New Gajar on Shree Trivikram gifted to all shraddhavans by Parampujya Suchitdada
ह्या अमूल्य भेटीचा विसर न होवो...
“II रामा...रामा...आत्मारामा...त्रिविक्रमा...सद्गुरु...समर्था,
सद्गुरु...समर्था...त्रिविक्रमा...आत्मारामा...रामा...रामा II”
समस्त श्रद्धावान कृतार्थ झाले, मिळाला हा नवीन गजर,
आज थेट आकाशाला भिडला, उसळणार्या प्रेमाचा सागर
’उतून चालला आहे खजिना’, जे साईसच्चरितात वाचले,
आज प्रत्यक्ष अनुभवले, बापूकृपेने अवघेचि विश्व उद्धरले
तुझे देणे संपत नाही, ते घेण्या माझी झोळी पुरत नाही,
तुझे देणे थांबत नाही, ते घेण्या आयुष्यकाल पुरत नाही
बाकी सर्व सहन होते, बापू तुझे प्रेम सहन होतच नाही,
कारण ते कितीही स्वीकारा; ’व्यसन’ सुटता सुटत नाही
हा गजर गाताना वाटले, तुझा आधार जो आधीही होता,
आता तो अधिकाधिक व्यापक झाला, गजर गाता गाता
आज चक्क काळही थबकला, गजरात तोही रंगून गेला,
त्रिविक्रमाच्या प्रेमपाशात, तो श्रद्धावानांसह बेभान झाला
सुचितदादा तुम्ही दिलेली ही भेट, जीवापाड जपून ठेवू,
त्रिविक्रमावर प्रेम कसे करावे, गजरातून जीवनी उतरवू
हा गजर आमुचा श्वास होवो, तोच आमुचा ध्यास होवो,
बापू तूच काळजी घे, ह्या अमूल्य भेटीचा विसर न होवो
आय लव्ह यु माय डॅड !
जय जगदंब जय दुर्गे !!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ !!!
नाथसंविध्!!!!
अजितसिंह पाध्ये