|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मार्च २०१७ |

147 views
Skip to first unread message
Assigned to adi.ac...@gmail.com by me

Warli Painting

unread,
Mar 31, 2017, 2:38:56 PM3/31/17
to AYUSH google group
*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मार्च २०१७ ||*

निसर्ग, पर्यावरण, जैव वैविध्यता, पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य जतन करून मानव व सगळ्या जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे जग आशेने बघत असताना, समाज अगदी नाजूक वळणावर आहे. एकीकडे समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था नष्ट होऊन परावलंबी पणा वाढत आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावत आहे, पिढी च्या पिढी हळू हळू व्यसनातून नष्ट होते आहे, अनुसूचित क्षेत्रातील रोजगार  व्यवसाय डोळ्यासमोरून जात आहेत, हक्क डावलले जात आहेत, योजना प्रत्येक्ष पोचत नाहीत, व्यवस्थेत संवेदने चा अभाव, युवा पिढीला रोजगार नाही, सांस्कृतिक ओळख नष्ट केली जाते आहे.  

राज्यातील सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला परिसर "ठाणे / पालघर जिल्हा", दक्षिण गुजरात या परिसरातील अनुसूचित क्षेत्रावर तर प्रत्येक्ष - अप्रत्येक्ष आक्रमणे चालू आहेत. लवकरच आदिवासी समाज अल्पसंख्यांक होऊन नष्ट होण्याची भीती व्यक्त होते आहे. अवाढ्यव्य प्रकल्प येथील जल जंगल जमीन व्यापून टाकणारे आहेत .... (यादी खूप मोठी आहे)

असो, हि सध्याची परिस्थिती, अनेक वर्षांची आदिवासी चळवळींचा इतिहास, सध्या युवा पिढीच्या प्राथमिकता, समाजा समोरील आव्हाने या विषयी अभ्यासपूर्वक चिंतन करून. समाजाचे प्रश्न/समस्या आव्हाने सोडविण्या च्या पुढे जाऊन रचनात्मक शाश्वत विकास, आदिवासी अस्मिता, सांस्कृतिक ओळख, परंपरा बद्दल समाजात आणि बिगर आदिवासीत संवेदना तयार करून समाजाची स्वाभिमानी स्वावलंबी पिढी तयार करण्याची प्रक्रिया मजबूत करण्यासाठी. आदिवासी हिता साठी होणारे प्रत्येक प्रयत्न मजबूत करण्याची व्यवस्था समाजात रूजवूया. आणि त्या साठी लागणारे संस्कार (जे आदिवासी जीवनशैलीचा सहज अविभाज्य भाग आहे) घरात, समाजात टिकावे त्या साठी प्रयत्न करूया.  

याच प्रेरणेने आपण १९९९ पासून विविध सामाजिक चळवळींचा अनुभव/निरीक्षण करून समाजाची स्वतःची स्वालंबी व्यवस्था मजबूत करण्यासाठी युवांचा सहभाग व्हावा यासाठी २००७ पासून आयुश (आदिवासी युवा शक्ती) च्या माध्यमातून विविध उपक्रमांची सुरवात केली गेली. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी झाली, आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागाने आणि सहकार्याने हे कार्य विविध क्षेत्रात पसरते आहे. 

आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान जतन (आदिवासी कला जतन - वारली चित्रकला) उपक्रम राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. अगणित पिढ्यानपासून जतन केलेले हे ज्ञान फक्त चित्रा पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक जीवन, विकासाला आदर्श दिशा म्हणून त्या विषयी जागरूकता आणि विविध कल्पक प्रयत्नातून रोजगार निर्मिती चे प्रयत्न चालू आहेत. 

