| केव्हा तरी
पहाटे,
झिंगून
रात्र गेली
संपूर्ण
एक खंबा,
रिचवून
रात्र गेली
मद्यात घातला
मी, सोडा
जराजरासा
त्या बुडबुड्यात
मजला बुडवून
रात्र गेली
कळले मला
न तेव्हा,
माझेच वागणेही
सारीच काचपात्रे
फोडून रात्र
गेली
सांगू तरी
कसे मी
बिल कालच्या
नशेचे
माझा खिसाच
सारा, उसवून
रात्र गेली
गेले पळून
कोठे माझेच
सोबती ते
आवाज पोलिसांचे
सुनवून
रात्र गेली
तुटल्या
कधीच तेव्हा
माझ्याच
दंतपंक्ती
रक्तात बत्तीशी
ही भिजवून
रात्र गेली
अंगावरी
न उरले
बघ प्यांट-शर्ट
काही
एकेक वस्त्र
माझे उतरून
रात्र गेली
अंगास गंध
येतो माझ्या
नकोनकोसा
चिखलात शेवटी
मज ढकलून
रात्र गेली |