भूमिका ‘चांगल्या’ सासू-सासऱ्यांची!!

94 views
Skip to first unread message

आपलं माणूस विवाह संस्था

unread,
Oct 25, 2015, 1:21:56 AM10/25/15
to "आपलं माणूस विवाहसंस्था" ग्रुप

आपल्या भारतीय जीवनव्यवस्थेत लग्न-संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला भारतीय समाज हा आपण सर्वानुमते मान्य केलेल्या लग्न-संस्थेवर उभा आहे आणि म्हणूनच आपल्याकडे जगातील सर्वात मजबूत ‘कुटुंबव्यवस्था’ आहे. जगात कुठेच आढळणार नाही इतकी छान आपुलकीने, प्रेमाने आणि घट्टपणे आपल्या घराशी बांधलेली कुटुंबं हे जगासाठी एक अप्रूप आहे.


हल्ली लग्नानंतर ह्या भक्कम कुटुंबाचे बुरुज चांगलेच ढासळताना दिसताहेत. नवी पिढी ह्याला ‘सासू-सासरे’ हे कारण देते तर जुने लोक ‘हल्लीची मुलं’ अशी-अशी वगैरे वागतात असे सांगतात. पण वरकरणी कुणीही आपल्याकडे त्याची जबाबदारी घेत नाही, स्वाभाविकपणे कुणीच घेत नसते. मुळात मुख्य मुद्दा आहे हा प्रश्न सामंजस्याने, चर्चेने सोडविण्याचा.



प्रथम ह्यासंबंधात सखोल माहिती घेतली तर असे आढळते की तंत्रज्ञानाच्या आणि बदलत्या जीवनशैलीनुसार नवीन पिढीचे विचार, राहणीमान, आवडी आणि सवयी बदलणार. आणि बदल हा निसर्गाचा स्वभाव आहे. बदल होऊच नये, पूर्वीपासून जसे चालू आहे तसेच पुढेही चालू राहावे, माझ्या मुलांनी व सुनांनी माझ्या इच्छेने वागावे असा दुराग्रही हट्ट बाळगल्यास आपण प्रेमळ, हवे-हवेसे वाटणारे सासू-सासरे होऊ शकतो का? माझ्यावर प्रेम करा असा अट्टाहास धरल्याने कुणीही प्रेम करत नाही ही व्यावहारिक बाब आपल्याला नवीन नाही. प्रेम मिळविण्यासाठी आधी प्रेम द्यावे लागते.


मधुर वाणीने आणि स्वातंत्र्य देऊन परके लोक आपुलकीने जवळ करता येतात अशा वेळी- पूर्वी असे नव्हते, आमच्या घरात असे चालत नव्हते, हल्लीच्या मुलींना एकत्र कुटुंब नको असते, स्वतंत्रता हवी असते आणि ह्याला पथेटपणे वा आडवळनाणे विरोध दर्शविल्यास आपण लाडके सासू-सासरे होऊ का? नव्हे आपण त्या मुलींचे ‘आई-वडील’ बनू का? आपण बांधून ठेवण्याचा, बंधने घालण्याचा प्रयत्न करू तर त्यातून सुटकेसाठी प्रयत्न केले जातील आणि हल्ली ‘सासू-सासरे’ ही ओझी झाली आहेत, मुलींना स्वतंत्र राहायचे असते अशी ओरड होते. सासू-सासरे मुलांना मोकळीक देण्याचा, स्वतंत्रपणे वागण्याचा आग्रह धरत असतील, उलटपक्षी त्यांची नवीन पद्धतीची आवड-निवड ओळखून आपल्यात बदलत्या काळानुसार स्वतःलाही जमवून घेत असतील, आपली त्यांना हवी तेवढी मदत कशी होईल हे बघत असतील तर “मला सासू हवी” वगैरे हट्ट प्रत्यक्षात येतील.


ह्याबाबतीत एक छोटा अन छानसा मंत्र जर क्षणोक्षणी पाळला तर तुमचीच मुले-सुना तुमच्याचसोबत राहण्याचा हट्टाला बसतील तो मंत्र म्हणजे– SPM – शांत:प्रेमळ:मधुर! ही शैली ‘सासू-सासरे’ होण्यापूर्वीच मनाला, सवयीला लाऊन घेतली तर सासू-सासऱ्यांमुळे घरात तणाव निर्माण झाला असे दिसण्याऐवजी त्यांच्यामुळेच तो निवळला असं दिसायला जराही वेळ लागणार नाही. मुलाचं लग्न होणार हा आयुष्यातील अत्यानंदाचा जसा प्रसंग आहे तसाच तो स्वतःमध्येही सुयोग्य बदल करून घेण्याचा आहे. शांत, प्रेमळ आणि मधुर वागणारे, बोलणारे सासू-सासरे व्हायला आवडेल? नव्हे त्यावेळी तुम्ही सासू-सासरे उरणारच नाहीत मुळी! तुम्ही व्हाल त्यांचे लाडके आई-बाबा. सुनांना आधार देणारी, संकटात हरक्षणी मुलगा-सुनांना मिनिटा-मिनिटाला साथ देणारी सासू ही आईपेक्षाही मायेची कधी वाटायला लागते हे तिलाही समजत नाही. त्यांच्या सुखासाठी त्यांच्या कलाने वागणारे सासू-सासरे व्हायचे की हे “पूर्वी असं होतं, तसं होतं; आता तेंव्हा सारखं काही नाही राहिलं” असं नैसर्गिक बदलांना नाकारणारे व्हायचं? ह्या प्रश्नातच सुखी कुटुंबाचं सोल्युशन आहे.

 

बरेचदा आम्ही इतके कष्ट केले, असे परिश्रम केले आता तुम्हाला सर्व रेडीमेड मिळते वगैरे गोष्टी सतत ऐकवून आपण आपल्या आयुष्याची पुरावृत्ती पुन्हा रिपीट व्हायला बघतो आहोत का? आपण कष्ट करून जीवन जगलो म्हणून मुला-सुनांनी कुठली सुखं अनुभवायची नाहीत का? आणि असं वाटून आणि असं बोलूनही त्यांना आपण हवे-हवेसे होऊ का? आपण त्यांना सुखात बघू इच्छितो की आपण कष्टप्रद जीवन जगलो म्हणून आता चांगले दिवस आल्यावर मग आपलीच मर्जी चालावी, प्रत्येकाने आपल्याला मं-सन्मान द्यावा, आपला आदर करावा अशी अनाठायी अपेक्षा ठेवून तणावाची पेरणी करायची? आपल्या शांत, प्रेमळ आणि मधुर स्वभावाने ती साखरपेरणी होऊ शकते, अगदी नक्कीच होऊ शकते.



ह्याठिकाणी दरवेळी सासू-सासरे फक्त तेवढे चुकीचे आणि स्वराचाराने वागणारी ‘हल्लीची’ ती बरोबर अशी तुलना नाहीच. उलट तुलना टाळूनच सौख्याचा मार्ग सुरु होतो हे सत्य आहे. मुले चुकीची वागत असतील तर योग्य वेळ, प्रसंग आणि स्वभाववैशिष्ट्ये जाणून त्यांना त्याची जाणीव करून देता येईल तीही गोड शब्दात. आणि जरी ती चुकीची वागत असतील तरी त्याचे योग्य-अयोग्य परिणाम त्यांना अनुभवावे लागतीलच त्यावेळी त्यांना आधार दिल्याने किंवा समंजसपणे साथ दिल्याने ती आयुष्यात नवीन काही शिकतीलही आणि तुमच्यापासून मनाने दुरावणारही नाहीत. आपल्या उभ्या आयुष्यात एक आपण खात्रीने समजून चुकलो आहोत की प्रत्येकवेळी कुठलीही गोष्ट प्रथमदर्शनी दिसते, वाटते, भासते तितकी ती मुळात गंभीर नसते बऱ्याच वेळा काळ हे औषध, तो शिक्षक ह्या पिढीला योग्य ते शिक्षण देतोच आपण दरवेळी हेडमास्तराच्या भूमिकेत राहिलो तर आपल्याच माणसांवर प्रेम करायचे राहून जाईल आणि प्रेमाची पेरणी ही अजून दहापट प्रेमाचा परतावा देते. ही भावनिक प्रेमळ व मधुर गुंतवणूक शांतपणे करीत राहिल्यास आणि त्याची तयारी सासू-सासरे होण्याधीच केल्यास कुठलाही मुच्युअल फंड देणार नाही अशी भरभराट आपल्याच कुटुंबात बघता येईल.


मला स्वत:चं आयुष्य आहे, माझे स्वत:चे विचार, आवडी-निवडी, इच्छा-आकांक्षा आहेत. अगदी तसंच समोरचा माणूस एक स्वतंत्र व्यक्ती आहे. त्यालाही त्याच्या काही विचार,  आवडी-निवडी, .इ. सर्वकाही आहेत आणि तो त्याचं आयुष्य स्वतंत्रपणे स्वत:च्या विचाराने जगू शकतो.असे विचार मान्य असणारी व्यक्ती मग तो सासू असो, सून असो, सासरे असो, कुणीही असो, सर्वांना आवडते. आपला आदर करणारी, आपल्याला विचारात घेणारी व्यक्ती कुणाला नाही आवडत?


मग आता सासू-सासरे होण्याआधीच तयारी करायला लागा आणि SPM – शांत/प्रेमळ/मधुर मंत्र जपायला, मनाला, जिभेला वळण लावायला सुरुवात केलीत तर बाकी इतर कुठलीही काळजी उरणार नाही, नव्हे तुमची काळजी करण्यासाठी तुम्ही आजवर कष्टाने उभं केलेलं कुटुंब तुमच्या विशाल वृक्षात रुपांतरीत होताना सावली आणि फळं, उर्वरित आयुष्यात दोन्हीही देईल. प्रश्न स्थळांचा असेल तर आपलं माणूस विवाहसंस्थेत नाव नोंदवून तो तर चुटकेसरशी सुटतो.


