जल जंगल जमीन जीव.... जोहार !
*आपण गुंगीत आहोत कि धुंदीत आहोत?*
देशभरातील आदिवासी थोड्या अधिक फरकाने अस्तित्व संपवणाऱ्या गोष्टींना तोंड देतो आहे. विविध मार्गाने जल जंगल जमीन अस्तित्व परवावलंबी/संपवले जाते आहे. संवैधानिक अधिकार पण प्रभावीपणे अंमलात आणलेले जाणवत नाहीत.
दंतेवाडा, ओडिशा, केवडीया, मेळघाट, पालघर .... इत्यादी यादी खूप मोठी आहे. २०१४ च्या अनुसूचित क्षेत्रात १००% स्थानिक आदिवासींना भरती या राज्यपालांच्या अध्यादेशाने एक तरी आदिवासींना नोकरी मिळाली हे शासन सांगू शकत नाही.
प्रत्येक गावात कुशल उच्चशिक्षित आदिवासी तरुण असून नोकरी करण्यासाठी मात्र इत्तर जिल्ह्यातून *ठराविक पद्धतीने* आयात केलेली माणसे. *तरी आदिवासी समाज अजून झोपेत आहे कि गुंगीत आहे कळत नाहीये.*
नकळत आपली समाज व्यवस्था, सांस्कृतिक संपदा, आर्थिक स्वावलंबन, कुशलता, स्वाभिमान हळू हळू संपतो आहे.
____________________________
आदिवासी विकास कसा तुम्हीच ठरावा
There you go!
Around the world ‘development’ is robbing tribal people of their land, self-sufficiency and pride and leaving them with nothing.
https://youtu.be/uFU2iQcFv7U