News : आदिवासी खेळाडूंना आता मिळणार 25 वाढीव क्रीडा गुणांचा फायदा

4 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 18, 2015, 7:10:13 AM2/18/15
to adi...@googlegroups.com
 
News for ref :
 
मुंबई : आदिवासी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांना क्रीडा विभागाच्या स्पर्धांप्रमाणे दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.

आदिवासी क्षेत्रातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ मिळणार असून आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूंना 25 वाढीव क्रीडा गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे.


आदिवासी खेळाडू हे आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मात्र या स्पर्धांना क्रीडा संचालनालयाची मान्यता नसल्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विजयी खेळाडूंना 25 वाढीव गुणांचा फायदा मिळत नव्हता. परंतु यासंदर्भात श्री. तावडे यांच्याकडे अनेक लोकप्रतिनिधी तसेच संघटनांनी आदिवासी खेळाडूंना विविध सवलती मिळण्यासाठी विनंती केली होती. यासंदर्भात श्री. तावडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages