आकाशभाऊ,
दंतेवाडा येथे एवढे मोठे काम चालू आहे हे पाहून खूप आनंद झाला. मी एमकेसीएलमधे कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. विषय शेती व अनुषंगिक सर्व.
महाराष्ट्र सरकारच्या ‘महालाभार्थी’ पोर्टलचे तसेच वनहक्क कायद्याची योग्य व त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी एक प्रोग्रामही आमची एक टीम बनवत आहे. त्याचा आराखडा बनवण्यासाठी नंदूरबार येथील एका गावात प्रोटोटाईप बनवण्याचे काम चालू आहे. दंतेवाडा पण आदिम भाग असल्याने आपल्यालाही पुढे उपयोगी पडू शकेल. त्यासाठी मी प्रयत्न करू शकेन.
आपण शहरात वाढून औद्योगिक संस्कृतीचा भाग बनल्याने बहुतेक सर्व गोष्टी व्यक्तिगत व आर्थिक मोजपटटीने मोजतो. छत्तीसगड खूप निसर्गसंमृद्ध भाग आहे. तेथील आदिम लोकांकडे आपण निसर्गस्नेही जीवन कसे जगता येईल हे शिकायच्या भावनेने जावे. त्यांच्या सामुहिक जीवनपद्धती, पारंपारिक ज्ञान व वनहक्क यांचा सन्मान करावा असे मला वाटते. आदिवासींवरील ऐतिहासिक अन्याय दूर होण्यासाठी त्यांचे जंगलांवर सामुहिक वनहक्क प्रस्थापित व्हायला हवेत. त्यासाठी आपण तंत्रज्ञानाने मदत केली पाहिजे. पण हे करताना, ते ‘आर्थिकदृष्ट्या गरीब’ असल्याने ‘मागास आहेत’ असे मानून, त्यांच्या निसर्गस्नेही, सामुहिक जीवनपद्धती व मुल्यांवर आपल्या कल्पनेतील आर्थिक व केवळ मानव केंद्रित विकासाची संकल्पना नं लादण्याची, आपल्या चांगल्या भावनेने केलेल्या कृतीतूनही ‘आहेरे- नाहीरे’ असा भेदभाव निर्माण नं होण्याची काळजी घेतली पाहिजे.
मी पुण्यात शेतकरी व ग्राहक यांच्यात सुरक्षित अन्न व त्याचे उत्पादन याबाबत जाणीव जागृती करणे, बाजार व्यवस्थेतील आवश्यक बदल, पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘नॉलेज पार्टनर’ ह्या नात्याने, (भीमथडी जत्रेत सुरु झालेल्या) अन्नदाता ह्या सुरक्षित अन्नाच्या लोकचळवळीमार्फत विविध व्यक्ती व संस्थाना जोडून काम करत आहे. आपल्याकडील उत्पादक गटाच्या गरजा भागवून शिल्लक मालाच्या विक्रीव्यवस्थेसाठी मी मदत करू शकेन.
शेतीमध्ये तेथील कृषी हवामानास व जीवन पद्धतीस अनुकूल आराखडे (मॉडेल) बनवण्यास मदत करू शकेन. कोरडवाहू फळझाडे, वनशेती, मधमाशापालन, आग्या मोहोळाचे जतन, मातीची घरे, आदी विषयातील साधनव्यक्तींना जोडता येईल. पारंपारिक बियाण्यासाठी संजय पाटील आपल्याला मदत करत असतीलच.
आपल्याला एमकेसीएल बरोबर जोडून घेऊन एकत्र काम करण्याची संधी मिळावी एवढीच सध्या तरी अपेक्षा आहे.
कळावे,
|
Thanks and Regards, |
|
|
|
T: +91-20-25631300 / 01 M: +91-9823066646
MKCL Knowledge Foundation |
--
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "Dry_Land_Farming" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to dry_land_farming+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.