Must read n share to others. I know madam personally so shared.
Thanks,
Dhananjay Shedbale
रुळलेल्या वाटेनं जाताना काहीतरी चुकतंय असं जाणवल्यानं थांबून, विचार करून मग काही वेगळी वाट धरणं, हेही विशेषच असतं. पण सगळं जग जातंय त्या रस्त्यानं न जाता, आपला असा एक मार्ग धरून; कसलाही अभिनिवेश न दाखवता, ठामपणे त्यावरून चालत राहणं हे तर जास्तच विशेष आहे! हेमा साने याचं जगणं अक्षरशः असंच आहे.
पुण्यात लक्ष्मी रोडपासून दोनेक मिनिटाच्या अंतरावर एक लहानशी देवराई म्हणावी अशी जागा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित काही लोकांना हे माहीत असणार. या ठिकाणी १९५१ सालापासून उगवलेलं एकही रोप किंवा गवताचं पातं कुणीही तोडलेलं नाही. गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख हेमा साने यांच्या घराबद्दलच बोलते आहे मी. आजूबाजूच्या आधुनिक, उंचच उंच झगमगाटी इमारतींच्या मध्येच एक दार आहे, ते त्यांच्याच वाड्याचं. आता वाडा शिल्लक नाही, समोर टोकाशी एक खोली आहे. शेजारी आड, त्यावर पाणी शेंदायचा रहाट. तिथे जाणार्या पायवाटेच्या आजूबाजूला लहानमोठी झाडंझुडपं, थोडं पुढे उंबराचं तीन मजल्याएवढं उंच झाड.वाड्यात डोकावताच, ‘‘या या, चार म्हणजे अगदी चारला आलात हो!’’ असं दिलखुलास स्वागत झालं. झाडाखाली कागद, पुस्तकांच्या गराड्यात बाई लिहित बसलेल्या होत्या. आमच्यासाठी खुर्च्या आणायला लगबगीनं त्या उठायला लागल्या, तेव्हा त्यांना कसंबसं थांबवून आम्ही पुढे झालो. बाहेर ती खेळणीवाली बसल्येय ना तिला सांगा खुर्च्या द्यायला, त्या हसत म्हणाल्या. आपल्या घरी कुणी आल्यावर त्याला बसायला द्यायला समोरच्या खेळणीवालीकडून खुर्ची मागून आणायची.. आम्ही मध्यमवर्गीय आवंढा गिळला. त्यांना ओळखणार्या कुणीतरी थोडी कल्पना आधी दिलेली होती, काही धक्के आपल्याला बसतात, ते आपल्या चौकटींमुळे, एरवी बाई अत्यंत साध्या, हसर्या आणि अगदी प्रेमळ आहेत.पण तरीही पहिला धक्का बसलाच. आम्ही एकमेकींकडे बघत पुढे झालो.
‘‘इथे केव्हापासून राहता?’’ आम्ही खास मुलाखतीला बसल्याच्या अभिनिवेशात सुरुवात केली. आमच्या सगळ्या प्रश्नांना अगदी सहज हसत, आमचं बुचकळ्यात पडणं निरखत बाईंनी मनमोकळी उत्तरं दिली. प्रश्न-उत्तरांपलीकडे जीवनातलं काही उत्तम, उदात्त आणि उन्नत असतं, ते इथे आहे; असा प्रकाश शेवटी जेव्हा डोक्यात पडायला लागला, तेव्हा बाहेरच्या अंधाराची जाणीव होऊन उठलो.
हेमा सानेंकडे मी काय शिकले, ते वाचकांपर्यंत पोचवता येईल का, ते काही मला आत्ताच सांगता येणार नाही. पण ते केवळ वर्णन - माहिती यापलीकडे जाणारं, आपल्याला नेणारं आहे, यात शंका नाही. हे सगळं काय आहे, सगळ्या शहरभर मोठाल्या इमारती, त्यातले फ्लॅट्स असं असताना हेमा सानेंचं हे असं घर, त्यात असतं तरी कसं, यासारख्या प्रश्नांच्या उत्तरांपासून बघू या.
सानेबाई लहान असल्यापासून इथं राहतात. त्या अकरा वर्षाच्या असताना महानगरपालिकेनं काही नियमांवर बोट ठेवून राहता वाडा पाडला. कोपर्यातली एक छोटीशी खोली फक्त शिल्लक राहिली. तिथंच आठ माणसांचं कुटुंब राहू लागलं. तेव्हापासून आजतागायत त्या तिथंच राहत आहेत. घरात तेव्हाही वीज नव्हती, आजही नाहीय. फोनही नाही. आडाचं तेच पाणी वापरतात. नियमित उपसा असल्यानं पाणी स्वच्छ आहे.
