होय.. मला लागलीय चाहुल तुझ्या येण्याची....
आणी तुझ्या संततधार बरसन्याची.....
पण तू खरच येशील ना ???
तू येण्या आधीच आम्ही आतून ओले झालो आहोत
तुझ्या येण्याच्या चाहुलीने
तुझ्या सोबत येणारा मातीचा तो सुगंध...
ती मातीही आतुर झाली आहे
कात टाकलेल्या जमीनी ही सुखावाल्या आहेत
त्यानी सोसलेले उन सोबत घेवून जाशील या आशेने
तुझी संततधार बरसत रहावी अस त्यानाही वाटतेय
पण तू खरच येशील ना ???
कोरडे पडलेल्या नद्या आणि नाले
उन्हात तद्कुन भाजलेले रस्ते
कुणाची छप्पर, गची, आणि कुणाचे टेरस
तु़ला कवेत घेण्यासाठी आतुर आहेत
पण तू खरच येशील ना ???
...ये मेघराजा...ये रे ये...
"शरद पुराणिक"
--
Live, Life, Love & Like have so similar spellings & pronunciation, I often mistake them to be synonyms!