सावधान, सायबर गुन्हे वाढताहेत

43 views
Skip to first unread message

Dashrath Chate

unread,
Aug 12, 2010, 1:41:41 AM8/12/10
to wiproitengineers



सध्याचे जग हे माहिती तंत्रज्ञान जग म्हणून ओळखले जाते. त्यातील प्रत्येक नागरिक हा सायबर सिटीझनच. मग तुम्हाला संगणकाचे ज्ञान नसले तरीही तुम्ही विविध माध्यमांतून या सायबर जगात वावरत असताच. या जगातही गुन्हेगारीचे प्रमाण दुप्पट वेगाने वाढते आहे. यात गुन्हा करणारा अदृश् राहून तुमचे मोठे नुकसान करू शकतो. त्यामुळे यापुढे प्रत्येक सायबर सिटिझनने दक्ष राहिलेच पाहिजे.

सायबर गुन्हे म्हणजे काय?

  • संगणक किंवा मोबाईलच्या साह्याने माहितीची देवाणघेवाण करून केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांना सायबर गुन्हे असे म्हणता येईल.
    भारतातील पहिला गुन्हा कधी आणि कोठे घडला?
  • देशातील पहिला सायबर गुन्हा जुलै 2003 मध्ये उघडकीस आला. तो "नायजेरिया 419' गैरव्यवहार नावाने ओळखला जातो. कोलकता येथील उद्योगपती पीयूष कांकरिया यांना बेनीनमधील एका बॅंकेचा संचालक असल्याची बतावणी करून बेन किम नावाच्या माणसाने आणि त्याच्या टोळीतील अन्य काही जणांनी फसविले. या गुन्ह्यात कांकरिया यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हावडा पोलिस ठाण्यात एक ऑगस्ट 2003 रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.


सायबर गुन्ह्यांचे महत्त्वाचे प्रकार

  • संगणक किंवा मोबाईलवरील अश्लील क्लिप - संगणक, इंटरनेट, मोबाईल यावर अश्लील दृश्ये, छोट्या क्लिप अपडेट करून त्याचा प्रसार करण्यात येतो.
  • इंटरनेटच्या माध्यमातून बेकायदा वस्तुविक्री - अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि वन्य जीवांची कातडी इंटरनेटच्या माध्यमातून विकण्याचे प्रकार केले जातात. हे गुन्हे या प्रकारात मोडतात.
  • ऑनलाइन सट्टा - परदेशातील सर्व्हरच्या साह्याने ऑनलाइन सट्टा खेळणारी हजारो संकेतस्थळे भारतात आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून हवाला व्यवहार, पैशांची अफरातफर हे याचेच काही प्रकार आहेत.
  • स्वामित्व हक्क - यामध्ये बनावट सॉफ्टवेअरची निर्मिती विक्री, संगणकावरील माहितीची चोरी यासह स्वामित्व हक्क कायद्याचा भंग, या सर्वाचा समावेश करता येईल.
  • -मेल हॅक - एखाद्याचा -मेल हॅक करून त्यावरून संबंधित -मेलच्या संपर्क यादीतील लोकांना -मेल केले जातात. बऱ्याच वेळा अशा -मेलमधून पैशांचीही मागणी केली जाऊ शकते. काही वेळा -मेलच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची बदनामी करण्यात येते.
  • बनावट नोटा किंवा प्रमाणपत्र निर्मिती - संगणक, स्कॅनर आणि प्रिंटरच्या साह्याने बऱ्याच वेळा बनावट नोटा, शालेय गुणपत्रके, स्टॅम्प यांची निर्मिती केली जाते.
  • बदनामी - इंटरनेट, संकेतस्थळांच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी करण्याची घटना या प्रकारात मोडते. ऑर्कुट, फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळांच्या साह्याने बदनामीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
  • नेटवर्क हॅकिंग - संकेतस्थळे हॅक करून त्यातील माहिती चोरण्याचा, त्यावरून विविध संदेश प्रसारित करण्याचा प्रकार नेटवर्क हॅकिंगमध्ये मोडतो. संगणकाच्या हार्डडिस्कवरील माहितीही यामध्ये चोरली जाण्याची शक्यता असते.
  • -मेल हल्ला - एखाद्या -मेल अकाउंटवर सातत्याने मोठ्या संख्येने मेल पाठवून त्याचा सर्व्हर नादुरुस्त करण्याचे काम या माध्यमातून केले जाते.
  • व्हायरस हल्ला - संगणकाच्या फाइल्स किंवा -मेलच्या माध्यमातून व्हायरस पाठवून एखादा संगणक किंवा संपूर्ण नेटवर्क बंद पाडण्याचे काम व्हायरस हल्ल्यात केले जाते. याच पद्धतीने "ट्रोजन' हल्लाही केला जातो.
  • क्रेडिट किंवा डेबिट कार्ड गैरव्यवहार - डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे, दुकानातून खरेदी करणे इत्यादी गुन्हे केले जातात. ते सर्वही सायबर गुन्ह्यांमध्येच मोडतात.


संस्थात्मक पातळीवर काय काळजी घ्यावी?

