मोठा माणूस कोण?
राष्ट्रपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज १४ एप्रिल आज सकाळ पासून विविध वर्तमानपत्रातील लेख वाचताना अनुभवलेले राष्ट्रपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
वर्तमानपत्रातील लेख डॉ.यशवंत मनोहर,नागेश गजभिये, रमाकांत जाधव , बी. व्ही. जोंधळे, प्रा. राजेंद्र गोणारकर, जयदेव गायकवाड , श्रीनिवास हेमाडे यांचे आहेत. मी फक्त समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन संकलित केले आहे कुठलाही बदल न करता.
न्यायमूर्ती रानडेंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यात एक व्याख्यान झाले होते. रानडे यांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांनी जगातल्या थोर विचारवंतांचे संदर्भ घेतले. समकालीन इतिहासातील थोर नेते, समाजसुधारक, वॉर हिरोज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना मोठा माणूस कोण असतो, याबाबत अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. त्यांचे ते भाषण ‘गांधी, जिना, रानडे’ ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहे.
या भाषणातील त्यांचे मूलभूत विचार सर्वकाल आपल्याला विचार करायला लावतात. आजच्या देशपातळीवरच्या सामाजिक, राजकीय नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या निकषांचा खूप उपयोग होतो.
रानडेच्या विचारांचा परामर्श घेताना प्रथम ते इतिहास कोण घडवतो असा प्रश्न उपस्थित करून इतिहासनिर्मितीचे जनक कोण, याबाबत असलेले अनेक वाद-प्रवादांचा ऊहापोह करतात. त्या वेळी ऑगस्टीन या विचारवंताचे म्हणणे होते की, ‘इतिहास विधिलिखित असतो.’ जसजशा घटना घडत जातात, तसतसा पूर्व विधिलिखित इतिहास उलगडत जातो. तर बॅकल या विचारवंताचे म्हणणे होते, की ‘विज्ञान व भौगोलिक क्षेत्रात होणारे बदल म्हणजेच इतिहास असतो.’ याच दरम्यान कार्ल मार्क्सने इतिहासाची व्याख्या सांगितली होती. इतिहास हा आर्थिक शक्तीच्या पोटी जन्म घेतो. हे तीनही विचारवंत इतिहासाचे श्रेय माणसाला द्यायला तयार नव्हते. याकडे लक्ष वेधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांशी मतभेद व्यक्त करतात व माणूसच इतिहास घडवतो, असे आग्रही प्रतिपादन करतात.
कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ या महान पदवीसाठी जगातील पाच पंडितांची निवड केली. त्यात प्रमुख नाव होते डॉ. आंबेडकर - एकमेव भारतीय. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, एक महान सुधारक, मानवी हक्काचे आधारस्तंभ असणारे महापराक्रमी पुरुष डॉ. बी. आर. आंबेडकर’ अशा शब्दांत सन्मानाने नाव पुकारले गेले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात अंगावरील गाऊन सांभाळत ‘डॉक्टर ऑफ लॉ’ पदवीचा स्वीकार त्यांनी केला. संपूर्ण भारतातून विद्येचे महान यश एकाच व्यक्तीला का मिळाले, असा प्रश्न सहज पडतो. हे मानवी रसायन समजून घेताना बाबासाहेब विद्याव्यासंगी कसे झाले, त्यांच्या पूर्वजांची पार्श्वभूमी समजून घेणे (त्यांच्या जन्मदिनी) मला महत्त्वाचे वाटते.
माणूसच इतिहास घडवतो यांचे प्रतिपादन करताना ते अमेरिकन प्रेसिडेंट थिओडर रुजवेल्ट यांच्या भाषणाचा संदर्भ देतात. रुझवेल्ट म्हणतात, ‘मानवी जीवनात (किंवा राजकीय पक्ष, सामाजिक, आर्थिक संस्था असेल) कधी असा कालखंड येतो की तेव्हा त्या समाजाचा विकास थांबतो. त्यांची गतीच नष्ट होते. एखाद्या डबक्यासारखा तो समाज प्रवाहपतित होतो. त्या समाजाचा जिवंतपणाच नष्ट होतो. तेव्हा अशा समाजातील तरुणांना ना नवीन कल्पना सुचतात, ना नवीन दृष्टी (Vision) असते आणि समाजातील जुन्या जाणत्या ज्येष्ठानांही पूर्ण निराशा आलेली असते किंवा त्यांना नवीन स्वप्ने पडत नाहीत. समाजाबद्दलच्या आशाआकांक्षाच मरून गेलेल्या असतात.. मग ते भूतकाळात आठवणीवर जगू लागतात. इतिहासातील जुन्या कालखंडात रमू लागतात किंवा त्याच त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतात.
नव्या मार्गाचा शोध
जेव्हा जेव्हा अशा प्रकारे समाजजीवनाला साचलेपण किंवा प्रवाहपतितपणा येतो, किंवा अपयशातून खचल्यासारखा समाज संकटग्रस्त होतो, तेव्हा अशा परिस्थितीतून अशा समाजाला बाहेर काढण्याचे जुने परंपरागत मार्ग निरुपयोगी ठरतात. अशा वेळी नवीन मार्ग शोधावे लागतात. कोणत्याही समाजाच्या जीवनात किंवा वाटचालीत असे प्रवाहपतित झाल्यासारखे कालखंड येत असतात. तेव्हा अशा समाजाने त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग शोधले पाहिजेत आणि अशा समाजाला काळच नवीन मार्ग दाखवतो. मात्र नवीन मार्ग शोधण्याचे काम समाजातील जबाबदार लोकांनी केले पाहिजे. समाजातील जबाबदार लोक नवीन मार्ग शोधू शकतात. त्यातून इतिहास घडत जातो. माणूसच नवीन इतिहास घडवतो. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब इतिहास घडविण्याचे श्रेय माणसाला देतात.
पुढे चर्चा करताना समाजातील मोठा माणूस कोण, असा महत्त्वपूर्ण प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात.अलेक्झांडर, सीझर, टॉमरलेन हे वॉर हीरो मोठे होते काय..? युद्ध जिंकणाऱ्या शूर सेनानींचा तत्कालीन युद्ध काळावर परिणाम असतो, परंतु समाजाच्या जडणघडणीवर विशेष परिणाम होत नसतो असे सांगतात.
--
अंबाजोगाई प्राइड ग्रुप - संघटनात्मक प्रगती !
सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अदिष्ठांन पाहिजे !
AMBAJOG...@googlegroups.com
unsub...@googlegroups.com
375 Members, 1 Owner, 3 Managers.