Tommorow : Kardan Cha Bohada (Gudi Padwa)
From: AYUSH - adivasi yuva shakti [mailto:ay...@adiyuva.in]
Sent: 19 January 2012 06:45
To: 'vans...@gmail.com'
Subject: [Festival] Virtual Tour Of Bohada 2011
AYUSH festival | ||||||||||||||||||||||||||||||||
This mail is sent you for promotion of our tribal festivals | ||||||||||||||||||||||||||||||||
हो ना आपल सन त आजकाल लोखा विसराया लागलिहात, काय करशिल चकमकित जगाला लोखा भुलताहात, पन आपले सन विसरजोस नोको हाव, आपले सना चा आठोव करुन दिया यो मेल हाव! | ||||||||||||||||||||||||||||||||
Bohada | ||||||||||||||||||||||||||||||||
Dear friends we are eagerly waiting for your valuable response, Its understandable truth that most of people unable to manage their busy schedule to attend Bohada, so bringing virtual tour of bohada festival
Why we are insisting all of you for this cultural event? Ans is simple, its not just A dancing or singing but apart from it, is brief history of our natural civilization here it chance comes to know how our Martial men living their life full of adventures and dangers from past thousands of years.
We must understand the importance of our tribal tradition, instead of just copying imported festivals, so it is humble request to young generation to help us to promote, preserve our tribal culture in all possible ways.
Let us do it together!
For information Tribal tradition treats nature as god We pray all the time to nature
| ||||||||||||||||||||||||||||||||
For regular updates on our activities please visit – www.adiyuva.in | ||||||||||||||||||||||||||||||||
Note - 9. You can submit the AYUSHonline membership form at www.join.adiyuva.in | ||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||

"ए, तु बोहाड्याला येतो आहेस का? मी निघतोय..
बंगळूरू-पुणे फ्लाईट व पुढे नाशिक मार्गे मोखाड्यास पोहोचतोय."
(संकेत कुलकर्णीचा Whats App वर आलेला हा मेसेज.)
संकेत कुलकर्णी आणि बालपणीचे आम्ही सर्वच मित्र Whats App ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच संपर्कात असतो.
काय उत्तर द्यावे दोन मिनिटे सुचेनासे झाले, कारणही तसेच होते..
दिल्ली-सहारनपुर-ऋषिकेश-देहरादून अॅडव्हेंचर ट्रिप करून नुकताच परतलो होतो.
Photography - Rafting च्या नावाखाली जास्तीच फिरणे झाले होते.. थोडे जास्तीच..!
रिप्लाय दिला, शक्य झाल्यास येतो.
मुळात मोखाडा हे माझे जन्म गाव, ‘जीवन शिक्षण’ शाळेत सुरु झालेल्या शिक्षणाच्या प्रवासापासून तर जीवनाच्या अनेक चढउतारांचा आणि खाचखळग्यांचा साक्षीदार असलेले हे गाव.
मराठीमाती डॉट कॉमच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक गावातील ग्रामीण संस्कृती बघतांना, अनुभवतांना आपले गाव कितीही मागासलेले वाटले तरीही एक मनोमन असलेली आत्मियता, ओढ व उत्सव प्रसंगी असलेले चैतन्य.. मोखाड्याशी नाळ जोडून ठेवावयास पुरेशी आहे.
जगभरातील २०२ देश आणि ९५१४ शहरातील मराठीमाती डॉट कॉमच्या वाचकवर्गास गेली १२ वर्षे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची सर्वांगीण ओळख करून देत असतांना आज मोखाडा या माझ्या जन्म गावातील ‘बोहाडा उत्सव’ या पारंपारिक मुखवट्यांच्या नृत्यनाट्य प्रकाराचे Documentation करावयाची संधी मिळाली.
पुणे-कल्याण-जव्हार प्रवास करत सायंकाळी सहा वाजता मोखाडा या गावी पोहोचलो, अपेक्षित असे चैतन्यमय व मंगलमय वातावरण माझे स्वागतच करत होते जणू..
