♡ मन माझे..♡ माझिया प्रियाला प्रीत कळेना - ( चारोळ्या )

5 views
Skip to first unread message

Mukesh Deshmukh

unread,
Jan 26, 2011, 9:05:18 AM1/26/11
to aniket deshpande, AMBAJOG...@googlegroups.com, venkatesh....@relianceada.com

 

 

माझिया प्रियाला प्रीत कळेना - ( चारोळ्या )

 

देवा एकाच मागणी

तिची पापणी भरू दे

माझ्या नावाचा एक तरी थेंब

तिच्या नयनी तरु दे..

-

रात अशी ही तंद्रित

पापणिहि बघ लवते आहे

ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे

कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे

-

तुझी आठवण येते तेव्हा

तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो

तु येणार नाहीस माहित असतं

डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

-

एकही क्षण नाही जेव्हा

तिची आठवण येत नसेल,

असा एकतरी क्षण असेल

जेव्हा ती मला आठवत असेल

-

तू समोर असतेस

तेंव्हा बोलू देत नाहीस |

तू समोर नसतेस

तेंव्हा झोपू देत नाहीस ||

-

तो ढग बघ कसा

बरसण्यासाठी आतुरलाय

तुझ्या चिंब गालावरुन ओघळला

म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय

-

माझ्या शब्दांना अजुन तरी

काहीच अर्थ नाही.

जोपर्यंत त्या गीताला

तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

-

येणारा दिवस कधीच

तुझ्या आठवणीशिवाय जात नाही

दिवस जरी गेला तरी

तुझी आठवण जात नाही.

-

आज सारे विसरली तू

नावही  येई ओठांवर.....

कसे मानू तू कधी

खरे प्रेम करशील कुणावर......

-

तेव्हा सागर किनारी साक्षीने

तू घेतल्यास किती शपथा.....

किती मारल्यास मिठया तू

तो चंद्र ढगात लपता........

-

नजरेत जरी अश्रू असले

तरी ओठावर हास्य असाव

ओठावरच्या हास्यामागे

नजरेतल्या अश्रूना लपवाव.

-

कसे करू माफ़ तुला

जे घाव तू मला दिले......

घेऊन माझी फूले

तू काटेच मला दिले......

-

डोळे पुसण्यास माझे

पाऊस धावूनी आला,

थेंब कोणता तुझा नि माझा

हेच कळेना म्हणाला.

-

आज पुन्हा तुझी आठवण आली

आणि मी उगीच हसु लागलो

खोटं खोटं हसताना...

कळलेच नाहीकधी रडु लागलो...

-

तुझ्या नि माझ्या वाटा,

एकमेकींशी नेहमीच समांतर

एकत्रच चालतात खर तर,

पण मिटत नाही अंतर

-

मनातला प्रत्येक क्षण

ओठांवरती येईल का?

ओठांवरील प्रत्येक शब्द

मनातच राहील का?

 


--
Thanks & Regard's,
Mukeshkumar M. Deshmukh,
9975760596

Reply all
Reply to author
Forward
0 new messages