||आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १७ मार्च २०१८||

8 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Mar 17, 2018, 7:52:01 AM3/17/18
to AYUSH | adivasi yuva shakti

||आयुश उपक्रम मिनी बुलेटिन १७ मार्च २०१८||

 

रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन, एक मोठे पाऊल आणि अखेर अविरत प्रयत्नांना यश

 

आयुश तर्फे आपण आदिवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनाची पर्यायी व्यवस्था मजबुतीकरणासाठी गेली अनेक वर्ष विविध प्रयोग करीत आहोत. समाजात विखुरलेले पोटेंशियल रचनात्मक कार्यात यावे त्यातून समाज हिताचे उपक्रम आणि त्यासाठी पूरक वातावरण व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहोत.

 

अनुसूचित क्षेत्रातील प्रत्येक गावात स्थानिक पातळीवर पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मितीतून प्रत्येकाला काम मिळावे (निरक्षर/साक्षर/उच्च शिक्षित). ज्यातून स्थलांतर / जमिनींचे हस्तांतर / वाढती आर्थिक विषमता / बेरोजगारी कमी होऊन समाजाचे स्वावलंबन मजबूत करता येऊ शकेल अशी खात्री आहे.

 

१) वारली चित्रकला लघु गट निर्मिती

डहाणू/तलासरी/पालघर तालुक्यातील प्रत्येकी १० आदिवासी कलाकारांचे प्रोडकट स्पेसिफिक ६ ग्रुप बनविण्यात आले आहेत. त्या मार्फत प्रायोगिक तत्वावर विविध उपक्रम आणि वास्तुनिर्मिती करण्यात येते आहे. सदर उपक्रमाला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांचे सहकार्य मिळाले. विशेषतः प्रकल्प अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांचे सविस्तर मार्गदर्शन मिळाले. सध्या या गटांचे प्रतिनिधी कलाकार पुणे येथील कला सांस्कृतिक प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत.

 

२) केंद्रीय सहाय्य योजना (Central Assistance Schemes) अंतर्गत प्रस्तावाची फायनल प्रेजेंटेशन साठी निवड झाली

गेली अनेक वर्षे या संदर्भात विविध अनुभवी /तज्ञ /जाणकार यांच्याशी चर्चा करून एक डिटेल प्रकल्प बनवला आहे. अनेक वेळी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सदर विषय पोचवला होता. फायनली या वर्षी राज्यपातळीवर यातील ३ प्रकल्पांची निवड झाली आहे.  

 

आदिवासी विकास विभागा तर्फे, २२ मार्च रोजी मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे प्रेझेन्टेशन साठी बोलावण्यात आले आहे.

निवड झालेले ३ प्रकल्प पुढील प्रमाणे (पालघर /ठाणे/रायगड/मुंबई परिसरातील अनुसूचित क्षेत्रा साठी)

 

I) वारली चित्रकला क्लस्टर

आदिवासी हस्तकला आणि कलाकृती, पर्यटन विषयी पारंपरिक तसेच आधुनिक वस्तू आणि कलाकृती तयार करण्यासाठी क्लस्टर पद्धतीने अंदाजे ५०५० कुटुंबाना रोजगार निर्मिती

 

II) शेती / जंगल उत्पादन क्लस्टर

गरजे पेक्षा जास्त तयार होणारा भाजीपाला, कडधान्य, फळे, फुले, वनोपज, औषधी वनस्पती इत्यादी एकत्रित करून विक्री केंद्र, प्रोसेसिंग आणि ब्रँड बनवून शेतकऱ्यांना उत्पादन वाढ करून देणे. अंदाजे १६०० कुटुंबाना लाभ

 

III) कम्युनिटी रेडिओ स्टेशन

आदिवासी सशक्तीकरण आणि समाज जागृतीसाठी समाजाचे स्वतःचे रेडिओ सेंटर जेथून ऑनलाईन आणि ऑफलाईन उपक्रम. अंदाजे १४,००० लोकांपर्यंत सेवा. पारंपरिक ज्ञान, भाषा, सांस्कृतिक मूल्य, सामाजिक प्रश्न, सामान्य ज्ञान, आरोग्य, शेती, रोजगार विषयी माहिती पसरविण्यास कामी येईल. समाजाची एकता वाढविण्यास हातभार लागेल

 

सदर प्रकल्प मंजूर करणे किंवा सुधार करणे हे पूर्णतः गठीत साशकीय समिती वर आहे. पण साशकीय पातळीवर हा विषय आणि कन्सेप्ट मांडायला संधी मिळणे हे खूप मोठे यश आहे. त्या निमित्ताने अनुसूचित क्षेत्रात जल जंगल जमीन ओरबाडून विषारी आणि प्रदूषणकारी औदयोगिक प्रकल्प स्थानिक मंजुरी नसताना लादण्या पेक्षा पारंपरिक व्यवसायातून रोजगार निर्मिती होऊ शकते, हे किंवा या पेक्षा अधिक प्रभावी उपाय आदिवासी समाज हिताचे पर्याय पुढे येऊ शकतील, त्या संदर्भात चर्चा होईल. 

 

आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे. आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets do it together!

 

आयुश | आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in

Reply all
Reply to author
Forward
0 new messages