‘‘तुम्ही असं कमीतकमी साधनात जगायचं कधी ठरवलंत’’ यावर त्यांचं म्हणणं होतं,
‘‘मी ठरवून काहीच केलं नाही. आपण काही वेगळं करतोय असंही मला कधी वाटलं नाही. शिकायचं, शिकत राहायचं एवढं एकच लक्ष्य डोळ्यासमोर होतं. करीयर हा शब्दही तेव्हा माहीत नव्हता. सगळं सहज, आपोआप होत गेलं. काय करायचं ते जबाबदारीनं करा, एवढंच वडिलांचं म्हणणं होतं. अठ्ठावन साली नागपूरला मेडिकलला ऍडमिशनही मिळाली होती आणि जायची इच्छाही होती. पण त्या काळात खर्चाच्या दृष्टीनं ते अवघडच होतं. म्हणून मग बी.एस्सी. करायचं ठरवलं. एम.एस्सी. करताना काय विषय घ्यायचा, तो मैत्रिणींनी मिळून ठरवला- वनस्पतीशास्त्र. एम.एस्सी. झाल्यावर पैसे मिळवण्याची गरज होतीच. आबासाहेब गरवारे कॉलेजला पार्टटाइम डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी सहज मिळाली. ११० रु. पगार होता. तेव्हाची मुलंही साधी होती. माझ्या बाह्यरूपावरून आजची मुलं मला स्वीकारणार नाहीत. म्हणजे, मी बोलेपर्यंत. तेव्हाही अगदी सुरुवातीला थोडा त्रास झाला, नाही असं नाही. पण एकदा शिकवायला सुरुवात केल्यावर मग काहीच प्रश्न आला नाही. खरं म्हणजे आपण इतरांपेक्षा काही वेगळे आहोत, ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती. आमच्या आसपासचे शेजारी, माझ्या मैत्रिणी, सारेजण असं साधंच जगत. दोन कपडे घरातले, दोन बाहेर जायचे. तेवढं पुरेसं असायचं. नळाचं पाणी, वीज या काही जीवनावश्यक गोष्टी नाहीत. घरात वीज नसली तरी अभ्यास करता येतो. मी वनस्पतीशास्त्र या विषयात पीएचडी केलं, भारत-विद्या शास्त्रात एम. फिल केलं. माझं कधी अडलं नाही, अजूनही अडत नाही.’’
आमच्या मनात साहजिकच प्रश्न आला की नोकरी करायला लागल्यावर, आसपासची परिस्थिती बदलल्यावर आपण आपल्या राहणीत बदल करावा असं नाही का वाटलं? पण सानेबाईंचं म्हणणं, ‘‘शिकणं, शिकवणं यापलीकडे मी कधी कसला विचार केलाच नाही, करायची गरजच कधी वाटली नाही. चाललंय हे छान चाललंय, मग कशाला बदलायचं? इतर लोक राहतात तसं राहणं शक्य असताना, विचारपूर्वक तिकडे वळायचं नाही असं ठरवलंय- असं काही इथे घडलेलंच नाही. पण बदलावं असं कधी मनातच आलं नाही, हेच खरं. संजय सयानी म्हणून टाईम्स ऑव्ह इंडियाचा पत्रकार होता, त्यानं १९९७ मध्ये आमच्यावर अर्ध-पान लेख लिहिला, तेव्हा इतरांना आणि कदाचित आम्हालाही जाणीव झाली, की आपलं जगणं इतरांपेक्षा वेगळं आहे. इतर लोक कसे जगतात ते पाहताना, आपण जरा वेगळे वागतो असं मला दिसतं. पण खरं म्हणजे, आपल्या जगण्यात बदल का करायचे, ह्याचं कारणच मला आत्त्तापर्यंत कळलेलं नसल्यानं मी ही अशीच जगत आले आहे.’
‘‘मग शेजारी - विशेषतः मैत्रिणी केव्हा बदलल्या? कारण त्या काही तुमच्याइतकं साधं राहत नाहीत आता’’
‘‘खरं आहे, मुलंबाळं झाल्यावर त्या बदलल्या. मला तो प्रश्नच आला नाही. आपली प्रगती व्हायला पाहिजे असं वाटत होतंच. पण प्रगती म्हणजे काय?’’
ह्या प्रश्नावर चर्चा कसली करणार? कारण सानेबाईंनी न बोलताच दाखवलेलं आहे की प्रगती म्हणजे उपभोग नव्हे! घरातली सगळी कामं आवरून नोकरीवर जातानासुद्धा; घरात वीज नाही, त्यामुळे गैरसोय होते, असं त्यांना कधी वाटलं नाही - आजही वाटत नाही. त्यांच्या मते हा दृष्टीतला फरक आहे. त्या म्हणतात, ‘‘एवढी चांगली विहीर आहे, ती मला मारायची नाहीय. पाणी हलतं राहिलं पाहिजे. नाहीतर ते डासांचं ‘मॅटर्निटी होम’ होईल. आता ज्या निवळ्या ते पाणी स्वच्छ ठेवतात, त्या मग काही करू शकणार नाहीत. मग काय, ठीक आहे.. रोज दहा बादल्या पाणी काढायचं.’’
आता काय म्हणावं ह्या बाईंना, की त्यांना आपण काही म्हणायची गरज नाही? त्यांना नेमकं काय योग्य अयोग्य ते समजलेलं आहे, आपल्यालाच ते कळायला हवं आहे, आणि हे आपण स्वत:कडे पाहून समजून घ्यावं!
