अंबाजोगाई प्राईड ग्रुप - प्रवासी वृक्षारोपण
अंबाजोगाईकर जे सध्या पुण्यात आहेत त्यांच्या एका डोळ्यात सुख आणि एका डोळ्यात दुःख अशी अवस्था आहे. एका डोळ्यात पुणे,पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूला भरपूर पाऊसच पाऊस आणि मनसोक्त वर्षा पर्यटन - मौज मजा. दुसऱ्या डोळ्यात आपल्या आई-वडील, इतर आप्तेष्टांचे पाण्यासाठी चे हाल, आपल्या शेतकरी मित्रांचे सुकून गेलेले तोंड आणि आबाल-वृद्धांची पावसासाठी दरवर्षी त्याच उमेदीने वाट पाहणे.
मराठवाड्यात परिस्थिती खूप खूप विदारक आहे, रोजचा जगण्याचा संघर्ष आहे. आपल्या 'मराठवाडा स्पिरिट' ला सलाम. 🙏🙏🙏
आपण मराठवाडा सुहृद पण काहीतरी करू शकतो - एक आयडिया आहे.
आपण सगळे विविध कामानिमित्त पुणे - अंबाजोगाई प्रवास करत असतो, रस्त्याची कामे आणि इतर कारणामुळे वेगवेगळे मार्ग घेतो - पाथर्डी, अमळनेर, बीड, वडवणी, धारूर वगैरे वगैरे. बरेच जण स्वतः च्या कार मधूनच कुटुंबासोबत जातो. गणपती, महालक्ष्म्या (गौरी - गणपती), दसरा आणि दिवाळी आणि इतर वैयक्तिक कारणे. फक्त खालील गोष्टी करायच्या आहेत:
१. पुणे - अंबाजोगाई प्रवासात आपल्यासोबत ३-५ रोपे ठेवायची आहेत (कोणत्यापण झाडाची).
२. सोबत छोटे खुरपे, आणि मोठी पाण्याची बाटली / बाटल्या, आणि बाग कामाचे काही साहित्य गाडीत टाकून ठेवा.
३. सोबत घेतलेली रोपे आपल्या कुटुंबासोबत रस्त्यात जिथे झाडे नसतील तिथे त्याचे रोपण करूया.
४. कुटुंबासोबत वृक्षारोपण करण्याचा आनंद घेऊया.
समजा १०० पेक्ष्या जास्त मित्र-मैत्रिणी आपल्या कुटुंबासोबत या प्रवासामध्ये असे ५ रोपे लावली तर ५०० पेक्ष्या जास्त वृक्ष आपल्या या रस्त्यावर दिसतील. आणि जे रोपे नेण्याचे विसरतील त्यांनी लावलेल्या झाडांना आपल्या जवळील पाणी घातले तर उत्तम.
आपण 'APG - प्रवासी वृक्षारोपण' ही चळवळ बनवू या आणि येणाऱ्या काळात आपला पुणे - अंबाजोगाई हा प्रवास एक झाडा झुडपातील लॉन्ग ड्राईव्ह सारखा बनवू या !
सोबतच्या फोटो मध्ये वरील फोटो सौताडा घाटातील आहेत आणि खालील फोटो त्यापुढील रस्त्यातील आहेत, दोन्ही मधील फरक तुम्हाला स्पष्ट जाणवत असेल. घाट चढून गेल्यावर पूर्ण रान उजाड आहे, तिथे झाडे लावून याचा चेहरा मोहरा बदलू शकतो.
ज्यांना रोपे हवी असतील त्यांनी APG ला संपर्क करा त्यांना रोपे उपलब्ध करून देऊ.
चला तर मग करा आपले प्रवासी वृक्षारोपण आणि टाका आपला आणि आपल्या कुटुंबाचा सेल्फी प्राईड ग्रुप वर ...
अंबाजोगाई प्राइड ग्रुप - संघटनात्मक प्रगती !