मार्गदर्शक तत्व -  

माती : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करून प्रसार करणे 
पाणी : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता वाढवणे
चावूल : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे
 
या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी

[अदिकला]
*१) आदिवासी कलाकारांसाठी चर्चा सत्र आणि नाव नोंदणी उपक्रम* - 
चित्रकला, कारागिरी, हस्तकला, विणणे, लाकडी वस्तू बनविणे, शोभिवंत वस्तू बनविणे, आणि इत्तर हस्तकला करणाऱ्या सगळ्या कलाकारांना विविध कला महोत्सव, प्रदर्शन, कार्यशाळा यात सहभागी होण्यासाठी आवश्यक कलाकार ओळख पत्र तयार करण्यासाठी / नूतनीकरण करण्यासाठी कलाकारानां नाव नोंदणी सोप्पी व्हावी या साठी २५ मार्च रोजी कासा येथे कासा येथे आयुश तर्फे कॅम्प आयोजित केला होता. त्यात अंदाजे ४० कलाकारांनी सहभाग घेतला होता.
मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल तर्फे डेव्हलपमेंट कमिशनर (हँडीक्राफ्ट) कार्यालया तर्फे असिस्टंट डायरेक्टर राजेंद्र सिंग, राजन, मांझी हे अधिकारी उपस्तित होते. त्यांनी मंत्रालयाच्या योजनांविषयी विविध उदाहरणे देऊन माहिती दिली. वस्त्र मंत्रालय तर्फे विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय तर्फे त्यांनी ३७ कलाकारांचे अर्ज पडताळणी करून जमा करून घेतले. आणि अंदाजे २० कलाकारांना नवीन ओळख पत्राचे वितरण केले. संजय दा यांनी सगळ्या कलाकारांना संपर्क करून, संदीप दा नि इत्तर तयारी आणि समाजोन्नती संघाच्या वसतिगृहात जागा उपलब्ध करून सगळ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

*२) भौगोलिक उपनिदर्शनी तर्फे दिल्ली येथे १० दिवसांचे प्रदर्शन* - 
बौद्धिक संपदा विभाग तर्फे देशभरातील नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनाचे प्रदर्शन १ ते १० मे दरम्यान दिल्ली येथील प्रगती मी मैदान येथे प्रदर्शन आहे त्यात आयुश ला तर्फे ४ कलाकार सहभागी होत आहेत (वेती येथील संदीप दा भोईर, नांदोरे येथील अभिजित द पिलेना, अलोंडे येतील राजेश दा रडे, गंजाड येथील विजय दा वाडु). प्रदर्शनात आपली कलाकृती पाठविण्यासाठी संपर्क करावा. 
याच दरम्यान भौगोलिक उपदर्शनी आणि बौद्धिक संपदा यावर एक दिवसाची कार्यशाळा आहे त्यात सचिन सातवी सहभागी होतील. 
*३) अनुभवी कलाकारांसाठी सहकार्य* - 
आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांची कलाकृती स्थानिक, राज्य, राष्ट्र व आंतराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक्ष ग्राहकांपर्यंत पोचून. त्यांचे आर्थिक सबळीकरण करण्यासाठी चा प्रयत्न आहे. कलाकारांनी त्वरित आपली कलाकृती चे नमुने/माहिती आयुश केंद्रात जमा करावे. होणाऱ्या विविध प्रदर्शनात/कार्यक्रमात/वेबसाईट वर त्या कलाकृतींना प्रसिद्धी दिली जाईल. 

*४) नवोदित कलाकारांसाठी संधी* - 
ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० चा गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी, आपल्या संपर्कातल्या कलाकारांना कळवावे.      

५) *आदिवासी कलाकृती निर्मिती* : 
- हॉंगकॉंग येथून मेमेराकी डॉट कॉम तर्फे श्रीमती योशा यांनी संपर्क केला होता. चीन मधून कातडे आयात करून हॉंगकॉंग येथे बॅग बनविल्या जातात. त्याना नमुना म्हणून २ चामड्याच्या पर्स वर चित्र कलाकृती करून कुरियर केले आहे ते गुणवत्ता तपासून लवकरच पुढील सविस्तर करार करण्यात येईल. त्यांच्याकडून पर्सवर चित्र काढण्यासाठी नियमित काम दिले जाईल. 
- बंगलोर येथील विशिष्ट चष्मे बनवणारी कंपनी वूडीयम तर्फे काही नविन प्रकारचे चष्मे वारली चित्रकलेची डिझाईन सोबत बनविणे यावर चर्चा चालू आहे. डिझाईन बनविल्यावर नमुना तपासाला जाईल. या साठी क्राऊड फंडिंग माध्यमातून ते गुंतवणूक करणार आहेत. 

६) *इत्तर मागण्या* -  IIT मुंबई येथून प्रोफेसर यांनी त्यांच्या संस्थेत येणाऱ्या वरिष्ठ पाहुण्यांना भेट देण्यासाठी वारली तत्काळ १२ चित्र मागविली आहेत संजय दा पऱ्हाड यांनी परवा ६ चित्र नेवून दिली, उद्या ६ नेवून देण्यात येतील. चेन्नई येथून पुरो क्राफ्ट कडून चित्रांची एकत्रित १० चित्रांची मागणी आली आहे लवकरच शर्मिला ताई घाटाळ पूर्ण करतील. बेंगळुरू आणि हैदराबाद येथील घराच्या भिंतीवर चित्र काढण्यासाठी चौकशी करण्यात आली होती, प्रवास करून जाणारे कलाकार मिळू शकले नाही. 

७) *मुंबई छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे कलाकृती केंद्र* - ९ मार्च रोजी त्यांच्या कार्यालयातून संपर्क करून आदिवासी कलाकृती तेथील कलाकेंद्रात विक्रीसाठी ठेवण्यासाठी चौकशी केली. पुढच्या आठवड्यात संजय दा पऱ्हाड नमुना कलाकृती घेऊ त्यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. तेथे विक्री साठी कलाकृती ठेवण्यासाठी इच्छुक कलाकारांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा. 
म्युझियम ऑन व्हील्स या प्रकल्पा तर्फे संग्रहालय तर्फे शालेय विद्यार्थ्यांना फिरते संग्रहालय आणण्या साठी विचारणा करण्यात आली होती त्यांना डहाणू, तलासरी, पालघर, जव्हार, विक्रमगड या परिसरातील शाळांसोबत संपर्क करून देन्यात येईल. आपल्या संपर्कातील शाळेत हे आणावयाचे असल्यास संपर्क करावा 

८) *सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प* - प्रसाशकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सुवास ट्रस्ट ची स्थापना केली आहे. शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा मुख्य उद्देश ठेवून विविध आदिवासी कलाकृतींना प्रसिद्धी देऊन आदिवासी कलाकारांचे आर्थिक मजबुती करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सध्या  ते मधुबनी चित्र सोबत काम करीत आहेत. सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर चित्र काढण्यासाठी चर्चा पूर्ण झाली प्रायोगिक तत्वावर नमुने कुरियर केले आहेत. यशस्वी झाल्यास कोईंबतूर, सुरत, पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या चित्रीकरणासाठी पाठवल्या जातील. ट्रस्ट ची टीम लवकरच डहाणू ला भेट देऊन पुढील औपचारीकता पूर्ण करतील. 
९) *आदिवासी कलाकार* : आदिवासी कलाकारांचे प्रोफाइल मार्केटिंग साठी, जिथे जिथे आदिवासी कलाकार सहभागी होतील त्याची माहिती एका ठिकाणी मिळावे या साठी प्रयोग करतो आहोत. आपल्या माहितीत असे काही कार्यक्रम/कलाकार व्हिजिट आल्यास जरूर कळवावे, आपण प्रसारित करूया. 

डहाणू येथील प्रसिद्ध वारली कलाकार (चित्रकार, मूर्तिकार), परंपरा व संस्कृती अभ्यासक तसेच सामाजिक कार्यात स्पष्ट वक्ते हरेश्वर दा वनगा यांना महाराष्ट्र शासन तर्फे २०१६-१७ या दोन वर्षांसाठी आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचे अभिनंदन. गेली कित्येक वर्ष ते विविध सामाजिक कार्यात सहभागी आहेत. वयक्तिक पातळीवर डहाणू येथील रुग्णालयातील रुग्णाची सेवा अविरत चालू आहे. वारली चित्रकला आणि परंपरेत महिलांचे मोलाचे स्थान कायम राहावे म्हणून त्यांनी अनेक प्रशिक्षणे घेतली आहेत. दरम्यान भगत प्रशिक्षण शिबीर उपक्रम चालू केला होता. तसेच पारंपरिक ज्ञानाचे लेखन करून नवीन पिढीला मार्गदर्शक म्हणून पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस त्यांचा पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा. 

