|| *स्वावलंबन : एक कायमस्वरूपी उपाय* ||

0 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
May 31, 2021, 2:41:16 PM5/31/21
to AYUSH google group
|| *स्वावलंबन : एक कायमस्वरूपी उपाय* ||

▪️ [स्थानिक *आदिवासी बोलीभाषा*]
_बारीक होतुं तव्हां नांगेल ज्या काही घरात लाग त्या शेतात, राबात, वाड्यात, डोंगरेंवर, नईत, ओहलेला मिलून जाय. परतेक सामान, वस्तू बनवायची रीत माहित रेहे, सिकाय मिल. गावातले गावात सगला काम होय_

▪️[ साधारण *मराठी भाषा*]
अंदाजे १९९० आधीचे काही आठवले तर उपजिवीकेसाठी लागणारे सगळे आवश्यक गरजा शेत, जंगल, नदी, आजूबाजूचा परिसर यातून सहज पूर्ण होत असत. गावातील सगळ्या कुटुंबाचे सरासरी आर्थिक स्थर जवळपास समान असत. सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहज सहभागी व्हायचे. गरजा मर्यादित होत्या समाधानी आयुष्य होते.... स्वावलंबन होते.

आताची परिस्थिती बघितली तर साक्षरतेचे प्रमाण, भौतिक सुविधा, तंत्रज्ञान, नोकरीमुळे काहींची कागदाच्या पैशाची मिळकत वाढली आहे, प्रत्येक कामासाठी यंत्र वैगेरे आली आहेत.... *पण माणसा माणसातील संवाद, संवेदना, स्वावलंबन कदाचीत पूर्वीसारखी राहिली नाही.* 

▪️ [दोन शब्द *सामाजिक*]
लिझीकीचे व्हिडीओ बघितले कि मला आदिवासी समाजाचे चित्र समोर उभे राहते. लागणाऱ्या सगळ्या वस्तू, सामान, साहित्य स्वतः सभोवतालच्या संसाधनांवर आणि पारंपारिक ज्ञानाच्या आधारावर आदिवासी समाजाने प्रत्यक्षात अनुभवातून तयार केलेली पद्धती वापरत असे आणि त्या नुसार जीवन कौशल्य पुढच्या पिढीला देत असे. 

दुर्दैवाने, सध्या शिक्षण व्यवस्था, कौशल्य विकास, उपजीविका, संस्कार, संस्कृती, सामाजिक संवाद, इत्यादी मधील आदिवासींनी स्वतःचे स्वावलंबन गमावले आणि खूप विचित्र परिस्थितीत समाज येऊन पोचला आहे. कुठे प्राथमिक गरजा पूर्ण होत नाही, कुठे सामान संधी नाही, कुठे संविधानिक अधिकार प्रत्येक्षात नाही, कुठे प्रत्येक्षात अपेक्षित असलेले हक्क नाही.. असो यादी मोठी आहे. 

*खूप नियोजनपूर्वक आदिवासी समाजाचे प्रत्येक पायरीवर स्वावलंबनासाठी आवश्यक कायम स्वरूपी उपाय योजना केल्यास नक्कीच अधिक सकारात्मक बदल समाजात होऊ शकेल.* चलो प्रयत्न करूया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव... जोहार. आदिवासीत्व! 
..........................................................

▪️लिझीकी, चीन (15.4m Subscribers)

▪️ट्रॅडिशनल मी, श्रीलंका (1.03m Subscribers)
   
_*वेळ मिळेल तेव्हा पुढील चॅनेलवरील कोणताही व्हीडिओ नक्की बघावे*. खूप चांगल्या पद्धतीने स्वावलंबन बघता येईल. (ज्ञान, साहित्य, वस्तू, मूल्य, स्वावलंबीपणा). सदर विषयात इच्छुकांनी नक्कीच प्रयत्न करावे आपल्या परिसरात असलेले आदिवासी स्वावलंबन व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून ते *स्वावलंबन प्रत्येक्षात ठिकविण्यासाठीच्या प्रयत्नानांना हातभार लावुया.*_😊 काही चांगल्या आयडिया असल्यास नक्कीच कळवावे. 🙏🏻
Reply all
Reply to author
Forward
0 new messages