‘‘या घरात प्राण्यांचा मुक्त वावर आहे. पूर्वी पंधरा-सोळा मांजरं होती. दत्ताची आरती सुरू झाली की सगळी गोळा व्हायची, नैवेद्याच्या पेढ्यांच्या लालचीनं ! एक मुंगूस होतं. कावळे होते. पण मांजरं असल्यानं उंदीर नाहीत. सापही नाहीत. आजतागायत एकदाही मला साप दिसला नाही. पण लोकांना भीती वाटते. एक माणूस नेहमी विचारायचा की तुम्हाला भीती नाही का वाटत. मी त्याला म्हटलं, बाबा रे, मला ना, माणसांची भीती वाटते!’’
आणि ती भीती अनाठायी नाही हे दाखवणारा एक प्रसंगही त्यांनी सांगितला. बाईंच्या घराजवळ, एक कंपनी होती. त्यांचं विजेचं बिल सानेंच्या नावानं यायचं. वीजमंडळवाले बिल भरायला तगादा लावायचे. तुम्ही चोर आहात, खोटारडे आहात, असे आरोप करायचे. मीटर रीडिंग घेणारा माणूस रीडिंग त्या कंपनीच्या मीटरचंच घ्यायचा आणि बिल मात्र ह्यांच्याकडे यायचं. एक दिवस वीजमंडळवाले वीज तोडायला आले. बाईंच्या आई एकटयाच होत्या घरात. त्यांना म्हणाले ‘‘आजी, आम्ही तुमची वीज तोडायला आलोय.’’ तेव्हा त्या हसत म्हणाल्या, ‘‘हो का? मग आत्ता आधी तुम्ही वीज जोडा आणि मग संध्याकाळी ती तोडा. म्हणजे मला एक दिवस वीज वापरल्याचा आनंद मिळेल आणि तुम्हाला कोणाची तरी वीज तोडल्याचा!’’
इतक्या भरवस्तीत ह्या अशा घरात राहिल्यावर बिल्डर किती त्रास देत असतील ना? आमच्याच मनात खूप शंका आल्या. तसं असणारच. सानेबाई म्हणाल्या, ‘‘एकदा माझी आई एकटीच घरात होती आणि एक बिल्डर येऊन तिला- मी इतका ब्लॅक मनी देतो, इतका व्हाईट मनी देतो-म्हणाला हो. मग ती काय, तिनं त्याला थांबवलं आणि आत जाऊन मांजराची दोन पिल्लं खाकोटीला मारून आली. एक पिल्लू काळं, एक पांढरं. बिल्डरला दाखवलं-ही बघ, ही ब्लॅक मनी आणि ही व्हाईट मनी- सगळं आहे आमच्याकडे!’’
सानेबाई सहज बोलत होत्या. त्या बिल्डरचं बिचार्याचं काय बरं झालं असेल? त्यानं बाहेर जाऊन नक्की काय केलं असेल? त्या बिल्डरच्या मृताम्याबद्दल आमच्या मनात प्रगाढ सहानुभूती आहे! मृतात्म्यास ईश्वर शांती देवो!!
सानेबाईंबद्दल एकंदर काहीसा दबदबा आहेच. त्यांच्याबद्दल ऐकल्यावर त्यांच्याकडचं वातावरण गंभीर असेल असं कुणाला वाटेल, पण तसं अजिबात नाही. प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट साध्य केली, मिळवली की नकळत त्याबद्दलचा अहंकार आणि इतरांबद्दल एक थोडासा तुच्छभाव येतो, तो इथे जराही नाही. उलट ‘तुम्ही खरंच ग्रेट आहात. आम्ही अशा जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.’ असं म्हणताच बाई सहजपणे बोलून जातात, ‘‘हा तुमचा दोष नाही, सिस्टीमचा दोष आहे. तुम्ही जर माझ्यासारख्या वाढला असतात तर तुम्हीही माझ्यासारख्या झाला असतात.’’
त्या वनस्पतीशास्त्रविभागाच्या प्रमुख होत्या तेव्हा त्यांचे काही सहकारी म्हणायचे, ‘‘एवढ्या विभागप्रमुख असून आमच्या मॅडम झोपडीत राहतात.’’ सानेबाईंचं म्हणणं, ‘‘मी काय शिकले आहे, काय शिकवते हे बघून मला प्रमुख केलं ना? मी कुठे राहते हे बघून नाही.’’ बाईंना बीपी, डायबिटीस काहीही नाही. त्याचं म्हणणं, ‘‘ही मंडळी फ्लॅट, बंगल्यात राहणारी आहेत
--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Field Botany course07" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to field-botany-cou...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
शैलजा,छान लिहिले आहे.साने ह्यांचे खरे नाव "सोने" असायला हवे होते.त्या तेवढ्याच चोख आहेत.निर्भेळ अहेत.आणि खूप मौल्यवान अहेत.अनिल कुलकर्णी
2015-03-21 14:48 GMT+05:30 Shailaja Deshpande <shaila...@gmail.com>:
...
[Message clipped]