१०) *स्थानिक पातळीवर कला बँक ची निर्मिती* : विविध गाव पाड्यावर विखुरलेले आदिवासी कलाकार, आणि कलाकृती सुरक्षित साठविण्यासाठीच्या अडचणी लक्षात घेऊन. कलाकृती एका ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या साठी आपण रेल्वे स्थानका जवळ (खंबाळे) आणि महामार्ग जवळ (वाघाडी) येथे कला बँक ची निर्मित करण्यात येणार आहे. परिसरातील कलाकारांनी आपल्या कलाकृती आणि नमुना कलाकृती जमा करून नोंदणी करावी. 
आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.

११) *पुणे येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २०१६ - १७ तर्फे हस्तकला प्रदर्शन व विक्री * : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) तर्फे आयोजित आदिवासी सांस्कृतिक महोत्सव मध्ये आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री यात जव्हार, डहाणू, पालघर तालुक्यातील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. 
येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.

१२) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*
वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.

इंडिया मार्ट वर १ महिन्यासाठी सशुल्क सभासदत्व घेतले आहे. रिस्पॉन्स वर पुढील उपक्रम ठरविले जातील. 

१३) *CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक* : भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI - रिजर्व बँक ऑफ इंडिया ची संस्था, देशभरातील सगळे ऑनलाईन व्यवहार या संस्थे मार्फत होतात) यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक चर्चेची बैठक झाली यात आयुश तर्फे प्रो चेतन दा गुरोडा, बबलू  दा वाहुत, प्रांजण दा राऊत सहभागी झाले होते. सकारात्मक आणि स्वानंदात्मक चर्चा झाली, नवीन तंत्रज्ञान चा उपयोग करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या साठी त्यांच्या सुचने नुसार प्रस्थाव जमा केला आहे, एप्रिल महिन्यात त्यांच्या कार्यालयात प्रदर्शन आयोजित कारण्यासाठी विचारांना केली गेली आहे. लवकरच त्यांची समिती समोर CSR सविस्तर चर्चा / प्रेसेंटेशन देण्यात येईल.   
 
१४) *पारंपरिक ज्ञान जतन प्रकल्प* : समाजात विखुरलेले पारंपरिक ज्ञान विविध माध्यमातून संग्रहित करणे. या प्रकल्पात लिखाण, छायाचित्रीकरण, ध्वनी मुद्रण, चित्रीकरण, संग्रह करून सहभागी होऊन आपल्या समाजाची बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी हातभार लावूया. इच्छुकांनी संपर्क करावा.

१५) *आदिवासी संस्कृती जागरण उपक्रम* : आदिवासी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान या बद्दल जागरूकता करण्यासाठी विविध माध्यमातून शाळा/कॉलेज/पाडा/गाव/शहर या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करणे. आपल्या परिसरात असे कार्यक्रम आयोजित करून किंवा या साठी सहकार्य करून समाज जागृतीच्या कामाला हातभार लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा.

१६) आदिवासी शैक्षणिक संस्था ना मदत -  आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या शाळा /वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी काही कार्परेट्स पुढाकार घेत आहेत. त्यांची बैठक ठाणे जिल्हा आदिवासी समाजोन्नती संघ आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या कार्यकारी मंडळांशी चर्चा करवून आणण्यात येईल. आपल्या संपर्कात अशी आदिवासी संस्था असल्यास कळवावे. 

 १७) *सहकार्य आणि सहभाग*: क्राऊड फंडिंग तर्फे विनंती  - 
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर, आर्थिक साहाय्य, नवीन आयडिया देणे, संपर्क वाढविणे, जाहिरात करणे, कलाकृती विक्रीसाठी सहकार्य, रोजगार निर्मितीचे उपक्रम मजबुती करण इत्यादी). खासकरून नोकरी/व्यवसाय करणार्यांनी या प्रकल्पाला मजबूत करण्यासाठी आर्थिक सहकार्य करून स्पर्धात्मकता वाढवावी या साठी पुढाकार घ्यावा. 

*#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* :  https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता.

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. *आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !*

Lets do it together! 

AYUSHonline team
www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of  this Initiative through Warli Painting
माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology
चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation
Reply all
Reply to author
Forward
0 new messages