  • अद्ययावत ऍण्टी व्हायरस आणि फायरवॉल संस्थेच्या नेटवर्कमधील संगणकांसाठी वापरले पाहिजेत. नेटवर्कवर कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे.
  • वापरात नसलेल्या संगणकीय सेवा नेटवर्कमधून काढून टाकाव्यात.
  • पासवर्ड तयार करताना अक्षरे आणि आकडे यांच्या एकत्रित वापर करावा.
  • नेटवर्कमधील सेवांमध्ये एखादा संशयास्पद कोड किंवा प्रोग्रॅम आढळून आल्यास तातडीने संबंधित सेवा बंद करावी. संबंधित प्रोग्रॅम नेटवर्कमधून काढून टाकल्यानंतरच सेवा पूर्ववत करावी.
  • व्हायरसच्या प्रसारासाठी सामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या फाइल्स -मेलमधील ऍटॅचमेंटमधून डाऊनलोड करता येऊ नयेत, यासाठी मेल सर्व्हरमध्ये आवश्यक उपाय योजावेत.
  • व्हायरसचा शिरकाव झालेला संगणक नेटवर्कमधून बाहेर काढावा. जेणेकरून व्हायरसचा इतरत्र प्रसार होणार नाही.
  • अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या -मेलमधील ऍटॅचमेंट उघडू नयेत, इंटरनेटवरील अनोळखी सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये, यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
  • नेटवर्क सुरक्षेचे महत्त्व व्यवस्थापनाला पटवून देऊन संस्थेच्या अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात येईल, याची काळजी घ्यावी.
  • कोणत्याही आपत्कालीन सायबर हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशी व्यवस्था केलेली असावी.


वैयक्तिक पातळीवर काय काळजी घ्यावी?

  • कोणतीही बॅंक कधीही -मेलद्वारे कोणाचाही पासवर्ड किंवा अन्य वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे अशा -मेलला कधीही उत्तर देऊ नका. -मेलद्वारा आलेल्या संकेतस्थळांच्या लिंक् बनावट असण्याची शक्यता असते. त्याचा वापर करताना पुरेशी काळजी घ्यावी.
  • लॉटरी काढल्याशिवाय कोणालाही ती लागू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या -मेलला उत्तर देणे टाळा. त्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरू नका.
  • नोकरी लागल्याच्या -मेलमध्ये ज्या कंपनीचे नाव दिले आहे त्याची पुरेशी माहिती करून घ्या. त्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तेथे दिलेल्या क्रमांकावर किंवा मेलवर संपर्क साधून तुम्हाला देण्यात आलेली ऑफर खरी आहे का, याची खातरजमा करा.
  • डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणत्याही अनोळखी माणसाच्या हातात देऊ नका. कार्ड स्वाइप करायला दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर लक्ष ठेवा. ती व्यक्ती कार्ड नेमके कोठे स्वाइप करते आहे, याची खात्री करा. पासवर्ड कोठेही लिहून ठेवू नका.
  • -मेल किंवा सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे पासवर्ड तयार करताना अक्षरे आणि आकडे यांचा एकत्रित वापर करा.
  • सार्वजनिक संगणकांवर कधीही पासवर्ड किंवा अन्य वैयक्तिक माहिती "सेव्ह' करू नका.
  • ब्राऊजरमधील टेम्पररी फाइल्स, हिस्टरी, कुकीज काम झाल्यावर आठवणीने डिलीट कराव्यात. तुम्हाला रोजच्या रोज लागणाऱ्या संकेतस्थळांच्या लिंक् "फेव्हरिट',
  • बुकमार्क'मध्ये "सेव्ह' करून ठेवाव्यात.
  • अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या -मेलच्या ऍटॅचमेंट् उघडू नका.
  • संगणकावरील ऍण्टी व्हायरस अद्ययावत आहे का, याची खात्री करा. संगणकावर ऍण्टी फिशिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. बनावट -मेल आणि संकेतस्थळांच्या साह्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ नये, याची काळजी ऍण्टी फिशिंग सॉफ्टवेअरमुळे घेतली जाते.
  • सर्व प्रकारचे पासवर्ड साधारणपणे तीन महिन्यांच्या अंतराने बदलावेत.

जागतिक ट्रेंड्

  • अमेरिकेत सायबर गुन्ह्यांतर्गत झालेल्या फसवणुकीच्या रकमेत 2009 मध्ये दुपटीने वाढ झाली आहे. 2008 मध्ये 26 कोटी 46 लाख डॉलरची फसवणूक झाली होती, तर 2009 मध्ये 55 कोटी 97 लाख डॉलरची फसवणूक करण्यात आली.
  • सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीतही<font face="
  • --
    --
    With Best Regards,
    Dashrath R. Chate| IT-Engineer
    For Wipro Infotech Pvt. Ltd.

    Ë-09763107923 ( +912066039621

    Google Groups
     Subscribe to "IT Engineers" Group
    Subscribe to "मैञी" ग्रुप {मैञी-एक पविञ नाते}
    Subscribe to "anmolmansi" Group


    --~--~---------~--~----~------------~-------~--~----~ You received this

    message because you are So Good Best & More More Better Only only as

    YOU.......................................................




    Q Please do not print this email unless it is absolutely necessary. Let’s preserve our environment.


Reply all
Reply to author
Forward
0 new messages