध घेतला जाऊ लागला. अनेक ऋषींना त्यांच्या ध्यानावस्थेत काही गोष्टी दिसत असत. भविष्यात येणारे संकट, अरिष्ट आधीच जाणून घेऊन ते टाळता यावे  किंवा त्यापासून होणारे संभाव्य नुकसान कमी करता यावे हाच  या सगळ्याचा उद्देश होता. पाश्चात्य विज्ञान हेच फक्त विज्ञान असे आपण नक्की करण्याआधी, आपल्या देशात हेच विज्ञान मानले जात होते हे लक्षात घ्यायला हवे. 

                                               नाडी ज्योतिष आणि अनेक गोष्टी,  हजारो वर्षांपूर्वी अगस्ती या ऋषींनी, हजारो भूर्जपत्रांवर थमीझ या प्राचीन तामिळ लिपीमध्ये लिहून ठेवल्या आहेत . अगस्ती ऋषींप्रमाणेच विविध ऋषींनी निर्माण केल्लेल्या अनेक नाडी ज्योतिष संहिता भारतभर प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूमधील वैतीश्वर मंदिराच्या परिसरात, या भूर्जपत्रांवर लिहिलेल्या मजकुरावर आधारलेले ज्योतिष सांगणारे शेकडो नाडी प्रपाठक, हजारो वर्षे अस्तित्वात होते. इंग्रजी अंमल सुरु झाल्यावर त्यांना या गोष्टी समजल्या. भारतातील प्रचलित शिक्षणपद्धत , वैद्यकशास्त्र, नक्षत्र / ज्योतिष शास्त्र, अशा अत्यंत प्रगत गोष्टी नष्ट केल्याशिवाय येथे इंग्रजी शासन रुजणार नाही हे पक्के ठाऊक असलेले मेकॉले सारखे असंख्य विद्वान होते.  यातील औषध, रसायन, वनस्पती शास्त्र, हवामान शास्त्र अशा महत्वाच्या विषयांवरील भूर्जपत्रे त्यांनी आपल्या देशात नेली आणि इकडे नष्ट झाली असे जाहीर केले. आणि आपण पहिलेच आहे की  योगायोगाने त्या नंतर तिकडे ब्रिटिश विद्वानांनी किती महत्वाचे शोध लावले ! 
                               
                                        हे नाडी ज्योतिष जाणून घेण्यासाठी तुम्हाला नाडी प्रपाठकाकडे ( Nadi Reader ) कडे जाऊन त्याला तुमच्या नावाचे इंग्रजी पहिले अक्षर आणि अंगठ्याचा  ( पुरुषाच्या उजव्या आणि स्त्रीच्या डाव्या हाताचा ) ठसा द्यावा लागतो. अन्य कसलाही तपशील द्यावा लागत नाही. त्यानंतर एवढ्याच दोन गोष्टींवरून आपल्याशी संबंधित भूर्जपत्राची पट्टी ( साधारणतः ३ इंच x  ८ .- १० इंच आकाराची ) शोधली जाते. समजा  कांही कारणाने ती पट्टी मिळावी नाही तर आपल्याला कांही दिवसानंतर येण्यास सांगितले जाते. पट्टी सापडल्यावर सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न विचारून ती पट्टी आपलीच आहे ना याची खात्री करून घेतली जाते. त्यानंतर आपला भूतकाळ सांगितला  जातो. नंतर भविष्यातील कांही गोष्टी कथन केल्या जातात. हे सर्व कथन, २/२, ४/४ ओळींमध्ये , नाडी प्रपाठक जुन्या तामिळ भाषेत वाचतो. तुम्हाला कांहीच समजत नसते पण त्याच्या शेजारीच बसलेला दुभाष्या ते लगेच इंग्रजी किंवा हिंदीत भाषांतर करून तुम्हाला सांगत जातो. ते तेथेच एका टेपवर / पेनड्राइव्हवर रेकॉर्ड करून त्याची सीडी तुम्हाला दिली जाते. 

                                          हे मला बरेचसे अतर्क्य वाटल्याने मी त्याची पूर्णपणे परीक्षा घ्यायची ठरविली. थोडी आत्मस्तुती आहे पण एक गोष्ट स्पष्ट करतो की मी विज्ञान आणि कायदा या दोन्हीही शाखांचा पदवीधर आहे. दोन्हीही शाखांमध्ये प्रमाण, पुरावे, सत्य स्थिती काय आहे यालाच महत्व असते. त्यामुळे वस्तुस्थिती कडकपणे तपासायची पण खरेपणा आढळल्यास मात्र, माझी विज्ञाननिष्ठा शाबीत करण्यासाठी सत्य नाकारायचे नाही, असे मी ठरविले. माझ्या अंगठ्याचा ठसा आणि नावाचे फक्त पहिले एक अक्षर दिल्यानंतर माझ्याशी संबंधित पट्टी शोधण्यात आली. नंतर नाडी प्रपाठकाने एक श्लोक म्हणून देवाला हात जोडले आणि पट्ट्यांचा एक जुडगा त्याच्यासमोर ठेवून मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला १ बहीण आहे का ? मी दिलेली उत्तरे कंसात ( नाही ), माझ्या प्रत्येक नकारानंतर ती पट्टी उलटून पुढच्या पट्टीच्या आधारे पुढचा प्रश्न. २ भाऊ आहेत का ? ( नाही ) पुढची पट्टी, तुम्ही ३ भावंडे का ? ( नाही ). तुम्ही २ भाऊ आणि २ बहिणी आहेत का ? ( हो ). त्याच पट्टीवरून, तुमचे आईवडील हयात आहेत का ? ( नाही ). पुढची पट्टी, दोघंही दिवंगत का ? ( हो ). त्याच पट्टीवरून, तुमच्या पत्नीचे नाव xxx आहे का ?  ( नाही ). पुढची पट्टी, भावंडांमध्ये तुम्ही सर्वात ज्येष्ठ का ?  ( हो ). त्याच पट्टीवरून पुढे- तुमच्या पत्नीच्या नावाचे पहिले अक्षर  X हे आहे का ?  ( हो ). तुमचे नाव मार्कंड का ? मी म्हटले तुम्ही पुन्हा चेक करा. तो म्हणाला सॉरी, मकरंद का ? हो. इतकी प्रश्नोत्तरे होईपर्यंत मी कुठेही, कुणालाही माझे साधे नाव, आडनाव, राहण्याचे ठिकाण, टेलिफोन / मोबाईल क्रमांक सुद्धा सांगितला  नव्हता. पण नंतर त्याने पुढचे वाचन सुरु केले. बाजूची टेपिंगची यंत्रणा चालू केली. त्याने माझ्या आयुष्यातील आणि माझ्या जवळच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये एकापाठोपाठ एक कथन सुरु केले. सर्व गोष्टी अत्यंत अचूक सांगितल्या. फक्त मलाच माहिती असलेल्या अनेक गोष्टी त्याने मला तपशीलवार सांगितल्या. आत्ता  माझ्या आयुष्यात काय संकटे आली आहेत त्यांचे स्वरूप आणि मी त्याला त्याच्यावर जमल्यास उपायही विचारणार असल्याचेही त्यानेच सांगितले. आता हे सत्य कसे नाकारायचे ? त्यावरील उपाय म्हणून त्याने मला फक्त कांही पूजा, देवदर्शन, दान हेच सांगितले. ज्यातून त्यालाच पैसे मिळतील अशी शंका निर्माण झाली असती असे  प्रचंड खर्चाचे विधी, पूजा कुणाकडे करा, दान कुणाला करा, अंगठ्या खडे घाला असले  सल्लेही त्याने दिले नाहीत. 

                                याबद्दल मी आणखी कांही माहिती काढली तेव्हा असे कळले की आपले  नाडी ज्योतिष पाहायला अनेक  विदेशी माणसे येऊन जातात. त्यांनाही त्याचे नाव, गाव ,व्यवसाय कसा सांगितला जाऊ शकतो ? शेअरचा धंदा, कॉम्पुटर या गोष्टींची त्याकाळी काहीही कल्पनाही नव्हती त्यागोष्टी बऱ्याचशा बरोबर सांगितल्या जातात.  

