khupach chan...SWINE FLU

1 view
Skip to first unread message

Anand Kulkarni

unread,
Sep 15, 2009, 7:16:39 AM9/15/09
to AMBAJOGAI_PRIDE

बायको, मी आणि मास्क Print E-mail

आता या डुकराचे आम्ही  काय घोडे मारले होते आम्हाला कळत नाही. एरवी उकिरडय़ावर गुजराण करणारी व तेथेच आपली वंशवृद्धी करणारी ही जमात अशी एकाएकी सगळ्यांच्या जिवावर उठेल असेही वाटले नव्हते. अक्षरश: साऱ्यांना तोंड नाक मुठीत धरून शरण यायला या प्रजातीने भाग पाडले. हल्ली ‘ए डुकरा’ म्हणून कुणाला म्हटले तरी राग येतो. या परदेशातून आयात केलेल्या रोगामुळे एक बरे झाले. बऱ्याच जणांना ‘स्वाईन’ या शब्दांचा अर्थ कळला. ‘वाईन’ सगळ्यांनाच माहीत आहे आणि आपल्या शरदकाकांनी तिला जरा दर्जा व प्रेस्टिजही बहाल केले. वायनरी उद्योग वाढला मग स्वायनरी उद्योग का वाढू नये? तसे निरुपद्रवी असलेले डुक्कर पुणे-मुंबईच्या डोक्याला एवढा ‘ताप’ देईल अशी कल्पना कुणालाच नव्हती. डुकरांचा हा आतंकवादी हल्ला तसा आकाशमार्गानेच आला. जसजसे दिवस उलटत होते तसतसे त्याचे रूप व्यापक बनत गेले. मग इतरांना ‘डुकरा एवढीही’ किंमत न देणाऱ्या पुण्यावर या स्वाईन फ्लूने पहिला हल्ला केला. नाहीतरी पुणेकर वादाचे विषय उकरून काढत असतात म्हणून तेथे पहिली लागण झाली असावी. ‘कसला आलाय हो स्वाईन फ्लू, परदेशी औषध कंपन्यांचा औषधे संपविण्याचा हा एक मोठा स्टंट आहे,’ असे कुणीतरी पुणेकर बोललाच. ‘नाकाला सपशा कशास बांधता, सकाळ-संध्याकाळ गोमूत्राची चार आचमने घ्या. तो स्वाईन का फाईन जवळपास पण फिरकणार नाही शिंच्यांनो.’ आणखी एक विद्वत्तापूर्ण तोडगा. बाकी जगातल्या सर्व प्रश्नांवर पर्वतीच्या कट्टय़ावरील पुणेकरांकडे असे अनेक तोडगे असतातच.
होता होता मुंबईत ‘डुकऱ्या ताप’ शिरला आणि आमच्या हिला एकदम आमची काळजी वाटू लागली. ‘तुम्ही दोन-चार वर्षे पुण्यास कॉलेजला होता आणि पुणेकरांचे अर्धेअधिक गुण तुमच्यात आहेत म्हणजे तुम्ही जरा जपूनच राहा. हा ताप डुकरांना प्रथम होतो आणि तुम्हीपण घरात आलात की डुकरांसारखे लोळत पडलेले असता, तसेच त्यांच्यासारखे तुम्हाला काहीही खायला चालते म्हणून मला काळजी हो.’ आम्ही डुकरासारखे खाली मान घालून कायम घरात असतो म्हणून तिची ही मुक्ताफळे आम्ही ऐकून घेतली. पण या  विचित्र तापाच्या कहाण्या भर श्रावणात पेपरवाल्यांनी छापल्या आणि चॅनेलवाल्यांनी सचित्र दाखविल्या, ‘ऐका पुणेकरा तुमची कहाणीपासून ते कहाणी खुलभर गोमूत्राची इथपर्यंत सोळा सोमवारी सोळा उपचार कोणते घ्यावेत यासहित सारे काही तोंडपाठ झाले. तेवढेच श्रावणातले ‘पुण्य’ (पुण्याचे) पदरात पडले. बाहेर जाताना तोंडाला रुमाल बांधा, उद्या मी ते मास्क का फास्क काय म्हणतात ते शिवून ठेवते आणि त्याला चार टोकांच्या दोन नाडय़ा असतात त्या नीट बांधा. साधी लेंग्याची नाडी पण तुमची बाहेर लोंबत असते.’ हे सारे आम्ही ऐकून घेतले. ‘अगं पण ते मास्क शिवण्यासाठी तुला कापड आणावे लागेल.’ ‘काही गरज नाही. तुमचे जुने लेंगे आहेत त्याचेच बनवते आणि डिर्टजटमध्ये धुऊन काढते. नाहीतरी ते टीव्हीवाले डिर्टजट पावडर वापरून हात-पाय धुण्यास सांगतच असतात की, आम्ही आमच्या दोन्ही (डु)करांनी तिला नमस्कार केला. तिने दुसऱ्याच दिवशी ते घरगुती मास्क आमच्या हाती दिले. तोंडावर ठेवून दोन्ही नाडय़ा बांधताना चांगलीच तारांबळ उडाली. शेवटी हिने बरोबर नाडय़ा बांधून दिल्या आणि आमच्या मुसक्या की मास्क्या बांधल्या. बरोबर आहे इतक्या वर्षांच्या सहवासानंतर आमची ‘नाडी’ हिलाच बरोबर कळते.
असे तोंड झाकून आम्ही बाहेर पडलो तर पहिल्यांदा दोन कुत्रीच आमच्या अंगावर भुंकू लागली. आधीच स्वाईन तापाची भीती आता या डॉग तापाची पण भीती वाटू लागली. रोजच्या चणेवाल्याकडून नेहमीसारखे चिमूटभर चणे तोंडात टाकणे पण जमेना. फिल्टर कॉफी पिताना हा गावठी मास्क काढणे विसरून आम्ही कप तोंडाला लावला आणि कॉफी डबल फिल्टर झाली. पलीकडच्या दोघीजणी हे सारे पाहून फिस्कन हसल्या आणि आम्ही रागाने तो मुखपडदा ओरबाडला आणि फेकून दिला. घरी येऊन पाहतो तर हिने दाराबाहेर पाटी लावून ठेवली होती, ‘‘येथे घरगुती ‘मास्क’ मिळतील. किंमत फक्त दहा रुपये’’ आणि आमची ही आमचा चांगला पांढराशुभ्र लेंगा फाडत बसली होती. स्वाईन आल्याचे दु:ख नाही, पण मास्क सोकावतोय त्याचे काय?

Reply all
Reply to author
Forward
0 new messages