|| वयक्तिक : *ओग्यानूच दोन्हीं टोचलीं* 💉💉||
▪️[ *स्थानिक आदिवासी बोली भाषा* ]
_बारीक होतुं तव्हां सालतं दागतरां येंत लायनीत उभीं करून टोचीतं. टोचलां का लडत लडत हात फिरवीत धावतुच परत वर्गात जान पोरां बसत, डोलं पुसीतं ना टुलुटूला नांगत दुखं तांव. आम्हीं जराक जासट सिंग वाली पोरां लबाडी करूं, पोरांना निजं ताव दपून रेहुं मंगा परत जाताना त्यांचे हारीं हात फिरवीत मिसलूनं जावं. ओगचं लडेल तोंड करून रेहुं. भेव रेहे मास्तरान नांगला त कुटजल, साला सुटायची वाट पाहुं ना भलतीं धांव घेंव.☺️_
*आथां करोनासाठी असां करून नीही चालायचां,* हाफिस वाल्यांही सोय करेल होतीं. जान ना ओग्यानूच टोचवून आलुं, काल दोन्हीं खपवलीं. तुम्हालांहो मिललां त ओग्यानूच घिजास, लडजां नोकों बिहजां नोकों. बेस रेहा.
▪️[ *साधी मराठी बोली* ]
करोना लसीकरण सुरु आहे आपल्या ठिकाणी उपलब्ध असल्यास त्वरित घ्यावे आणि संपर्कात पण सगळ्यांना घ्यायला सांगावे. *काल मी दुसरा डोस घेतला पहिल्या आणि दुसऱ्या डोसला पण काहीही रिअक्शन जाणवल्या नाही.*😊 फक्त इंजेक्शन च्या जागी थोडेसे जड जाणवले. बाकी काहीच नाही, ऑफिस चे काम करता करता डोस घेऊन काम केले.
▪️[ *दोन शब्द सामाजिक* ]
चलो आपल्या पाडयात, गावात, संपर्कात जागरूकता वाढवूया. जोहार !