You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to AMBAJOGAI_PRIDE
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 'दीपमाळ' हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. या कवितासंग्रहाच्या भूमिकेत अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या स्वरुपाविषयी काही मते मांडण्यात आली आहेत. स्थानिक साहित्य संमेलन व तेही केवळ स्वागत समितीच्या १०० रुपये निधीवर ! या वैशिष्ट्यांची या लेखात चर्चा करण्यात आली आहे.
दीपमाळची ही प्रस्तावना साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरेल. 'दीपमाळ' हा अंबाजोगाईचा पहिला प्रातिनिधिक कवितासंग्रह. चौथ्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होत आहे. तो रसिकांच्या हातात सुपूर्द करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
वारसा- अंबाजोगाईला मराठीच्या आद्यकवींचा वारसा लाभला आहे. सुमारे साडे नऊशे वर्षांपूर्वी नाथपंथी संत मुकुंदराज यांनी याच गावात 'विवेकसिंधु' या मराठीतील पहिल्या कविताग्रंथाची रचना केली. त्यांची कीर्ती दिगंत होती. मुकुंदराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर माऊली अंबाजोगाईला येऊन गेले, असा दाखला आहे. दासोपंतांना 'सर्वज्ञ' म्हटले जाते. त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. हा नवकोट नारायण याच गावात वावरला. जोगाईचे 'आंबे' म्हणून ओळखले जाणारे हे गाव निजामी राजवटीत असताना स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांनी राष्ट्रीय शाळेचे काम सुरू केले व स्वातंत्र्याचे रणशिंग याच गावात फुंकले. या लढ्याचा एक भाग म्हणून मराठवाडा साहित्य परिषद सुरू करण्यात आली होती. अंबाजोगाईत साधू गुरुजी व अन्य लोक या परिषदेचे काम करीत असत. बाबासाहेब परांजपे हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर हे काम धिमे पडले, मंदावले तरी साहित्याची साधना कायम राहिली. पोस्टात नोकरी करणारे अब्दुल सलाम 'वफा' हे मराठवाडाभर ओळखले जाणारे नामवंत कवी होते. त्याच पिढीतील राम मुकद्दम हे 'रामकाका' म्हणून सर्वांना परिचित होते. रामकाकांनी या गावाला सांस्कृतिक व साहित्यिक चेहरा देण्यात मोठे योगदान केले. १९८३ साली अंबाजोगाईत ५७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. व्यंकटेश माडगूळकर अध्यक्ष होते. महाराष्ट्रभरातून साहित्यिक आले होते. या संमेलनाच्या तयारीसाठी अख्खे गाव राबले होते. तरीही डॉ. व्यंकटराव डावळे, प्राचार्य भ.कि.सबनीस, भगवानराव लोमटे, डॉ.द्वारकादास लोहिया आणि राम मुकद्दम या लोकांनी केलेली धडपड अंबाजोगाईची साहित्य चळवळ कधीच विसरू शकणार नाही.
