Anubhav Sankirtan - Sagarsinh Shukl

9 views
Skip to first unread message

Prashant Talpade

unread,
Jun 12, 2018, 2:59:16 PM6/12/18
to bapu-...@googlegroups.com
!! हरी ओम !! श्री राम !! अंबज्ञ !! नाथसंविध !!

माझा एक छोटासा आणि काळजाला भिडणारा अनुभव तुम्हा सांगू इच्छितो:

सन २००० सालचा जानेवारी महिना होता. माझे वडील तीर्थरूप श्री प्रभाकर शुक्ल हे ऍडव्होकेट श्री. गायतोंडे ह्यांच्या कडे त्यांच्या दादर येथील निवास्थानी लघु-लिपीक (Stenographer) म्हणून काम पाहत होते. मुख्य म्हणजे तेव्हा बापूंच्या कार्याला नुकतीच सुरुवात झाली होती आणि त्याकाळी बापू श्री गायतोंडे साहेब ह्यांच्या निवास्थानाजवळच असलेल्या ऋग्वेद नावाच्या इमारतीत राहायचे. ऍड. गायतोंडे साहेबांच्या घरी सकाळी ७:३० वाजता रोज पोहोचावयाचे असल्यामुळे माझे वडील बदलापूरहुन पहाटे ५:३० ची जलद लोकल पकडायचे आणि ठीक ७:३० वाजता गायतोंडे साहेबांच्या घरी पोहोचायचे. त्यांचे काम हे अर्ध-कालीन (Part-time) तत्वावर असल्यामुळे कामाचे ३ तास पूर्ण केल्यावर सकाळी १०:३० वाजता त्यांच्या घरून परत बदलापूरला यायला निघायचे.

मला नक्की तारिक आठवत नाही पण शनिवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे ते पहाटे ५:३० ची लोकल पकडून दादर ला पोहोचले आणि गायतोंडे साहेबांच्या घराच्या अगदी अलीकडेच पोहोचले होते कि वळणावर त्यांना अर्धांगवायू (paralysis) चा झटका (attack) आला. आकस्मितरित्या आलेल्या ह्या झटक्यामुळे ते तिथेच कोसळले. ते जिथे कोसळले तिथे एक वडापाव-वाला रोज सकाळी त्याची गाडी लावायचा, आणि माझे वडील तेथून नियमित ये-जा करत असल्यामुळे, त्याची आणि माझ्या वडिलांची बऱ्यापैकी ओळखही झाली होती. वडिलांना कोसळलेले पाहून त्यांनी तात्काळ त्यांना आधार दिला आणि हळूहळू गायतोंडे साहेबांच्या घरी सोडले. वडिलांना अशा अवस्थेत पाहून गायतोंडे साहेबानाहि धक्का बसला आणि त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ Ambulance बोलावली आणि माझ्या वडिलांना त्यांच्या निवास्थानापासून जवळच असलेल्या शुश्रूषा इस्पितळात दाखल करून घेतले. Admit करण्यासाठीच्या सर्व कागदोपत्री formalities त्यांनी स्वतःहून पूर्ण केल्या, अनामत रकमेचे (Security Deposit) पैसे हि भरले आणि संबंधित डॉक्टरांना तत्काळ उपचार (Treatment) करण्यासाठी विनंतीहि केली. डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केल्याची खातरजमा करून मगच त्यांनी माझ्या बहिणीला (सौ. ईश्वरी पटवर्धन) फोन केला आणि घडलेली सर्व हकीगत सविस्तररित्या आणि शिवाय इतकी काळजीपूर्वक सांगितली जेणेकरून माझ्या बहिणीने घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये. माझी बहीण (सौ. ईश्वरी पटवर्धन) तेव्हा छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) येथे रिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये Receptionist म्हणून कार्यरत होती. तिने लगेच अर्ध्या दिवसाची रजा टाकून दादर चे शुश्रूषा इस्पितळ गाठले. गायतोंडे साहेब तिची वाटच पाहत होते. ती आल्यावर त्यांनी तिला झालेला सर्व प्रकार सांगितला, खर्चासाठी पैसेहि दिले आणि निघून गेले. त्यानंतर ईश्वरी हिने माझ्या आईला आणि मला हि कळवले व आम्ही हि इस्पितळात लागलीच धाव घेतली. इस्पितळात गेल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून असे समजले कि वडिलांना आलेला अर्धांगवायूचा (paralysis attack) झटका हा गंभीर स्वरूपाचा होता व गायतोंडे साहेबांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तो थोडक्यावर निभावून गेला. अंबज्ञ नाथसंविध बापू..... त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वडिलांना २ दिवस इस्पितळातच राहावे लागणार होते. 

