A True Love Story....Kadhi Visru Naka

0 views
Skip to first unread message

vaibhav hode

unread,
Feb 6, 2011, 6:15:45 AM2/6/11
to friend...@googlegroups.com


> रविवार सकाळची वेळ होती,
> मी पेपर वाचा बसलो होतो;
> ती नुकतीच सुस्नात होऊन बाहेर आली,
> "चहा घेणार का तुम्ही?" असं मला म्हणाली;
> मी तिच्याकडे न बघताच "हो" म्हणालो,
> आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;
> माझ्या जवळून जाताना ती केसांना नाजूक झटका दिला,
> त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला;
> मी उगाच खट्याळ नजरेने पाहिले,
> तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;
> मी हळूच उठलो खुर्चीवरून आणि स्वयंपाकघरात आलो,
> तिन माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
> तिन मात्र मागे न बघताच चहाचं आधण  ठेवलं,
> आणि मग  मला चिडवण्यासाठी आपल नाक उडवलं;
> तिच्या पाठमोऱ्या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,
> उगाच तिला दुखावले म्हणून स्वतःच्याच मनाशी भांडलो;
> हळूच मग मागून जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला,
> पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागून हात माझा भाजला;
> मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
> चावटपानची  वेडी लहर मनात मग उठली;
> मी जखडले तिला मिठीत, "ती म्हणाली जाऊ द्या ना!"
> मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामावू दे ना!"
> ती लाजून म्हणाली "अहो असं काय करता? चहा उकळ्तोय !"
> मी म्हणालो "उकळू दे ! इथं माझा जीव जळतोय!"
> "अहो असं काय करता ? दुध उतून जाईल ना!"
> "कशाला काळजी करतेस मी परत आणून देईन ना! "
> ती उगाच कारण देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,
> तिला अजूनच जवळ घेत, माझ्या मनासारखा घडवत होतो;
> शेवटी तिन कारण दिल " अहो सिलींडरचा बहुतेक वास येतोय "
> मी म्हणालो " हो का! मला वाटले कि माझा चावटपणा अती होतोय "
> तेवढ्यात दाराची कडी वाजली,
> मी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली,
> तिन झटकन स्वतःला माझ्या तावडीतून सोडवून घेतलं,
> आणि हळूच मला धक्का मारून, स्वयंपाकघराबाहेर लोटलं;
> मी वैतागाने दार उघडलं समोर कचरावाला दिसला,
> माझा खांद्याशी ओला  झालेला शर्ट पाहून तो  पण गालात हसला;
> मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,
> पण मागेवळताक्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे,
> असं मला वाटल;
> पहिले मला  स्वयंपाकघरातून, दुध जळण्याचा वास आला,
> नंतर कान दणाणून सोडणारा , सिलींडरचा स्फोट झाला;
> मी धावत आत गेलो हृदयं धडधडत होते,
> माझ्या डोळ्यांदेखत तीच पातला आगीने फडफडत होत;
> मी तिला उचलून घेतलं, डोळे माझे फिरत होते;
> .
> .
> .
> .
> .
> .
> .
> .
> .
> .
> मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले,
> मला पाहून तिच्या ओठांवर, हास्य मग विलसले;
> ती म्हणाली मला, " एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना !"
> "मरण्यापूर्वी मला, तुम्च्यामध्ये सामावू द्या ना!"
> मी कवटाळले तिला उराशी, अन देवाचे स्मरण करू लागलो,
> ती वाचावी म्हणून, त्याची करुणा भाकू लागलो;
> पण दुध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता,
> आम्हा दोघांच अमर आलिंगन पाहून तिचा मृत्यूही रेंगाळला होता ...........
>
Regard From
http://images.orkut.com/orkut/photos/OgAAAMFzF3uq3okhHW8rZKuhLPBLNU32TEXRRwH4X6zdt5s0xzuCceo6pvS9833tHTzzh3YjMnDuJ3C1uVMNJQkUMQAAm1T1UJ0qzwEPOW61erPLWwy4WIsR7x1Q.jpg

Vaibhav Hode


Visit Blog : www.vaibhavhode.blogspot.com

see my video on you-tube channel: vaibhav9768



Reply all
Reply to author
Forward
0 new messages