स्पॅम तसेच अनावश्यक इमेल पासून सुटका होण्यासाठी गुगलनं प्रायरिटी इनबॉक्स म्हणून एक नवा इनबॉक्स गुगल मेल युजर्सना त्यांच्या अकाऊंटमध्ये दिला आहे. गुगलने सोशल साईट बझ ज्याप्रकारे गुगल मेलच्या अकाऊंट मेन्यूत देण्यात आली होती.
बझ प्रमाणे हा नवीन प्रॉ़यरिटी इनबॉक्स दिला आहे. गुगलने स्पॅम तसेच अनावश्यक मेलचा त्रास वाचवण्यासाठी हा इनबॉक्स दिल्याचं म्हटलंय. अनाश्यक मेल्सना गुगलनं बोलोग्ना असं म्हटलंय.
तुम्हाला आलेल्या मेल्सना तुम्ही दिलेलं उत्तर सततचा संपर्क यावर प्रायरिटी ठरणार आहे. तुम्ही ज्या मेल्सना नेहमीच उत्तर देणं टाळलंय, अथवा उघडूनही पाहिलं नाही अशा मेल्सना अर्थातच प्रायरिटी इनब़ॉक्समध्ये स्थान नसेल.
तुमचा यामुळे वेळ वाचणार आहे. 2004 मध्ये सुरू झालेली गुगल मेल सेवा अद्यायावत व सतत हाताळताना सुलभ असेल याचा विचार करून गुगलनं हा प्रायरिटी इनबॉक्स आणला आहे.