अंबाजोगाई साहित्य संमेलन- अंबाजोगाई साहित्य संमेलनाला वरीलप्रमाणे वारसा लाभला आहे. १९९६ साली प्रा. रंगनाथ तिवारी, अमर हबीब, डॉ.श्रीहरी नागरगोजे व प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी साहित्य संमेलन घेण्याचा विचार केला. प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये जमा केले व अंबाजोगाईचे स्थानिक साहित्य संमेलन घेण्याचे पक्के केले. डॉ. नागरगोजे यांनी जबाबदारी स्वीकारली. ते स्वागताध्यक्ष झाले. गावचे संमेलन ही कल्पनाच नवी. त्यात ठरले असे की स्वागत सभासद नोंदवून केवळ साहित्यिक आणि रसिकांच्या पैश्यानेच संमेलन घ्यायचे. जमतील तेवढ्या पैश्यात संमेलन घेऊ, मात्र कोणाकडे देणगीसाठी हात पसरवणार नाही, असा निर्धार केला. रसिक-साहित्यिकांना ही कल्पना पसंत पडली. भरभरून सभासद झाले. शानदार संमेलन घेता आले. या संमेलनाचे वैशिष्ट्यच असे आहे की, या संमेलनासाठी देणग्या गोळा करायच्या नाहीत. सरकारी मदत तर सोडा, धनदांडग्यांकडूनही मदत घ्यायची नाही. रसिक- साहित्यिकांकडून समान रकमेचा निधी गोळा करून हे संमेलन साजरे केले जाते. दुसर्या भाषेत बोलायचे तर या संमेलनाचा आर्थिक कणा हा स्वाभिमानाचा आहे. हे संमेलन गावचे आहे. गावात विविध भाषा बोलल्या जातात. विविध भाषांमधून साहित्य निर्माण होते. सृजनही मूळ बाब. भाषा हे माध्यम आहे. गावचे साहित्य संमेलन असल्यामुळे अन्य भाषांसाठी या संमेलनाने आपले द्वार खुले ठेवले. त्यामुळे काही उर्दू कवी यात सहभागी झाले. विविधतेतून एकता ही भावना रुजवायची असेल तर अशी संमेलने निश्चित उपयोगी ठरतात. मराठी भाषकांचा सहभाग मोठा असणे स्वाभाविक आहे. मात्र दार खुले असतानाही अन्य भाषक साहित्य का दबकतात हे समजू शकत नाही.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोठे वाद होतात. यावर आम्ही एक तोडगा काढला. मावळत्या अध्यक्षाने नव्या अध्यक्षाचे नाव प्रास्तावित करायचे. ते नाव मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीला मान्य असेल तर ते नाव जाहीर करायचे. जर कार्यकारिणीत एकमत झाले नाही तर कार्यकारिणीने निर्वाचन अधिकारी नेमायचा. म.सा.प.चे आजीव सदस्य व स्वागत सभासद हे मतदार राहतील. त्यांनी नवा अध्यक्ष निवडायचा. पहिला अध्यक्ष निवडताना निवडणुकीची वेळ आली होती. त्यानंतर मात्र या चौथ्या संमेलनापर्यंत कधीही निवडणुकीची वेळ आली नाही. पहिले अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी डॉ. शैला लोहिया यांचे नाव सुचविले, डॉ. शैला लोहिया यांनी प्रा.रा.द.अरगडे यांचे नाव सुचविले. यंदा प्रा. अरगडे यांनी बलभीम तरकसे यांचे नाव सुचविले. कार्यकारिणीने त्यास मान्यता दिली. स्वागत सभासदांच्या बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणुका टाळूनही लोकशाही परंपरा जपता येते याचा वस्तुपाठ या अनुभवातून मिळाला. कोणत्याही साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणाला विशेष महत्त्व असते. अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या सर्व अध्यक्षांची भाषणे या गावाच्या वाटचालीचे मार्मिक विश्लेषण करतात. त्या सर्वांना एकत्र करून कधीतरी त्याचाही संग्रह प्रकाशित करावा लागेल. या संमेलनाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. यात ठराव केले जात नाहीत. संकल्प केले जातात. ठिकठिकाणी होणार्या साहित्य संमेलनात ठराव घेण्याची पद्धत आहे. ठरावांसाठी वाद केले जातात. परंतु पुढे त्या ठरावांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. अखिल भरतीय पातळीवरील अनेक ठरावांची अशी दुरवस्था झाली आहे. ठराव करून उपचार पूर्ण करण्याऐवजी संकल्प करणे जास्त जमिनीवरचे ठरते. मी काय करणार आहे? आम्ही काय करणार आहोत? हे रोखठोक सांगणे उपयुक्त असते. संकल्प करताना जबाबदारी येते. ठराव करताना ती असणे अनिवार्य नसते. म्हणून या संमेलनात ठरावांऐवजी संकल्प करण्याची पद्धत सुरू करण्यात आली. संमेलनातील विषय आणि संमेलनातील सहभाग या दोन्ही बाबतीत स्थानिकता जपण्यात येते. 'अंबाजोगाईतील साहित्य' या विषयावर परिसंवाद झाले. त्या निमित्ताने भरपूर माहिती संकलित झाली. स्थानिक संमेलनाचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की, त्या निमित्ताने माहितीचे संकलन केले जाते.
