Fwd: Something different...

1 view
Skip to first unread message

Gajanan Deshpande

unread,
Mar 5, 2011, 2:51:45 AM3/5/11
to ambajogai_pride



काहीतरी नविन !

by Navin Kale on Thursday, February 17, 2011 at 9:58am

ही गोष्ट आहे अडीच वर्षांपूर्वीची. मी रिक्षात बसलो होतो. माझ्या बाबांचा फोन आला. गुजरात मध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाले होते.

मी फोन ठेवला. बातमीचं ओझं सहन होईनाम्हणून माझ्या रिक्षावाल्याला ती बातमी सांगितली. त्याने 'चक-चककेलं.

म्हणाला, ' मेरे सब रिश्तेदार सुरत में है |'  'आप गुजराती हो ?' मी आश्चर्याने विचारलं. मी 'गुजराती चालकाच्यारिक्षात प्रथमच बसत होतो.

'जी हां. मै पार्ला रहता हुं |'   पार्ल्यात राहणारा गुजराती माणूस रिक्षा चालवतोय मला हे interesting वाटलं. मला यात एका लेखाचा विषय दिसू लागला. आमचं पुढचं हिंदीतून झालेलं संभाषण सोयीसाठी मराठीत देत आहे.  'रिक्षा चालवणारा गुजराती माणूस मी पहिल्यांदा पाहिला.मी म्हणालो.

