|| वैयक्तिक अनुभव:*कोरियातील ६वा आठवडा*||
▪️[स्थानिक *आदिवासी भाषा* : निहरी]
सालत होतुं तंव्हा होस्टेलला जेवनाला चव लागाया खिस्यात चटणी/कांदा/मुला घेन जांव ना ओग्यानूच जेवनाचे हारीं खांव. वाहनगावात होतुं तंव्हा मूठ मोजून धान दीज. तलासरीला आलुं तंव्हा आठवड्यातसीं एकदा एक पली गोल्याची भाजीं खायां मिलं. कंव्हा कंव्हा उरली का डबल अर्धी पली मिललीं का भलता भारीं वाटं. ☺️
कोरियाचे हाफिसात जेवाया मस्त ७ वायलां वायलां जेवन रेहें ज्या पायजं त्यां कोढाक हों खां. आज जेवतानां निसतां आठवलां. बेस रेहा!
▪️[साधारण *मराठी बोली* भाषा]
येथे ऑफिस लंच साठी कॅफेटेरिया मध्ये जाताना मॉनिटरवर रोज मेनू बघतो. ७ पूर्ण वेग वेगळे मेनू आहेत (कोरियन/चायनीज, कॉन्टिनेन्टल, बीफ, पोर्क, सीफूड, चिकन, इत्यादी). तसेच सेल्फ कुक, पीक अँड गो आणि ऑफिस टेबल डिलिव्हरी असे वेग वेगळे पर्याय आहेत. ज्याला जसे पाहिजे तो पर्याय निवडून जेवतात. माझ्या डोक्यात तोच विचार सुरु होता रोज १३ हजार कर्मचाऱ्यांसाठी एव्हडे सगळे मेनू कसे तयार करत असतील. वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांसाठी अधिक सोयीस्कर आणि सुखकारक बदल दिसत आहेत.
सहज, शाळेत असताना संस्थेच्या हॉस्टेल चे जेवणाचे दिवस डोळ्यासमोर येऊन गेले. चवी साठी गपचूप आम्ही तिखट/चटणी घेऊन जायचो. आठवड्यातून भाजी मिळाली म्हणजे ते सेलेब्रेशन असायचे. नाही तर रोज आमटी आणि भात. असो सध्या सगळ्या वसतिगृहांची परिस्थिती बदलीय.
▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡
पुर्वी भलेही कागदाची डिग्री नसेल पण नवीन पिढी *समाजात राहून प्रत्येक्ष अनुभवातून/सहजीवनातून अनेक जीवनावश्यक कौशल्य/संस्कार/मूल्य शिकत होती.* स्वतःच्या पायावर उभे राहून कौटुंबिक दायित्व पार पाडले जायचे.
जर सध्या ग्रॅज्युएट झालेल्यानां साधे व्यवहार ज्ञान आणि रोजोपयोगी एखादे काम येत नसेल तर आपल्यांना आपल्या *शैक्षणिक व्यवस्थेचा पुनर्विचार करणे गरजेचे वाटतेय* (आवश्यक अभ्यासक्रम, पद्धत, इत्यादी). आधुनिक शैक्षणिक व्यवस्था ठरल्या प्रमाणे काम करेलही कदाचित.
पण लहान वयापासून समाज/कुटुंबापासून लांब राहताना आर्थिक स्वावलंबनासोबत *विविध वयोगटात आपले आदिवासी संस्कार/मूल्य/नेतृत्वगुण रुजविण्यासाठी* समाज म्हणून आपली काही *अनुरूप व्यवस्था आहे का?* नसल्यास त्यांना ज्या चष्म्यातून शिक्षण/वातावरण (धार्मिक/पांथिक/राजकीय) तोच वारसा ते पुढे चालवणार. तुम्हाला काय वाटते?🤔 काही करता येईल? Let’s do it together! जोहार
..............................................................
*What Adivasi lives can teach us* (TEDx नंदिनी सूंदर 14.57 मिनिटे, इंग्लिश)