गाकातील लेखक ककींना या निमित्ताने व्यासपीठ मिळते. नव्या प्रतिभाकंतांची गाकाला ओळख होते तसेच या प्रतिभाकंतांना मिळालेला प्रतिसाद जोखता येतो. संमेलनाच्या निमित्ताने जे किकिध उपक्रम घेतले जातात ते फार महत्त्काचे असतात. कधी अंबाजोगाईच्या साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन केले जाते, तर कधी 'ककी आपल्या शाळेत' असा उपक्रम राबकिला जातो. किकिध काङमय् प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात येतात. शाळकरी किद्यार्थ्यांच्या प्रतिभेला काक मिळाका म्हणून यंदा भिंतीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच अंबाजोगाईचा प्रातिनिधिक ककितासंग्रह प्रकाशित करण्याचे ठरले.
प्रातिनिधिक ककितासंग्रह- १९५२ साली अंबाजोगाईच्या ककींचा पहिला प्रातिनिधिक ककितासंग्रह प्रकाशित झाला. 'पारिजाताची फुले' असे त्याचे नाक. हा संग्रह मराठकाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेने काढला होता. यात रा.स.देशपांडे, राम मुकद्दम, त्र्यंबक कसेकर, कि.कै.रामपूरकर, किष्णुकुमार देशमाने, दे.भा.धर्माधिकारी, ल.म.देशपांडे, पु.शे.जकळगेकर, रंगराक देशपांडे, भगकानराक डोंगरे, भा.के.कुर्डूकर, किठ्ठल संतराम गिरकलकर यांच्या ककिता होत्या. एकनाथराक कुळकर्णी यांची या छोटेखानी संग्रहाला मार्मिक प्रस्ताकना लाभली. या संग्रहातील रा.स.देशपांडे क राम मुकद्दम यांची ककी म्हणून महाराष्ट्राला ओळख झाली. 'पारिजाताची फुले' हा अंबाजोगाईचा पहिला प्रातिनिधिक ककितासंग्रह आहे हे मान्य करतानाच त्यात अन्य भाषिक ककींचा समाकेश नव्हता याचीही नोंद घ्याकी लागेल. तब्बल दहा कर्षांनंतर १९६२ साली, मराठकाडा पातळीकर 'चंद्र लपे पापणीत' हा ककितासंग्रह प्रकाशित झाला. त्यात अंबाजोगाईचे रा.स. देशपांडे, राम मुकद्दम, श्री.दि.इनामदार, प्रा. प. श्री. संभूस, गोपाळराक कांगीकर, यांच्या ककिता प्रकाशित झाल्या. 'चंद्र लपे पापणीत' या ककितासंग्रहात अंबाजोगाईच्या ककींच्या ककिता जरूर होत्या परंतु तो अंबाजोगाईचा प्रातिनिधिक ककितासंग्रह नव्हता. ज्यांनी तो काढला त्यांचा तसा दाकाही नव्हता. 'दीपमाळ' हा अंबाजोगाईचा सर्कसमाकेशक असा प्रातिनिधिक ककितासंग्रह आहे. असा संग्रह या पूर्की प्रकाशित झालेला नाही.