'साहेबसगळे तेच म्हणतात.रिक्षावाला.  'पार्ल्यात कुठे राह्ता?' मी.  'मी पार्ला वेस्ट ला राहतो. आत्ता आपण ज्या सिग्नलशी आहोत त्याच्या समोरच्या गल्लीत.रिक्षावाला.  'हो बरोबरतिथे आत त्या चाळी आहेत.मी.  'तिथे नाही साहेब. त्या चाळी समोर एक बिल्डींग आहे. त्या बिल्डींगचं re-development करायचं चालू आहे.रिक्षावाला.  'मग नंतर किती जागा मिळेल तुम्हाला ?' मी.  'साहेबमाझा आत्ता ६०० एरिया आहे. टू बीएचके आहे.रिक्षावाला.  मी रिक्षात कोसळायचा बाकी होतो. माझ्यातला माणूस’ ओरडला - नको विचारूस 'तो'प्रश्न.... पण माझ्यातला लेखक’ आणखी जोरात ओरडला – ‘विचार बिंधास! तोंड उघडलं नाहीस तर लिहिणार काय ?'  'माणूसनविन काळे हरला. सगळी लाज-शरम बाजूला ठेवून लेखक महाशयांनी विचारलं - 'पार्ल्यात टू बीएचके असून रिक्षा चालवता ?'  त्या रिक्षावाल्याला माझ्या सुमार विचारांची दया आली असणार. तो म्हणाला, 'हाही प्रश्न माझ्यासाठी नवीन नाही. साहेब, actually हे घर माझ्या वडिलांनी चाळीस वर्षांपूर्वी विकत घेतलं होतं. आमचा एक छोटा कारखाना आहे. बुफे जेवणात शेगडीत जे wax टाकतात नात्याचा. फाइव-स्टार हॉटेल्सना आम्ही ते wax पुरवतो. त्या मालाची ने-आण करण्यासाठी ही रिक्षा बरी पडते. उरलेल्या वेळात मी रिक्षाची भाडी घेतो. मी रिक्षा चालवतो म्हणून माझे नातेवाईक-मित्र मला हसतात. पण साहेब तुम्हीच सांगारिक्षा चालवतोयचोरी तर नाही करत नामी मिठीबाई कॉलेज मधून बी कॉम केलं आणि वडिलांना आणि भावाला मदत म्हणून या wax च्या धंद्यात पडलो. सकाळी सहा ते रात्री दहा रिक्षा चालवतो. तुम्हीच सांगा साहेबउद्या माझ्या कुटुंबाला जर काही झालं तर मला हसणारे किती लोक पुढे येऊन मदत करतील मला माहित्येकोणीच नाही करणार. मेहनत करतोय मीत्याची 'लाजका वाटून घेऊमी बरोबर बोलतोय ना साहेब ?' तो रिक्षावाला त्याच्या समोरच्या आरशातून माझ्याकडे बघत म्हणाला.  एवढं सगळं ऐकून मीच आता त्याला 'साहेबम्हणावं असं वाटू लागलं.  'घरी कोण कोण असतं?' लेखक महाशयांची आता भूक चाळवली होती.  'मीमाझे वडीलमाझा लहान भाऊमाझी बायको आणि माझी मुलगी. मुलगी झाल्यावर बायकोला सांगितलंदुसऱ्या मुलासाठी चान्स घ्यायचा नाही. या मुलीलाच भरपूर शिकवायचं आणि मोठं करायचं. माझी मुलगी आत्ता पाचवीत आहे. उत्पल संघवी शाळेत जाते. माहित्ये ना साहेबजुहूला अमिताभच्या बंगल्यासमोरची शाळा. तिचा महिन्याचा खर्च तीन हजार वगैरे येतो. पण मी ठरवलंय की कितीही खर्च येऊ देमुलीला उत्तम शिक्षण द्यायचं.’   मी काही दिवसातच बाप होणार असल्याचं त्याला सांगितलं.   तो म्हणाला, 'तुम्ही बाप होणारात म्हणून सांगतो. मुलांना तुमचा पैसा नको असतोखेळणी नको असतात. त्यांना तुमचे संस्कार हवे असतात-तुमचा वेळ हवा असतो.'   माझं घर आलं. मीटर प्रमाणे पन्नास रुपये झाले होते. का कुणास ठाऊकमी त्याला दहा रुपये जास्त दिले. तो आनंदाने thank you म्हणाला.  मी म्हटलं, 'तुमचा मोबाईल नंबर द्या. मी बाप झालो की कळवेन.त्याने त्याचा नंबरदिला. मी नंबर सेव केला आणि मोबाईलवर नाव टाईप केलं - विजय जेठवा !   विजय म्हणाला, 'आप को all the best. जो भी होगा वोhealthy होगा|'   त्यानंतर चार-पाच दिवसातच मी बाप झालो. त्या दिवशी मी आठवणीने त्याला फोन केला. 'मुलगाझाल्याचं सांगितलं. बातमी ऐकून विजय जेठवा खूष झाला. 'काहीही लागलं तर सांगाअसंही वर म्हणाला.  त्या दिवसानंतर आम्ही ना एकमेकांना भेटलोना एकमेकांशी बोललो.   विजय जेठवा मला नक्कीच विसरला असेलपण मी त्याला विसरणं शक्य नाही.  विजय जेठवासारखी लाखो अनाम माणसं अपार कष्ट उपसत असतील. आयुष्यातला कडवटपणा थुंकून रोजच्या जगण्याला भिडत असतील.  त्यांचा चेहरा भले टीव्हीवृत्तपत्रात झळकत नसेल पण त्यांच्या पासून जगण्याची प्रेरणा घेणारी त्यांची चिमुरडी मुलंच त्यांचे प्रेक्षक - वाचक असतील.    माझी खात्री आहे की विजय जेठवाला भेटून माझ्या इतकंच तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल.  मला वाटतंहे आश्चर्य वाटण्यातच खरी गोची आहे !   आपण एखाद्या माणसाच्या 'कामधंद्यावरून त्या माणसाची जात -भाषा ठरवतो. त्याची आर्थिक मिळकत ठरवतो. त्याच्या घराचा एरिया ठरवतो. त्याने कसा विचार करायचा तेही आपणच ठरवतो.... एखाद्याला लेबल फार चट्कन लावतो आपण.  कारण आपण 'गर्दीअसतो !   'गर्दीला स्वतंत्र विचार नसतो. Rather कुणी काही वेगळा विचार करू नये याची चोख काळजी 'गर्दीघेत असते. जे तुरळक लोक वेगळा विचार करतात त्यांना 'गर्दीबाहेर फेकून दिलं जातं. विजय जेठवा सारखी माणसं 'गर्दीला न जुमानता स्वतः चा रस्ता तयार करतात. ते त्यात अपयशी झाले तर 'गर्दीच्या चेष्टेचा विषय बनतात. पण जर (गर्दीच्या मापदंडाप्रमाणे) यशस्वी ठरले तर तीच 'गर्दीत्या माणसांना शेंदूर फासून त्यांचा उदो उदो करते.    माझ्या आयुष्यात 'गर्दी'वेगळं करायचे जे काही थोडेफार प्रसंग आले असतील त्यात विजय जेठवाच्या त्या अर्धा तास भेटीचा मोठा वाटा आहे.  'माणूसनविन काळेला विजय जेठवाचा हात हातात घेऊन हे कधीतरी सांगायचंय !  

 नविन अनिल काळे

(सतरा फेब्रुवारी दोन हजार अकरा)



-- 
SHREERANG KULKARNI
National Secretary, ABVP
136, North Avenue, Delhi.
011-43098248
09560400095




--
Gajanan S. Deshpande
Reply all
Reply to author
Forward
0 new messages