त्या काळी बापूंचे क्लिनिक दादर येथे राम-मारुती रोड वरील नवनीत बिल्डिंगमध्ये श्री दत्त क्लिनिक म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांना admit केलेले इस्पितळहि जवळील परिसरात असल्यामुळे माझ्या आईने बापू-दादांची भेट घ्यायचे ठरवले व दादांची रीतसर appointment घेऊन ती दादांना भेटायला गेली. माझ्या आईला दारात पाहताच दादांचे पहिले उद्गार "आता कसे आहेत तुझे मिस्टर?". माझी आई चकित झाली (प्रत्यक्षात ती दादांना घडलेला सर्व प्रकार सांगायला आणि उपाय विचारायला गेली होती पण दादांना आधीच सगळे माहित झाले होते?) त्यानंतर दादांनी माझ्या आईला धीर दिला, संबंधित डॉक्टरांचे उपचार व सूचनांचे पालन करायला सांगितले आणि Discharge मिळाल्यावर वडिलांना घरी नेण्यापूर्वी (बदलापूरला) क्लिनिक मध्ये घेऊन येण्यासाठी हि सांगितले. अंबज्ञ नाथसंविध बापू..... वडिलांना Discharge मिळाला आणि आम्ही माझ्या वडिलांना घेऊन दादांना भेटायला गेलो. दादांनी माझ्या वडिलांना त्यांच्या बाजूला बसवले आणि अर्धांगवायू (paralysis) झालेल्या हातावर हळुवार त्यांचा हात फिरवला आणि आईला सांगितले कि काळजी करू नकोस ते लवकर बरे होतील आणि माझ्या वडिलांना हाताला रोज मालिश करण्यासाठी तेलाच्या ४ बाटल्या विनामूल्य दिल्या आणि शिवाय क्लिनिक मधील Volunteers ना सूचना हि दिल्या कि माझ्या वडिलांचा paralysis पूर्ण बरा होईपर्यंत अलकावीरा ह्यांना मालिशसाठी तेलाच्या बाटल्या विनामूल्य द्याव्यात. मग आईने दादांकडे बापूंना भेटण्याची परवानगी मागितली आणि ती बापुना भेटायला गेली. बापूंच्या रूम मध्ये शिरताच आईचा बांध फुटला आणि ती रडू लागली, बापूनी तिला धीर दिला आणि ग्वाही हि दिली कि अजिबात काळजी करू नकोस, मी आहे. आई बापुना म्हणाली कि बापू आता मला प्रवचनस्थळी (त्या काळी बापूंचे प्रवचन D’Silva High School, कबुतरखाना, दादर ला व्हायचे) सेवेला हि येणे शक्य होणार नाही, त्यावर बापूनी तिला धीर की फक्त ३ गुरुवार मध्ये जाऊ देत, ४थ्या गुरुवारी तू नक्की सेवेला येशील. बापुना भेटून बाहेर पडण्यापूर्वी आईने बापुना विचारले, बापू माझ्या मिस्टरांबरोबर तुम्ही होतात ना, त्यावर बापू अगदी खळखळून हसले. बापूनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला, दादांनी दिलेल्या मालिशच्या तेलाने केलेल्या नित्य मालिशमुळे वडिलांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा होऊ लागली आणि खरोखरच बापूनी सांगितल्याप्रमाणे आई ४थ्या गुरुवार पासून परत तिच्या सेवेमध्ये रुजू झाली. 

एक अर्धांगवायू झालेला माणूस जेमतेम ४-५ महिन्यांमध्ये पाण्याने भरलेली मोठी aluminum ची बादली उचलू शकतो, Cheque वर सह्य करू शकतो, अर्धांगवायू झालेल्या हाताने जेवू शकतो व नित्याची सर्व कामेही करू शकतो, हे फक्त आणि फक्त आपल्या DAD लाच शक्य आहे. He can do anything if you trust and rely upon him whole-heartedly.......

सागरसिंह प्रभाकर शुक्ल
बदलापूर (पश्चिम) उपासना केंद्र

!! हरी ओम !! श्री राम !! अंबज्ञ !! नाथसंविध !!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages