करुणात्रिपदी चा भावार्थ

19 views
Skip to first unread message

Prashant Talpade

unread,
Feb 7, 2019, 7:55:41 AM2/7/19
to bapu-...@googlegroups.com

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी रचीलेल्या  करुणात्रिपदी चा भावार्थ

शांत हो श्री गुरुदत्ता
मम चित्ता शमवी आता !

तु केवळ माता जनिता
सर्वथा तु हितकर्ता
तु आप्त स्वजन भ्राता,
सर्वथा तुचि त्राता
भयकर्ता तु भयहर्ता,
दंडधर्ता तु परिपाता
तुजवाचुनी न दुजी वार्ता,
तु आर्ता आश्रय दत्ता
मम चित्ता शमवी आता !

हे श्री गुरु दत्तात्रेया, तु शांत हो, तु अशांत आहे असे आम्हास वाटल्यामुळे आमचे चित्त भयभीत झाले आहे, अशांत झाले आहे.
तु आमचा केवळ माता, जन्मदाता नसुन तुच सर्व अर्थानुसार , सर्व प्रकारे आमचे हित करणारा आहेस. तसेच तुम्ही आमचे आप्त, स्वजन, भाउ, नातेवाइक असुन तुम्हीच आमचे संरक्षण, तारणहार आहेत. या भवसागरापासुन आम्हास तुम्ही पैलतीर नेणारे आहे. तसेच तुम्ही भयनिर्माण करणारे, व भय हरणारे, भयाचा नाश करणारे आहात. आमच्या दु:खाचे , तुम्हीच पारिपत्य करणारे आहात. हे गुरुराया, अशा प्रकारे तुम्हीच आमचे तारणहार असल्याने व आमच्या दु:खाचे नाश करणारे असल्याने तुम्हीच आमचे एकमेव आश्रयस्थान आहे व त्यामुळे आम्हास तुम्हावाचुन दुसरे दैवत नाही.

अपराधास्तव गुरुनाथा,
जरी दंडा धरिसी यथार्था
तरी आम्ही गाउनी गाथा,
तव चरणी नमवु माथा
तु तथापि दंडीसी देवा,
कोणाचा मग करु धावा
सोडविता दुसरा तेव्हा,
कोण दत्ता आम्हा त्राता
मम चित्ता शमवी आता !

आम्ही काही चुक केली, आमच्याकडुन काही प्रमाद घडला, अपराध घडला व देवा तुम्ही आम्हास जरी योग्य तो दंड केला तरी आम्ही तुमचे गुणगान करु, लीला गायन करु व तुमच्या चरणी माथा ठेउ, तुम्हाला शरण येउ. हे गुरुदेवा, तुम्ही आम्हाला दंड केल्यावर आम्ही पामरांनी तुमच्याशिवाय कोणाचा धावा करायचा ? आम्हास तुमच्याशिवाय कोण सोडवणार ? कारण तुम्हीच आमचे त्राता आहात.

तु नटसा होऊनी कोपी,
दंडिताहि आम्ही पापी
पुनरपि चुकता तथापि,
आम्हावरी नच संतापी
गच्छत: स्खलनं क्वापि,
असे मानुनी नच हो कोपि
निजकृपालेशा ओपी,
आम्हावरी तु भगवंता
मम चित्ता शमवी आता !

हे गुरुदेवा, तुम्ही आमच्यावर क्रोधीत झाल्यावरही आम्हा पामराकडुन परत चुका होऊ शकतात. परंतु तुम्हास ही विनंती आहे कि, तुम्ही आम्हावर संतापु नका. कारण आम्ही पामर अज्ञ आहोत . तेव्हा आपण आमच्यावर कृपा करा.

तव पदरी असता त्राता,
आडमार्गी पाउल पडता
सांभाळूनी मार्गावरता,
आणिता न दुजा त्राता
निजबिरुदा आणुनी चिता,
तु पतीत पावन दत्ता
वळे आता आम्हा वरता ,
करुणाघन तु गुरुनाथा
मम चित्ता शमवी आता !

हे गुरुदेवा, तुमच्या अध्यात्मपथावर चालताना , तुमची उपासना करताना , तुमच्या चरणाचा आश्रय घेतलेला असताना आमच्या कडुन अज्ञानामुळे काही चुक होऊ शकते. तेव्हा हे गुरुदेवा तुम्ही आम्हाला सांभाळुन घ्या. आम्हाला तुमच्याविना कोणीही सांभाळुन घेउ शकत नाही. आपले पतीतपावन हे सार्थ आहे. व करुणाघन गुरुदत्ता , तुम्ही आमच्या वर कृपा करा.

सहकुटुंब सहपरिवार,
दास आम्ही हे घरदार
तव पदी अर्पु असार,
संसाराहित हा भार
परि हरिसी करुणासिंधो,
तु दीनानाथ सुबंधो
आम्हा अघलेश न बाधो,
वासुदेव प्रार्थित दत्ता
मम चित्ता शमवी आता !

हे गुरुदत्ता, आम्ही सर्व कुटुंब तुमचे दास आहोत , आम्ही सर्व परिवार तुमचे भक्त आहोत. आम्ही तुमची  भक्ती करतो आहे. आम्ही भक्तीभावाने तुमची आराधना करतो आहे. आमच्या जीवनातील सर्व असार, बरे वाईट कर्मे तुमच्या चरणी अर्पण करत आहे. तसेच ह्या प्रपंचाची चिंता तुमच्यावर सोडत आहे. हे गुरुदत्ता, दीनानाथा, तुम्ही आमच्या चिंतांचे हरण करा. आम्हास कोणतीही कुबाधा होऊ देऊ नका. आमचे मन, चित्त सदा आपल्या भक्तीत लीन राहो, आपल्या चरणी स्थिर राहो, अशी प्रार्थना हा वासुदेव तुम्हाला करीत आहे .

Reply all
Reply to author
Forward
0 new messages