|| *Let's learn to unlearn*:Need 4 future||
▪️[ *आदिवासी भाषा* : दिस बदलत जात]
हाफिसात सतरां वरसां पायसीं टीम लीडर होतुं, गेले महिन्या पायसीं माझा कामं बदलालाहे. पहले माझे कड टीम होतीं, मी टीम लीडर होतुं ना इंजिनीअरांकडसीं डिझाईन करून घेय. आथां आखे कंपनीत रोबस्ट इंजिनिअरिंग वर जो कोणी काम करील त्याला शिकवायचा काम आहे. काल एक मस्त नवीन गाना माझे फेवरेट लिस्ट मध्ये आलाहें माहित नीही क्या पन भलतें वेलस आयकून झालांहें, आयकजास तुम्हीं हो तेलगू आहे, बेस रेहजा!
https://youtu.be/bIDSga_3KuI?si=wKBrl8ZrQn1-XlCU
▪️[मराठी भाषा : *काळ वेळ बदल*]
ऑटोमोटिव्ह रिसर्च सेंटर मध्ये विविध पदावरून १७ वर्ष टीम लीड म्हणून काम केल्यावर, गेल्या महिन्यांपासून माझ्यिकडे नविन दायित्व आहे. भारतात कमर्शिअल वेहिकल चा प्लॅन आणि हायड्रोजन फ्युएल सेल गाडयांना आणखीन वेळ असल्याने माझी टीम विसर्जित केलीय. सध्या माझ्याकडे या R&D केंद्रात रोबस्ट इंजिनिअरिंग चा मार्गदर्शक म्हणून दायित्व मिळाले आहे. नवीन आहे सगळे, शिकतो आहे हळू हळू.
▪️[दोन शब्द सामाजिक : *बदल आणि अस्तित्व*]
मानवाच्या, विज्ञानाच्या, पर्यावरणाच्या, देशाच्या, राज्याच्या, जमातीच्या, कटुंबाच्या, किंवा संस्कृती आणि परंपरा च्या जडणघडणीत वेग वेगळे पर्व येतात. वेग वेगळ्या गतीने काळ वेळेनुसार अनुकूल बदल होत राहतात. आणि ते होत राहतील, हा निसर्ग नियम आहे. याचे प्रॅक्टिकल उदाहरणे जभरातील आदिवासी जीवनमूल्यांत आहेत, चलो प्रयत्न करूया यातून आदिवासीत्व जिवंत ठेवूया.
त्या त्या वेळेस जे महत्वाचे आहे त्यासाठी *आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक जागरूकता/उपाययोजना/व्यवस्था उभी केल्यास आदिवासी समाजाचे स्वावलंबनासाठी प्रभावीपणे हातभार* लागू शकेल. चलो त्या दिशेने प्रयत्न करूया Let’s do it together! [💡लवकरच लॉन्ग टर्म (15वर्ष नियोजन) साठी सविस्तर *प्रेझेन्टेशन पाठवेन त्यावर आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना अपेक्षित*🙏🏻]. जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!