या कवितासंग्रहात- मुकुंदराजांच्या पद्यांपासून या कवितासंग्रहाची सुरुवात केली आहे. सुरुवातीला दिवंगत कवींच्या रचना आहेत. या संकलनात सर्व दिवंगत कवींच्या रचनांचा आम्हाला समावेश करता आला नाही, याची खंत आहे. वेळेच्या आत संग्रह प्रकाशित करायचा असल्यामुळे जेवढ्या उपलब्ध झाल्या तेवढ्यांचा समावेश केला आहे. अंबाजोगाईच्या कवींचे पाच गट करता येतील. पहिला, ज्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. दुसरा, कवीसंमेलनात भाग घेणरे कवी, तिसरा, ज्यांच्या कविता वारंवार प्रकाशित होतात, चौथे नवोदित कवी आणि पाचवा, मराठीतर कवी. या संग्रहात शंभराहून अधिक कवी सहभागी झाले आहेत. काही कवी राहून गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही वर्तमानपत्रात जाहीर केले. प्रत्यक्ष भेटून कविता मागितल्या. निरोप दिले. एस.एम.एस. पाठविले. ज्यांच्या कविता मिळाल्या त्या सर्व या संग्रहात घेतल्या आहेत. ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांच्या पुढे कधीतरी टाकता येतील. मागूनही ज्यांनी दिल्या नाहीत, त्यांना आमचा नमस्कार ! या सर्व कवितांकडे एक नजर टाकली तर ठळकपणे जाणवते की, अंबाजोगाईची कविता आशय आणि आकृतीबंध या दोन्ही बाबतीत भक्कम आहे. एका गावातील या कवींनी किती विषय हाताळले आहेत? शेकडो विषय आहेत. हळूवार प्रेमाच्या गुजगोष्टी, आईचे माहात्म्य, मुलांविषयी, देशभक्तीपर, दलितांचा आक्रोश, शेतकर्यांची दुर्दशा, धार्मिक, गावावरच्या कविता, स्त्री अनुभूती, वर्तमानातील भकासपणा, कोसळणारे मनोरे, उद्याची आकांक्षा, काय आणि काय.. अंबाजोगाईच्या कवींचे विषयाचे आकलन तगडे आहे याची हा कवितासंग्रह वाचताना खात्री पटेल. मराठी कवितेत वापरले जाणारे आकृतीबंधाचे जवळपास सर्व प्रकार येथे मांडीला मांडी लावून बसले आहेत. वृत्तबद्ध कविता आहे तशी मुक्तछंदातीलही आहे, येथे ग़ज़ल आहे तसे अभंगही आहेत. सगळे बाज येथे वाचता येतील. त्यांचा आस्वाद घेता येईल.
सूचना तरुण कवींनी अनुभवी कवींच्या कविता नीटपणे समजावून घेतल्या पाहिजेत. आपण आपल्या भावना लिहिल्या म्हणजे झाली कविता, एवढे अल्पसंतुष्ट राहून चालणार नाही. कविता काय असते? कविता म्हणजे प्रतिमांची अर्थपूर्ण मालिका. आपण जे लिहिले त्यात प्रतिमा आहे का? हे तपासून पाहिले पाहिजे. प्रतिमा नसेल तर सरळ गद्य लिहावे. गद्य लिहिणे का कमी महत्त्वाचे आहे? समाजाला तशा लिखाणाचीही गरज असते. परंतु कविता लिहायची असेल तर त्यात प्रतिमा वापरावी लागेल. चपखल शब्द बसवावे लागतील. आशय तर हवाच हवा. सुदैवाने अंबाजोगाईत ज्येष्ठ कवी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे. कार्यशाळांसारखे कार्यक्रम व्हायला हवेत. यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने पुढाकार घ्यायला हवा. या संग्रहाच्या निमित्ताने कवितेचा सहवास लाभला. गावातील आणि भोवतालच्या कवींचे अंतरंग समजून घेता आले. त्यांच्या ह्या कविता एक-एक दीप आहेत. या दीपांची ही 'दीपमाळ' आपण स्वीकार करावी, ही विनंती.
अमर हबीब, दिनकर जोशी, विश्वंभर वराट संपादक मंडळ
-- Prasad Chikshe Jnana Prabodhini,"Madhu-Smruti"Keshav Nager,Ambajogai,431517 Mobile No:-+919421373536 Phone No:-02446248912