साधारण साडेसात वाजता वाजंत्री वाजावयास सुरूवात झाली, लहान मुलांचा गोंगाट, खेड्या - पाड्याहून आलेल्या ग्रामीण वेशभुषेतील लोकांची तुडूंब गर्दी, पिपाणीचा आवाज आणि त्याच पिपाण्या तोंडात घेऊन पळणारी मुले, फुगेवाले, नारळवाले, देवीला लागणाऱ्या वस्त्रांचे विक्रेते तसेच देवी चौकात भरपूर रोषणाई व वाजंत्रीवर मुऱ्हळ्यांचे नृत्य, संस्थेच्या सेवेकराकडून भाविकांस दिल्या जाणाऱ्या सुचना अशी पारंपारिक जत्रेची वातावरण निर्मिती होत होती.
साधारणत: २८ सोंगे असलेला बोहाडा उत्सव हा रात्रभर चालणार होता व सकाळी देवीची भव्य मिरवणूक होणार होती, त्या दृष्टीने जगदंबा सेवा संस्थेच्या सेवेकरांनी श्रद्धेने येणाऱ्या भाविकांस परिपूर्ण व विना व्यत्यय उत्सवाचे दर्शन व्हावे या करता केलेले सादरीकरण व शिस्तबद्ध नियोजन कौतुकास पात्र होते. हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बोहाड्यात मुस्लीम बांधव सुद्धा उस्फुर्त सहभाग नोंदवतात, हे या उत्सवात मला जाणवलेले वैशिष्ट्य.
गणपतीच्या सोंगापासून सुरूवात होत बोहाडा हळू-हळू रंगात येत होता. पहाटे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र असलेले रावण-दशावतार व चारण भाभी हे सोंग रात्रभराचा थकवा घालविण्यास पुरेसे असतात. चारण भाभी या सोंगाची ती नजाकत व रावण-दशावताराचे जोशपूर्ण ठेक्यातील सादरीकरण उत्तम मुखनाट्याची चुणूक दाखविते.
सकाळच्या उल्हासित वातावरणात सर्व गावकरी देवी चौकात जमतात व वाजंत्रीच्या मंत्रमुग्ध स्वरात मांगल्यदायी दिवसाची सुरूवात झालेली असते.
हिरण्यकश्यप राजाची ती रूबाबदार मिरवणूक व नरसिंहासोबतचे युद्ध वाखाण्याजोगे असते. त्या नंतर सर्वांस प्रतिक्षीत असे देवीच्या मुखवट्याचे पुजन होते व श्री.जयराम चुंबळे परंपरेनुसार देवीचे सोंग घेतात. महिषासुर-देवीचे तुंबळ युद्ध झाल्यानंतर जगदंबा देवीची भव्य मिरवणुक सर्वांच्या श्रद्धेचा व आकर्षणाचा विषय आहे. जगदंबा देवीवर श्रद्धा असणारे विविध शहरातून प्रामुख्याने सुरत, मुंबईहून गुजराथी बांधव व नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले परिवार सुद्धा देवीपुढे आपल्या नवसाचे साकडे घालावयास येतात.
बोहाड्याच्या अनुषंगाने एक नमुद करावेसे वाटते की निसर्गसौंदर्य व वारली कला लाभलेल्या या टुमदार गावाबद्दल शेवटी जगदंबा चरणी एकच प्रार्थना ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ हा मर्म असलेला बोहाडा उत्सव मोखाडा तालुक्यातील बेरोजगारी, कुपोषण, अंधश्रद्धा, अज्ञान व आत्मकेंद्रित प्रवृत्ती विरूद्ध लढण्याची ताकद देऊन सर्व गावकऱ्यांनी उत्सवानिमित्तच एकत्र न येता रोजगार, शिक्षण व्यवस्था व सामाजिक समस्या या प्रश्नी एकात्मतेचे दर्शन घडवून आणल्यास येणाऱ्या युवापिढीस खऱ्या अर्थाने उज्वल भविष्याचा दैवी प्रसाद मिळेल..
ही मनोकामना..