मराठी कविता संग्रह पाठवा-

4 views
Skip to first unread message

Amar Habib

unread,
Mar 3, 2010, 10:45:49 AM3/3/10
to AMBAJOGAI_PRIDE, amar...@yahoo.com
मराठी कविता संग्रह पाठवा-

अम्बजोगाई ही आद्यकवी मुकुंदराजांची भूमी.
येथेच त्यानी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रन्थ विवेक सिन्धु .
त्यानंतर मराठी कवितेचा अखंड प्रवाह सुरु आहे .
या साडे आठशे वर्षात मराठी कवितेचे रूपान्तर एका महानादीत झाले आहे.

मुकुंदराजांच्या गावात मराठी कवितांचे ग्रंथालय व्हावे असा संकल्प
27 फेब 2010 रोजी मराठी दिनाच्या निमित्ताने आम्ही केला .
अम्बजोगाइची मसाप आणि पत्रकार संघाने कार्यक्रम आयोजित केला होता.

या उपक्रमाची सुरुवात ,
या वर्षी मुकुंदराज यात्रेच्या वेळेला ( डिसेम्बर 2010 )
मराठी कविता संग्रहांचे प्रदर्शन भार्विनार आहोत .
किमान 1000 कविता संग्रह या प्रदर्शनात मांडावेत असा आमचा प्रयत्न आहे.

माझ्या जवळचे सुमारे 130 कविता संग्रह देऊन मी तयारी सुरु केली आहे.

तुमच्या जवळचे मराठी कविता संग्रह तुम्ही दिले तर हां प्रकल्प पूर्ण
होइल.
1) कविता संग्रह मराठी भाषेत असावा
2) पुस्तकाची किम्मत, टपाल खर्च वा अन्य कोणताही खर्च दिला जाणार नाही.
3) आम्बजोगाइत कवितेचे ग्रंथालय स्थापन झाल्यानंतर सर्व पुस्तके या
ग्रंथालायाकडे सुपूर्त केली जातील.
4) खालील पत्यावर कविता संग्रह पाठवावे -
अमर हबीब, परिसर प्रकाशन, अम्बर, हौसिंग सोसाइटी,
अम्बाजोगाई .-431517 ( जिल्हा. बीड )
5) पुस्तके पठविने अशक्य असेल तर वरील पत्त्यावर कलवावे, आम्ही ती
नेण्याची व्यवस्था करू.
6) पुस्तकांच्या देणगीदाराच्या नावाची नोंद ठेवली जाईल.

मराठी कवितेसाठी सुरु केलेला हां प्रकल्प तेंव्हाच सिद्ध होईल जेंव्हा
मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक
उत्स्फूर्तपने आपल्या जवलचे कविता संग्रह स्व -खर्चाने पठावतील किंवा
घेउन जाण्यास संगतील.
तुम्ही आपले योगदान द्या..ही विनंती

Amar Habib

Reply all
Reply to author
Forward
0 new messages