***Construction Services***

7 views
Skip to first unread message

Rohit Abhang

unread,
Jul 31, 2016, 3:40:20 AM7/31/16
to chambhar---san...@googlegroups.com
Hi Friends,Brothers & Sisters
Jay Gurudev.
I am delighted to introduced our Construction services.
Please Go through the profile.
If you have any requirement for construction please do contact us.
Regards,
Rohit Abhang. 
Iscon Profile.pdf

Prashant Mahale

unread,
Jul 31, 2016, 5:57:16 AM7/31/16
to chambhar---san...@googlegroups.com

*दैव जाणिले कुणी* ?
*डॉ. दत्ता कोहिनकर*
अभिजित व प्रिया एकमेकांना अनुरूप जोडी खुप गरीब कुटूंबात काबाडकष्ट करून अभिजित जन्मलेला, कसाबसा स्थिरस्थावर झाला होता. लग्नानंतर एकाच वर्षात प्रियाचा अपघात होऊन तिला दोनही पाय गमवावे लागले. मेंदूला झालेल्या आघाताने प्रिया कोमात गेली. सोने-नाणे-गाडी-घर सर्व काही विकून अभिजितने प्रियाची दवाखान्याची बिले भरली. परंतु हाती यश आलेले नाही. प्रियाची प्राणज्योत मालवली. कर्जबाजारी झालेल्या अभिजितला अशातच एका अमेरिकन कंपनीच्या डिलरकडे मित्राच्या मदतीने अकौटंटची नोकरी मिळाली. साहेबांच्या सहया घेण्यासाठी अभिजितला वारंवार बंगल्यावर जावे लागत. या जाण्यायेण्यातच साहेबांची मुलगी रूपाली अभिजितच्या प्रेमात पडली. अभिजित व रूपालीचा विवाह साहेबांनी थाटामाटात लावून दिला. रूपाली ही मालकाला एकुलती एक मुलगी असल्याने आज ‘बल्क’ कारखान्याचा अभिजित ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ आहे. दुसरे एक उदाहरण इलेक्शनसाठी वॉर्ड राखीव झाल्यामुळे पक्षाकडे उमेदवारच नव्हता. झोपडपट्टीत राहून ग‘ॅज्युएट झालेल्या गौतमला पक्षाने स्वतःहून उमेदवारी देऊन स्वतः पैसे खर्च करून निवडून आणले. त्याचवर्षी महापौर पद राखीव उमेदवारासाठी जाहिर झाले. कालचा बेरोजगार गौतम महापौर म्हणून आज दिव्याच्या गाडीत फिरतोय.
वरील दोन्ही उदाहरणावरून दैवाच्या खेळाची प्रचीती येते. पुर्वसंचिताचे फळ चांगले असेल तर दुष्ट व पापी माणसे पण पैसा-प्रसिध्दी-सत्ता अर्थात सर्व बाजूंनी सुखी दिसतात. पूर्वसंचित दुषित असेल तर सज्जनाला देखील दुःखात दिवस काढावे लागतात. त्यामुळे पुर्वसंचिताच्या पाप-पुण्याच्या प्रतापाने सुख-दुःखाचा आलेख वर-खाली चालू असतो. पण वर्तमानकाळातील कर्माचे मात्र आपण स्वतः मालक असतो.
सर्व काही आपल्या कर्मानेच घडते. आपण मात्र इतरांना दोष देत बसतो. म्हणून तर रामदास स्वामी म्हणतात,

*‘‘घडे भोगणे - सर्व ते कर्म योगे,*
*मतिमंद ते खेद मानी वियोगे,*
*मना तूचि रे पूर्वसंचित केले,*
*तयासारखे भोगणे प्राप्त झाले ॥’’*
खरोखर कर्माची गती गहन असते. म्हणून कर्मफलसिध्दांत नीट लक्षात घेऊन कर्मगतीला उर्ध्वगती देऊन आपले परमकल्याण साधायचे कि कर्मप्रवाहात पडून प्रवाहपतीसारखे चुकीचे काम करून कोठेतरी वहात जाऊन अधोगती प्राप्त करून घ्यावयाची हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. म्हणून संत - महंत म्हणतात
‘‘शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे ।
सत्कर्माच्या पुण्याईने - नर जन्माचे सार्थक व्हावे ॥’’
निसर्गाचा कर्मफलसिध्दांत हा सर्वांना समान असतो. गौतम बुद्ध म्हणतात. ‘‘कुशल चित्ताने एखाद्याने चांगले कर्म केले तर सुख त्याच्या पाठीमागे असे येईल जसे बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या मागे गाडीचे चाक व एखादयाने दुषित चित्ताने कुकर्म केले तर दुःख त्याच्यामागे असे येईल जसे त्याच्याबरोबर त्याची सावली.’’ जोपर्यंत हिटलर चांगल्या मनाने लोकांसाठी-देशासाठी कार्य करत होता तोपर्यंत संपूर्ण प्रकृतीने त्याला साथ दिली. एक शिपाई-जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष झाला पण ज्याक्षणी त्याने उन्मत्त होऊन दुष्कृत्ये चालू केली त्याक्षणी निसर्गाने त्याचा सर्वनाश घडवून आणला. त्याला आत्महत्या करावी लागली.
भगवद्गीतेत श्रीकृष्णाचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो,
‘‘कर्माची गती खरोखर अतिगहन । आम्ही दोघे एकाच गुरूचे शिष्य ।
पण तो कृष्ण झाला पृथ्वीपती । माझ्या घरात खायला नाही माती ॥’’
म्हणून यमनियम-शीलपालन करा व सुखाचे अधिकारी व्हा.
‘‘ *जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर* ।
*जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर* ॥’’

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Chambhar - Sant Rohidas Samaj" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to chambhar---sant-rohi...@googlegroups.com.
To post to this group, send email to chambhar---san...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/chambhar---sant-rohidas-samaj.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages