2 मिनीट लागतील , पण नक्की वाचा ।परळ भागातील प्रसिद्धटाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरीलफूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुणखाली उभ्या असलेल्या गर्दीकडे टक लावूनपाहत राहायचा. मृत्युच्या दारात उभंराहिल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावरीलदिसणारी ती भीती,त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्यानेहोणारी ती धावपळ पाहून तॊ तरुण खूपअस्वस्थ व्हायचा. बहुसंख्य रुग्ण बाहेगावाहूनआलेले गरीब लोक असायचे. कुठेकोणाला भेटायचे, काय करायचेहेही त्यांना ठाऊक नसायचे. औषधपाण्यासाठीच नव्हे तर त्यांच्याकडेजेवायलाही पैसे नसायचे. ते सारे दृश्य पाहूनतो तरुण खूप खिन्न मनाने घरी परतायचा.त्यांच्यासाठी आपणकाहीतरी करायला पाहिजे. रात्रंदिवसत्याने ह्याच विचाराचा ध्यास घेतला.आणि एक दिवस त्याने त्यातून मार्गकाढलाच. आपलं चांगलं चाललेलं हॉटेलत्याने भाड्याने दिलं. आणि काही पैसे उभेराहिल्यावर त्याने चक्कटाटा हॉस्पिटलच्या समोरअसलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावरआपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे२७ वर्षे अविरत सुरु राहीलयाची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती.कॅन्सरग्रस्त रुग्णांना अनत्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजनद्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातीलअसंख्य लोकांना आवडला.सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजनदेता देता शंभर, दोनशे, तीनशेअशी संख्या वाढू लागली तसे असंख्य हातत्यांच्या सोबतीला येऊ लागले.बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली.कधी हिवाळा,कधी उन्हाळा तरकधी मुंबईतला भयंकरपावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडूशकला नाही. तोपर्यंत दररोज मोफत भोजनघेणाऱ्यांची संख्या ७०० पार करून पुढेगेली होती. हरखचंद सावला एवढ करूनचथांबले नाहीत. त्यांनी गरजूरुग्णांना मोफत औषधपुरवायालाही सुरुवात केली.त्यासाठी त्यांनी औषधाची बँकचउघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट वतीन डॉक्टरांची अन सोशल वर्करची टीमचत्यांनी स्थापन केली. कॅन्सरग्रस्त बालरुग्णांसाठी त्यांनी टॉयबँकहि उघडली.आज त्यांनी स्थापन केलेला " जीवन ज्योत "ट्रस्ट ६० हून अधिक उपक्रम राबवत आहे. ५७वर्षीय हरिचंद सावला आजही त्याचउत्साहाने कार्यरत आहेत.त्यांच्या त्या अफाट उत्साहाला,त्यांच्या त्या प्रचंडकार्याला शतशः प्रणाम!२४ वर्षे क्रिकेट खेळून २००कसोटी आणि शेकडो एक दिवसीय सामनेखेळून १०० शतके अन ३० हजारधावा केल्या म्हणून सचिन तेंडूलकरला "देवत्व " रत्न बहाल करणारे आपल्या देशातकरोडो लोक आहेत. पण २७ वर्षात १०-१२लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अनत्यांच्या नातेवाईकाना दुपारचे भोजनमोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंदसावलाना मात्र कोणी ओळखतही नाही,आणि त्यांना देवही मानत नाही. हि आहेआपल्या देशातील मीडियाची कृपा.( विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रमकरूनही त्यांचा फोटोही सापडला नाही ).कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात,कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायकमंदिरात, कधी शिर्डीच्या साई मंदिरात,तर कधी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात.आणि नाही जमलंच तरजवळपासच्या मंदिरात जाउन देवाचा शोधघेणाऱ्या त्या करोडो भक्तांना देव कधीचसापडणार नाही.तो आपल्या आजूबाजूलाच असतो. पणआपल्याला मात्र त्याचा पत्ताच नसतो.आपण मात्र वेड्यासारखे कधी बापू,कधी महाराज, कधी बाबा म्हणूनत्यांच्या मागे पळत असतो. सगळे बाबा,महाराज, बापू अब्जाधीशहोतात,आणि आपल्या व्यथा, वेदना,आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत.गेल्या २७ वर्षात लाखो कॅन्सरग्रस्तरुग्णांना अनत्यांच्या नातेवाइकांना मात्र देवसापडला तो हरखचंद सावलाच्या रुपात.जसे चारोळी, कवीता, जोक, इतर बातम्या लगेच पुढे पाठविता तसेच हे सुध्दा सगळयांना पाठवा अशा माणसाचा सन्मान त्यांना प्रसिध्दि मिळाली पाहीजे। ।Please हां msg forward करा , कधी तरी हां msg त्या देव माणसा पर्यन्त पोहचेल । त्याला धन्यवाद द्यायला !!