अनिरुद्ध धून - प.पू. सुचितदादांच्या आजोबांनी श्री साईनाथांवर लिहलेली आरती

11 views
Skip to first unread message

Srijanee Dmello

unread,
Dec 2, 2013, 1:27:35 AM12/2/13
to aniruddha...@googlegroups.com
 

Ambadnya,
Srijaneeveera.

Ek Vishwaas Asava purta, karta harta Guru Aisa!


On Monday, 2 December 2013 2:50 PM, raam chougule <raamch...@gmail.com> wrote:
जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!  

तुझिया ठायी तुझिया पायी शरणागत ...मी दीन अति ! 
कृपा करी बा दीनवत्सला उध्दारी मज श्रीमूर्ती ! 
पंचारती ओवाळी तुजला भक्तिभावयुत सुमहारा ! 
गोड करुन घे दासाचे हे स्तवन वाकडे परात्परा !! १ !! 

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!   

दीनोध्दारा दयावंत तू सखा सोबती भक्तांचा !
धाव घाल झणी करी वर्षावा सदैव तव सत्कृपेचा ! 
तुझिया स्तवनी मनी मानसी मी तू पणाला ठाव नसे !
भक्तिभावे सोsहं सोsहं निनाद उठती दाही दिशे !! २ !!  

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !! 

त्रिविध त्रिगुणे सत्व रज तमी कृपानिधे तू दातार ! 
नामस्मरणे भक्त शिरी धर सदा दयेची पाखर ! 
जगत्पालका भक्तरक्षका पूर्ण परेशा निरंजना ! 
मायामोही एकमेव तू तारक आम्हां भवहरणा !! ३ !!  

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!   

शिरडी ग्रामी पवित्र धामी निंब द्रुमाच्या छायेत !
पवित्र झाले सकल भूमीतल आत्मरुप आनंदात ! 
माईव्दारका पुनीत झाली धगधगत्या चिर धूनीने ! 
उदी विलेपन भाली भक्ताजन करी सदोदीत भक्तीने !! ४ !!  

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा !!   

फडकत माथा शुभ्रदुपेटा साईनाथा मनोहरा ! 
तव रुपाची सदैव मूर्ती वसो अंतरी श्रीकारा ! 
श्रीसाईजी आद्यानंता परमपरेशा गुरुनाथा ! 
मोरेश्वर चिंतामण ठेवी तुझिया चरणी निजमाथा !! ५ !!   

जय जय बोला जय जय बोला साईनाथांचा जय बोला ! 
ओवाळीतो स्तवन आरती दीनदयाळा कृपाळा

--
Regards,
Raam Choguhule

Mobile No.  +919987261983
Email :-       
raamch...@gmail.com
Website:-    raamchougule.hpage.com
 

--
मी अंबज्ञ आहे
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "Bapu Bhakta" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bapu-bhakta...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.


Reply all
Reply to author
Forward
0 new messages