अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३७. आनंदयोग |
![]() |
|
![]() |
![]() |
चैतन्य प्रेम, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२ तो सहजासहजी नष्ट होत नाही त्यामुळेच कोणत्या क्षणी तो पुन्हा उफाळेल, सांगता येत नाही. त्यामुळे अशाश्वताचा मोह ओसरत असला तरी शाश्वताची ओढ पक्की नसते. दुनियेचं खरं स्वरूप आणि तिच्यापायी होणारी आपली फरपट आणि कालापव्यय जाणवून दुनियेत देहानं राहूनही आणि सर्व कर्तव्यं यथायोग्य करीत असताही मनातून दुनिया ओसरत असते पण तेवढं पुरेसं नसतं. मनातून दुनियेचा प्रभाव ओसरत असला तरी मन भगवंतानं भरून जाणं हे महत्त्वाचं असतं. ते नुसतं रिकाम राहून चालत नाही. रिकामं घर सैतानाचं, असं वचन आहे ना? असं दुनियारहित पण भगवंतरहितही असलेलं मन पुन्हा दुनियेत वेगानं गोवू शकतं. त्यामुळे अशाश्वताचा प्रभाव ओसरत असतानाच शाश्वताचा प्रभाव रुजणं आवश्यक असतं. ते रुजवण्याचा सुगम, सोपा आणि प्रभावी उपाय नाम हाच आहे. त्याचं स्मरण हाच आहे. कोणत्याही उपायाने आणि मार्गाने का होईना, त्याचं स्मरण साधत असेल तर तोच आपला मार्ग आहे, हे निश्चित. आपला मार्ग नेमका कोणता हे सद्गुरूच सांगतात. त्यांची आज्ञा हाच तो मार्ग असतो. ‘भज गोविंदम्’मध्ये आदि शंकराचार्य सांगतात, ‘‘गुरुचरणाम्बुजनिर्भरभक्त: संसाराद्चिराद्भव मुक्त:। सेन्द्रियमानसनियमादेवं द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवम्।।’’ सद्गुरुंच्या चरणांवर दृढ विश्वास अर्थात सद्गुरूंच्या पाऊलवाटेनं निश्चयपूर्वक वाटचाल केली की अशाश्वताच्या दृढ बंधनातून मुक्तता होते. या वाटचालीसाठी मन आणि इंद्रिये एकवटतील तेव्हाच हृदयात व्यापलेल्या श्रीसद्गुरुंचं दर्शन होईल! हेच खरं ‘महद् अवधानम्’ आहे. या रीतीने स्मरण पूर्णत्वास पोहोचेल तेव्हा? ‘भज गोविंदम्’या आदि शंकराचार्याच्या स्तोत्राचा आपल्या या चिंतनातला अखेरचा श्लोक तेच सांगतो. जेव्हा भगवंताचं पूर्ण स्मरण अर्थात ‘महद् अवधानम्’ साधतं तेव्हा- ‘‘योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीन:। यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव।।’’ असा सद्गुरूरत साधक योगरत दिसो की भोगरत दिसो, सत्संगात असो वा सत्संगविहीन असो तो आंतून केवळ आनंदच भोगत असतो. बाह्य़ परिस्थितीत कितीही भेद आणि चढउतार दिसत असले तरी त्याचं अंतकरण एकरसातच निमग्न असतं. मानवी जन्माला येऊन हेच साधायचं आहे. आदि शंकराचार्य यांच्या विचारांचा ‘भज गोविंदम्’ स्तोत्राच्या आधारे सुरू असलेला आपला मागोवा इथेच संपत आहे. उद्या त्याचा समारोप करून नव्या सत्यमार्गदर्शकाकडे आपण वळणार आहोत. |