|| *आयुश राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम सराव मध्ये* ||

14 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

AYUSH main

unread,
Feb 13, 2020, 2:05:19 AM2/13/20
to AYUSH google group
|| *आयुश राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम सराव मध्ये* ||

_उपराष्ट्रपती यांच्याहस्ते "द व्हिजन ऑफ अंत्योदया" चे अनावरण_

काल १२ फेब्रुवारी २०२० रोजी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवन येथे सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहाय्याने ISRN मार्फत समाजावर प्रभाव पडणाऱ्या काही निवडक संकलित केलेल्या देशभरातील यशोगाथांचे लिखित पुस्तक उप राष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. *आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनिल पऱ्हाड हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.*

आयुश च्या *कामाची दाखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणे* आणि उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, The Indian Council for Cultural Relations (ICCR) अध्यक्ष, आणि Indian Social Responsibility Network (ISRN) उपाध्यक्ष, विनय सहस्रबुद्धे यांच्या मार्फत भाषणात *आयुश चा उल्लेख होणे नक्कीच प्रोत्साहन देणारे आहे.*

१९९९ पासून सहज काही करावे म्हणून सुरु केलेले कार्य हळू हळू आकार घेत आहे आणि सध्या विविध रचनात्मक उपक्रम माध्यमातून आदिवासी स्वावलंबी अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी हातभार लावण्यासाठीचे प्रयत्न करीत आहोत. *आपल्या आवडीने आणि उपलब्धतेनुसार हे कार्य पुढे नेण्यासाठी सहभागी व्हाल अशी खात्री आहे.* Lets do it together!
 
.................................................................. 
*आयुश प्रवास थोडक्यात* : (सगळ्यांना माहिती आहेच, पण सहज पुन्हा उजळणी ☺ )

१९९९ ते २००३ प्रत्येक्ष अनुभवातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अपेक्षा लक्षात घेता, विविध सामाजिक उपक्रमांचे अनुभव/अभ्यास केल्या नंतर, आदिवासींचा स्वावलंबी प्लॅटफॉर्म असावा म्हणून २००६ पर्यंत लक्षात आले. समाज हिताच्या उपक्रमात युवकांचा सहज सहभाग वाढावा या उद्देशाने विविध माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी म्हणून २००७ झाली सुरु झालेले आयुश, सुरवातीला ऑनलाईन नंतर प्रत्येक्ष, नंतर २०११ मध्ये संस्था म्हणून नोंदणी. आधी फक्त वयक्तिक योगदानातून सुरु असलेले काम व्यापक आणि *अधिक प्रभावी करण्याकरिता सध्या समाज, स्वयंसेवक, शासकीय, खाजगी CSR, इत्यादींच्या साहाय्याने कोलॅबोरेटीव्ह सोशिअल इंटरप्रेनरशिप मॉडेल मध्ये रूपांतरित होत आहे.*

_पारंपरिक ज्ञानातून आदिवासीत्व जतन करून स्वावलंबन सशक्तीकरणासाठी प्रयत्न करत आहोत. आदिवासी हस्तकला तसेच वारली चित्रकला यांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनासाठी हातभार लावण्याचे प्रायोगिक उपक्रम गेली १३वर्ष पासून सुरु आहेत. हळू हळू उपक्रमांची त्याची व्याप्ती शेती, वनोपज, वनोवषधी, शेती पूरक उद्योग इत्यादींकडे वाढवून आदिवासी समाजाची अर्थव्यवस्था मजबुतीचे प्रयत्न कायम राहतील._

*आयुश च्या या प्रवासात अनेकांनी प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष माध्यमातून हे उपक्रम अधिक प्रभावी करण्यात हातभार लावले आहेत त्या सगळ्यांना मानाचा जोहार आणि शुभेच्छा,* 💐💐💐
दिलेल्या लिंकवर नोंदणी अर्ज भरून आयुश उपक्रमात सहभागी होऊ शकता. 

आदिवासीत्व | जल जंगल जमीन जीव .... जोहार!

______________________________________
आयुश | सहभाग नोंदणी  | .join.adiyuva.in
उपराष्ट्रपतींचे भाषण .youtu.be/yko2vixn8xA

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Feb 13, 2020, 1:14:17 PM2/13/20
to AYUSH | Adivasi Yuva Shakti
WhatsApp Image 2020-02-12 at 20.38.43.jpeg
WhatsApp Image 2020-02-12 at 20.38.42.jpeg
WhatsApp Image 2020-02-13 at 21.39.50 (3).jpeg
WhatsApp Image 2020-02-13 at 21.39.50 (2).jpeg
WhatsApp Image 2020-02-13 at 21.39.50 (1).jpeg
WhatsApp Image 2020-02-13 at 21.39.50.jpeg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages