ज्ञानेश्वरीवर प्रेम करणार्या सर्व बंधू/भगिनींना सादर प्रणाम
एक दोन आनंदाच्या बातम्या आहेत.
मध्यंतरी आम्ही ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय एकत्र पाठवण्याची जी गोल्डन स्कीम सुरू केली त्याला खूप लोकांचा प्रतिसाद आला. त्यातील जास्तीत जास्त लोकांना आम्ही ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय देण्याचा प्रयत्न केला. तरीही जर काही जण राहिले असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अशीच स्कीम आम्ही सादर करीत आहोत. तरी ज्यांना सर्व अध्याय एकत्रित हवे असतील त्यांनी कृपया आपला मेल आय डी edn...@gmail.com वर कळवावा. गेल्या वेळचा अनुभव असा की बहुतांश खाजगी कंपन्यांच्या मेलबॉक्समध्ये मेल्स पाठवताना अडचण येते. त्यामुळे gmail, yahoo, rediffmail अशा व्यक्तीगत मेल आयडींनाच या मेल्स पाठवण्यात येतील. कृपया नोंद घ्यावी व असे मेल आयडी कळवावे.
दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरीचे ऑडिओ खुप लोकांना आवडले. लोकांनी हे अध्याय आपल्या मोबाईलवर अपलोड करून त्यांचा आनंद स्वतः तर घेतलाच पण जातायेता अनेकांना दिला. पण नवव्या अध्याया नंतरचे ऑडिओ अपलोड करायला काही तांत्रिक अडचणी येत होत्या. माऊलींच्या कृपेने या अडचणीही सुटल्या असून आता संपूर्ण ज्ञानेश्वरी संगीत स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहे. तरी सर्व ज्ञानेश्वरी प्रेमींनी www.ednyaneshwari.com या संकेत स्थळाला भेट देऊन या शब्दसंगीताचा आनंद घ्यावा.
अधिक माहितीसाठी लिहा.
वाचकांकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी ही ज्ञानेश्वरी किमान दहा लोकांना द्यावी. तीही दहा तरूण मंडळींना. ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.
आज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.
ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.
आज आपल्यासाठी सादर आहे...
.।।अध्याय अठरावा।।.
मोक्षसंन्यासयोग
भाग पहिला
॥जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी ॥
आपल्या हातून हे कार्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असे मानून ही मेल सर्वत्र पाठवा.
सर्व अध्यायांसाठी वेबसाईटला भेट द्या:
आपले नम्र
Team eSahity Pratishthaan