मानमरातब आणि पैसा याखेरीज कामाचे समाधान मिळवून देणाऱ्या वकिली क्षेत्रासंबंधी स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. वकिली क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम व त्यांच्या प्रवेशप्रक्रियेविषयी..
* नॅशनल लॉ स्कूल्स :
भारतातील सर्व प्रमुख विद्यापीठांमध्ये एलएलबीचा अभ्यासक्रम वर्षांनुवष्रे सुरू आहे. मात्र त्यातील शिक्षणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतात. ही बाब ध्यानात घेऊन नॅशनल लॉ स्कूल /युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली. कायद्याच्या विविध पलूंचे आणि विषयाचे दर्जेदार आणि
गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी
१) एनएलएसयूआय- बंगळुरू
२) एनएएलएसआर- हैद्राबाद
३) एनयू- भोपाळ
४) डब्ल्यूबीएनयूजेएस-कोलकता
५) एनएलयू- जोधपूर
६) एचएनएलयू- रायपूर
७) जीएनएलयू- गांधीनगर
८) आरएमएलएनयू-लखनौ
९) आरजीएनयूएल- पतियाळा
१०) सीएनएलयू- पाटणा
११) एनयूएएलएस- कोची
१२) एनएलयू- ओरिसा
१३) एनयूएसआरएल-रांची
१४) एनएलएसजेए गौहाटी
या १४ स्कूलची निर्मिती केली गेली. या संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ाच्या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या
उमेदवाराला बारावीच्या कोणत्याही शाखेत ५० टक्के गुण मिळायला हवे. एसस्सी, एसटी, ओबीसी गटातील उमेदवारांना ४५ टक्के गुण हवेत.
* कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट :
कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट देऊ इच्छिणारा उमेदवार १ जुलै २०१३ रोजी २० वर्षांपेक्षा अधिक नसावा. एसस्सी, एसटी, अपंग गटातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा-२२ वष्रे. या चाचणीसाठीचा अर्ज
www.clat.ac.in या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. तसेच या वेबसाइटवर असलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्जसुद्धा भरता येतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही निवडक शाखांमध्ये विक्रीसाठी अर्ज ठेवण्यात आले आहेत. घरबसल्या अर्ज मिळविण्यासाठी कन्वेनर, सीएलएटी-२०१३ यांना विनंती अर्ज करावा लागेल. सोबत वरील रकमांचा डिमांड ड्राफ्टही पाठवावा लागेल. हा ड्राफ्ट नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर सीएलएटी, ए/सी, जोधपूर (राजस्थान) या नावे काढावा लागेल.
पत्ता- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नॅशनल हायवे- ६५, नागर
रोड, मँदोर, जोधपूर, दूरध्वनी-०२९१- २५७७०४४, फॅक्स२५७७५४०,
वेबसाइट-
www.clat.ac.in मेल
help...@clat.ac.in
* इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ :
निरमा युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ या संस्थेच्या वतीने विधि विषयातील पुढील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत- १) बॅचलर ऑफ आर्ट अँड एलएलबी (ऑनर्स), २) बॅचलर ऑफ कॉमर्स अँड एलएलबी (ऑनर्स), ३) बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अँड एलएलबी (ऑनर्स). हे सर्व अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचे आहेत. ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. या प्रवेशासाठी कॉमन लॉ एन्ट्रन्स अॅडमिशन टेस्ट २०१३ द्यावी लागेल. निरमा इन्स्टिटय़ूट ऑफ लॉचा प्रवेश अर्ज
www.nirmauni.ac.in/law या वेबसाइटवरून ऑनलाइन भरावा लागेल.
संपर्क- द अॅडमिशन ऑफिसर, इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ, निरमा युनिव्हर्सिटी,
सारखेज- गांधीनगर रोड, अहमदाबाद, गुजरात- ३८२४८१,
दूरध्वनी- ०२७१७- २४१९००-०४ मेल
admiss...@nirmauni.ac.in वेबसाइट-
www.clat.ac.in
* डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज :
डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजची स्थापना १९११ साली करण्यात आली. या महाविद्यालयाने बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासन, व्यवस्थापन, बँकिंग, औद्योगिक क्षेत्र आणि विधि शिक्षण आणि न्यायालयांमध्ये करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या अभ्यासक्रमात व्यवस्थापनाचे तंत्र- कौशल्य आणि आजच्या काळाशी सुसंगत असे विधि शिक्षणाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत औद्योगिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रशासकीय, नियोजन आणि व्यवस्थापकीय क्षेत्रात विविध प्रकारचे बदल झपाटय़ाने झाले आहेत. हे बदल अद्यापही होत आहेत. या बदलांशी सुसंगत अशा विधी अभ्यासक्रमाची गरज निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन बार कौन्सिल ऑफ इंडियाने विधि अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी न्यायाधीश, विधि महाविद्यालयांतील प्राध्यापक यांचे साहाय्य घेण्यात आले. याच संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट अॅण्ड एलएलबी, बॅचलर ऑफ सायन्स अॅण्ड एलएलबी आणि बॅचलर ऑफ कॉमर्स अॅण्ड एलएलबी हे अभ्यासक्रमही हाच उद्देश ठेवून सुरू केले आहेत.
अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. मात्र खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीमध्ये ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम १० सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. प्रत्येक सत्राची सध्या
असलेली
फी-४० हजार रुपये.
पत्ता- १९-३-२१/एफ १/ए २०,
तेलगूनगर, रेनिगुंटा रोड, तिरुपती- ५१७५०१, दूरध्वनी-०८७७२२३२३५९,
वेबसाइट-
www.drambedkarlawcollege.com, ई-मेल-
in...@drambedkarlawcollege.com
* गाल्गोटिएॅस युनिव्हर्सिटी :
ग्रेटर नॉयडास्थित गाल्गोटिएॅस युनिव्हर्सटिीनं बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड एलएलबी, बॅचलर ऑफ आर्ट अॅण्ड एलएलबी हे दोन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
कालावधी- पाच र्वष. पत्ता- प्लॉट नंबर-२, सेक्टर १७-ए, यमुना
एक्स्प्रेस वे ग्रेटर नॉयडा, गौतमबुद्धनगर (उत्तरप्रदेश),
ईमेल
admis...@galgotiasuniversity.edu.in, वेबसाइट
admis...@galgotiasuniversity.edu.in, दूरध्वनी-०१२०४३७००००.
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.