Forwarded Msg. FYI.
---------- Forwarded message ----------
From:
vasant futane <sapress...@gmail.com>Date: 2017-12-14 11:16 GMT+05:30
Subject: विषमुक्त शेती मेळावा. ७ जानेवारी १८ , नागपूर.
सेंद्रिय/नैसर्गिक/शाश्वत इ. नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषमुक्त शेती पद्धतीचा प्रसार वेगाने होण्याची आज गरज आहे.त्यासाठी हा मुख्यतः शेतकऱ्यांसाठी मेळावा योजला आहे.
यंदा यवतमाळ जिल्ह्यात किटक नाशक फवारणी करतांना ४० पेक्षा जास्त जीव गेलेत. शेकडो कायमचे बाधित झालेत.सरकारने कंपन्या वर कार्यवाही करण्याची घोषणा केली पण तो थातूर मातुर प्रकार दिसतो.आता अनेक पुढारी शेतकरी हितार्थ मोर्चे यात्रा काढताहेत.मात्र इतर देशात बंदी असलेली जहाल किटक नाशके आपल्या देशात बंद करण्याची मागणी कोणी लाऊन धरतांना दिसत नाही.
शेतकऱ्याच्या पाठीवरचा विषाचा डबा (पंप) आधी उतरला पाहिजे . आज शेतकरी जात्यात आहे तर ग्राहक सुपात आहे. शेतातील विष ग्राहकांच्या ताटात जाणारच. या वास्तवाची जाणीव ग्राहकांना ही करून द्यावी लागेल.त्यासाठी हे आयोजन.
कृपया आपल्या परिसरातील शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोचवावी ही विनंती.
सोबत तपशील जोडला आहे.
विनीत
बिजोत्सव समूह, नागपूर
ता. क.- आपल्या सूचनांचे
स्वागत आहे.