दुसरी आणखी एक काळजी घ्यावी ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती, त्याचा स्वभाव, गुण-दोष वेगळे आहेत आणि त्यामुळे आपण वा आपली मुलगी अमुक पद्धतीने वागते, अमुक प्रकारचे जीवनमान इत्यादी अनुसरते आणि म्हणून आपल्या मुलाच्या संसारातही तसेच व्हावे, त्यांनी त्यांच्या संसारात/आयुष्यात अशा अमुक पद्धतीने राहावे, मुलींचा सल्ला/विचाराने वागावे ही विचारसरणी केवळ उद्वेगला आणि बरेचदा आपल्या प्रसन्न कुटुंबातील वातावरणाला सुरुंग ठरू शकतात. आदर्श, चांगल्या सासू-सासऱ्यांनी हे कटाक्षाने टाळावे. प्रत्येकाचे आयुष्य स्वतंत्र आहे आणि प्रत्येकाचा संसारही त्यांना हव्या त्या रीतीने आणि त्यांच्या स्वत:च्या नियोजनाने ते चालवणार आहेत. आपला दुराग्रह मिठाची भूमिका निभावत असेल तर कौटुंबिक संबंध खारट होण्यापासून वाचावेत ह्यासाठी आपण “विचारल्यास”च मार्गदर्शन करावे उगाच आपल्या अनुभवाचे व्याज मुलांच्या संसारावर लादू नये, त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवनप्रवास करू द्यावा, गरज भासल्यावर ते स्वत:च तुम्हाला मार्ग विचारतील तोवर तुम्ही मात्र प्रेमाचा मार्ग सोडू नये. मी इतकं सगळं उभं केलं, मी इतके कष्ट करून मुलाला खूप शिकवलं तेंव्हा कुठे तो ह्या ठिकाणी पोहचला वगैरे सुनवू नये. ते घाव बनतात, घरं वेगळी करणारे! आपल्या प्रेमळ अन मधुर वाणीने शेवटी मुलंच आपले गुण गातील आणि सुना इतिहास विचारतील. अर्थात तीही सुप्त अपेक्षा न ठेवलेलीच बरी. मुळात आपण मिळण्याचा, घेण्याचा विचार करीत आपलंच माणूस दूर लोटत असतो त्याऐवजी ती दोघं उत्तम संसार करताहेत, सुखाने नांदताहेत हवं तेंव्हा आणि त्यांना गरज भासल्यास ते आपलं मार्गदर्शन घेतील.  

 


मुलीच्या आई-वडिलांचीही सासू-सासरे म्हणून आज जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे, नव्हे आजच्या बदलत्या शहरी जीवनशैलीत ती अधिकच महत्त्वाची बनलेली आहे. आपली मुलगी सुखात असावी, तिला कुठलाही त्रास होणार नाही अशी अपेक्षा नैसर्गिक आणि रास्त आहेच आणि त्यासाठी प्रत्येकाने शर्थीने प्रयत्न करण्यातही गैर नाही पण आपल्या मुलीचा संसार ‘असा-असा’ हवा, आपल्या जावयाने ‘असेच’ वागायला हवे वगैरे जी इतरांच्या दृष्टीने ‘लुडबुड’ ह्या विशेषणाने संबोधता येईल अशी ढवळाढवळ! आपल्या मुलीच्या संसारातील अति-लक्ष हे तिच्याच दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने घातक आहे हे उमजलेले पालक मुळी-जावयाचा उमलता संसार आनंदाने अनुभवतात आणि इतर अति-उत्साही वा अति-आग्रही पालक तिच्या संसारात आपल्यामुळे निर्माण होणाऱ्या नकळत दुराव्यांना जन्म देत समस्या सोडवीत असतात. जावयाचे सासू-सासरे होताना आपली लक्ष्मण-रेखा आपण आखून घेतली तर कौटुंबिक न्यायालयातील अनेक फायली तत्परतेने निकाली निघतील. मुलींच्या पालकांनीही आपली प्रेमळ-काळजी ही सीमेपलीकडे समस्या निर्माण करणारी नाही ह्याची निश्चित खात्री बाळगावी.

 

अशी भूमिका हीच चांगल्या, लाडक्या आणि हव्याश्या वाटणाऱ्या सासू-सासऱ्यांची भूमिका आहे... मुळात तेंव्हा आपण सासू-सासरे नाही, लाडके “आमचे आई-बाबा” बनलेले असाल.

 

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्याकडे त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.

 

सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com



ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483

वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु



आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

 

Reply all
Reply to author
Forward
This conversation is locked
You cannot reply and perform actions on locked conversations.
0 new messages