Fwd: "तिला पंख देऊयात" - इनायत उपक्रम मार्फत १००० किशोरवयीन आणि महिलांना मार्गर्शन
3 views
Skip to first unread message
AYUSH main
unread,
Sep 25, 2025, 11:24:54 AM (12 days ago) Sep 25
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to AYUSH google group
"तिला पंख देऊयात" - इनायत उपक्रम मार्फत १००० किशोरवयीन आणि महिलांना मार्गर्शन आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्यसेवा, आर्थिक सक्षमता आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या नक्कीच यशस्वी होऊ शकतात, या विचाराला प्रत्यक्षात आणत इनॅक्टस HR कॉमर्स आणि इकॉनॉमि कॉलेज आणि आदिवासी युवा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इनायत उपक्रम अंतर्गत "गिव्ह हर विंग्स'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डहाणू तालुक्यातील धानीवरी-ओसरविरा, आश्रम शाळा महालक्ष्मी आणि आश्रम शाळा मुरबाड-कांदरवाडी येथे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कॉलेज च्या नंदिनी अगरवाल, महक खान, आयुश संस्थेचे स्वयंसेवक, डॉ. मोनाली यांनी विशेष पाठपुरावा केला. तसेच त्यांच्यासोबत विषयाचे तज्ञ मार्गदर्शक आणि कॉलेज चे ४० स्वयंसेवक सहभागी झाले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश किशोरवयीन मुली आणि महिलांना मासिक पाळीच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देणे हा होता. यावेळी मासिक पाळीच्या स्वच्छतेचे नियोजन आणि महत्त्व याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित महिला आणि मुलींना 'इनायत किट'चे वाटप करण्यात आले. एकूण १००० किट्सचे वाटप करण्यात आले, ज्यात ३ कापडी बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्स आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता. या कार्यक्रमात तवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनाली सर्वगोड यांनी मार्गदर्शन करताना महिला आणि किशोरवयीन मुलींना मोलाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, 'काही पारंपरिक पद्धती, सकस आहाराची कमतरता आणि घरगुती तसेच व्यावसायिक कामाचा दुहेरी भार यामुळे आदिवासी महिलांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र, शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास त्या नक्कीच सक्षम होऊ शकतात.' या उपक्रमाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी महालक्ष्मी आश्रम शाळेला भेट देऊन कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व CHO, ANM, आशा ताई, अंगणवाडी सेविका, MPW, शिक्षकवृंद आणि स्थानिक गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. [डहाणू, दिनांक: २२ सप्टेंबर २०२५]hashtag#महिलासक्षमीकरणhashtag#आदिवासीविकासhashtag#आरोग्यजागृतीhashtag#इनॅक्टसhashtag#इनॅक्टसHRकॉलेजhashtag#सामाजिककार्यhashtag#CSR