आपणास आणि आपल्या परिवारास आनंद, समृद्धी व नव्या उत्साहाने उजळलेली दीपावली लाभो, हीच मंगल शुभेच्छा... !
🎇 दीपावलीच्या हार्दिक आणि अग्रीम शुभेच्छा !
♻️ " सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग [MSMEs] समोरील खर्च व स्पर्धात्मकता संबंधी आव्हाने "
ओळखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन ....📌 गुरुवार | ३० ऑक्टोबर २०२५ | दु. ३ ते ७ | 'स्मॅक भवन', शिरोली एमआयडीसी |
# कार्यशाळेला कोणी उपस्थित राहावे : कोल्हापूर तसेच परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांशी संबंधित उद्योजक,
औद्योगिक संघटनांचे सदस्य, निर्याताभिमुख उद्योग, क्लस्टर प्रतिनिधी, वित्त संस्था प्रतिनिधी तसेच धोरणनिर्मितीशी निगडित अधिकारी यांनी उपस्थित रहावे.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
मान्यवर,
एमएसएमई-डीएफओ, मुंबई यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय [O/o AS & DC, MSME], नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार ''सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) समोरील खर्च व स्पर्धात्मकतेसंबंधी आव्हाने'' ओळखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांतर्गत क्लस्टर स्तरावरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
या अनुषंगाने, भारतातील सक्रीय आणि गतिमान उत्पादन उद्योग क्लस्टर्सपैकी एक म्हणून कोल्हापूर हे ठिकाण निवडण्यात आले असून, 'स्मॅक भवन', शिरोली एमआयडीसी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
▪️ उपक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश : या उपक्रमाचा उद्देश MSME उद्योगांना भेडसवणाऱ्या खर्च आणि स्पर्धात्मकतेशी संबंधित आव्हानांची ओळख करून घेणे हा आहे.
या कार्यशाळेत देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार व भूराजकीय परिस्थितीतील बदल, तसेच अमेरिकेकडून प्रस्तावित टॅरिफ धोरणांचा भारतीय MSME उद्योगांवरील परिणाम या संदर्भात चर्चा होणार आहे. तसेच निर्याताभिमुख उद्योगांवर याचा थेट परिणाम होत असून, त्यातून उद्भवणाऱ्या आव्हानांवर नव्याने धोरणांची आखणी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली जाईल.
या कार्यशाळेतून मिळणाऱ्या महत्वपूर्ण सूचना आणि निष्कर्ष MSME मंत्रालयाकडे येत्या केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पासाठी विचारार्थ सादर करण्यात येतील, ज्यामुळे MSME धोरणे अधिक बळकट व परिणामकारक होतील.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन - स्मॅक, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन - गोशिमा, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले - मॅक, कोल्हापूर फर्स्ट फाउंडेशन या संस्थांची निवड जिल्हास्तरीय अग्रणी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संघटना म्हणून केली आहे. इंडिया एसएमई फोरम यांची नॉलेज पार्टनर म्हणून निवड करण्यात आली आहे.
कार्यशाळेसाठी आपली उपस्थिती सदरच्या Google लिंकद्वारे नोंदविण्याची विनंती - https://forms.gle/8m1BBUp6UsXEHJB5A
अथवा खालील QR कोड स्कॅन करून नोंदवावी