                                 मग असे वाटते की नॉस्ट्राडेमीसने लिहिलेल्या, भविष्य कथन करणाऱ्या सेंचुरीजवर  हजारो लेख, हजारो पुस्तके. त्यांच्या लाखो प्रति, चित्रपट, टेलिफिल्म्स  / माहिती पट निघतात. मग इतक्या जुन्या आमच्या भारतीय शास्त्राची कुचेष्टा / उपेक्षा  कशासाठी ? इंग्रजी शासकांनी त्यांची पकड ढिली होऊ नये म्हणून आपल्या शास्त्रांची, प्रथांची, संस्कृतीची टिंगल केली. त्याची कागदपत्रे चोरून आपल्या देशात नेली. इथल्या भवानी तलवारीपासून ते कोहिनुर हिऱ्यापर्यंत लाखो गोष्टी आपल्या देशात ( लुटून ) नेल्या. तरीही इतके ज्ञान आपल्याकडे शिल्लक आहे. त्याचा रीतसर अभ्यास करून, संशोधन करून, शहानिशा करून, आवश्यकता पडल्यास सुसंगत सुधारणा करायला काय हरकत आहे ? " आम्ही सांगू तेच ज्ञान आणि आम्ही सांगू त्या अंधश्रद्धा " ही  "बळा"वत  चाललेली वृत्ती आपलेच नुकसान करणारी आहे. 

                                         मग अनेक भविष्यवेत्त्यांनी वर्तविलेली भविष्ये चुकतात कशी ? .... अनेकदा हे कथन करणाऱ्या व्यक्तींचा पुरेसा अभ्यासच नसतो. केवळ पैशाच्या लोभाने ते समोरच्याला खुश करून आणखी पैसे मिळविण्यासाठी कांहीही सांगतात. मुगल आणि ब्रिटिश या परक्या आणि भारतीय संस्कृतीचा द्वेष करणाऱ्या आक्रमकांमुळे यातील अनेक शास्त्रांचा अभ्यास आणि प्रगती थांबली. तथाकथित आणि आक्रस्ताळ्या बद्धिवादी, सुधारणावादी, विज्ञानवादी लोकांमुळे याचे अभ्यासकही बॅकफूटवर राहिले. 

                                        सर्वात महत्वाचे म्हणजे-- तुमची जन्मपत्रिका अचूक असेल तर त्यातील ग्रहस्थिती ही तुमचे जन्म घेताना असलेले गुण दाखविणारे प्रगतीपुस्तक असते. त्यावरून तुमचे आयुष्य कसे असू शकेल याचे केवळ अनुमान करता येते. पण तसेच अचूक घडत नाही.कारण ते तुमचे भविष्य नसतेच मुळी ! तुमच्या आयुष्यात चांगल्या  कर्तृत्वाने तुम्हाला अनेक गोष्टी पूर्ण बदलता येतात. किंबहुना तेच करण्यासाठी तुम्ही जन्म घेतलेला असतो. आधीच्या इयत्तेतील वार्षिक परीक्षेचे प्रगतीपुस्तक हे तुमचे तोपर्यंतचे "कर्मफळ" दाखविते. पुढच्या इयत्तेत तुम्ही जोरदार अभ्यास करून सुवर्णपदकही जिंकू शकता. म्हणूनच अत्यंत अशिक्षित, गरीब आणि मागास भागात जन्मलेला माणूसही खूप मेहेनतीच्या जोरावर डॉक्टर, सनदी अधिकारी, वैज्ञानिक झालेला पाहायला मिळतो. रिक्षावाल्याची मुलगी  सिए, भांडीवाल्या  बाईचा मुलगा कलेक्टर, हमालाची मुलगी डॉक्टर झालेली आपण पाहतो. कर्माचे फळ सांगणारा कर्मविपाक सिद्धांत हा असा आहे आणि भविष्य चुकण्याचेही हेच कारण आहे. 

  आपण सर्वजण आता घरी बसलो आहोत तेव्हा आपल्याच एखाद्या प्राचीन शास्त्राबद्दल माहिती करून घेण्यासाठी म्हणून मी हा लेख लिहिला आहे. आपण कुठल्या ज्योतिष्याकडे जावे, कुठले विधी करावेत याचा सल्ला देण्याचा उद्देश नाही. मला स्वतःला आलेला अनुभव कथन केला आहे.माझे मत मांडले आहे. ज्याचा यावर विश्वास नाही त्याच्या मताचा मला आदर आहे पण तो त्याने कृपया इथे व्यक्त करू नये ही विनंती.  

( काही माहिती आणि चित्रे -- गुगल माहिती महाजालाच्या सौजन्याने ) 
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).

***** मकरंद करंदीकर.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages