आपल्या माहितीसाठी..
संवाद - ट्रायबल कॉन्क्लेव्ह २०१८ (जमशेदपूर १५-१७/१०/२०१८)
या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या आदिवासी कार्यक्रमात समाजासाठी कार्य करणारे आणि समाजावर त्याचा चांगला प्रभाव पडणाऱ्या आदिवासी संस्था/संघटना/ग्रुप/व्यक्ती यांच्या सक्सेस स्टोरी सदरात अनुभव कथन करण्यासाठी निमंत्रित केले होते.
या वेळेस पण या सदरात *आयुश च्या वारली चित्रकला उपक्रम* साठी निमंत्रित करण्यात आले आहे. संजय दा पऱ्हाड, संदिप दा भोईर, कल्पेश द गोवारी, श्रीनाथ दा ओझरे, सदानंद दा पुंजारा सहभागी होत आहेत. सोबत *भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे* ५ प्रतिनिधी सहभागी होते आहेत.
आपल्याकडून सक्सेस स्टोरी सदरात पुढील नावे आयोजकांना कळविण्यात आली आहेत.
१) *अजय खर्डे* (नंदुरबार जिल्हा)
*TTSF (ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन)* चे संस्थापक, आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासाठी भरीव कार्य. तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गात सामाजिक जबाबदारी विषयी संवेदशीलता वाढविण्यात मोठा वाटा.
२) *डॉ सुनिल पऱ्हाड* (खंबाळे, पालघर जिल्हा)
सामाजिक जागृती आणि आदिवासी सशक्तीकरणात सक्रिय सहभाग. आदिवासी चळवळ मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ देता यावा साठी नोकरी चा त्याग. जल जंगल जमीन शिक्षण आरोग्य हक्क चळवळ संस्कृती अस्तित्व इत्यादीसाठी भरीव कार्य. आदिवासी चळवळ मजबूत करण्यासाठी संघटन बांधणीचे दायित्व. *आदिवासी एकता परिषद, भूमी सेना, आदिवासी समन्वय मंच* आणि आयुश यात महत्वाची भूमिका
३) *एकनाथ भोये* (नाशिक)
निवृत्त विधी अधिकारी, सध्या आदिवासी विषयावर *कायदेशातीर जागरूकता* करण्यात भरीव कार्य. आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटना/संस्था/कार्यकर्ते/नेते यासाठी कायदेशीर दृष्टिकोनातून मार्गदर्शन. सामान्य आदिवासींत कायदेशीर तरतुदींविषयी जागरूकता करण्यात मोठा वाटा.
४) *निलेश भूतांबरा* (पनवेल)
*प्रबळगड माची टुरिजम* चे फाउंडर. अभयासु आणि चिकित्सक पद्धतीने पूर्ण नियोजनपूर्वक प्रबळगड माची येथे पर्यटन वाढीस लावून स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्वाचा वाटा.
५) *रवींद्र तळपे* (पुणे)
आदिवासी विद्यार्थी, आश्रम शाळा येथील अनेक प्रश्नावर सरकारला कायदेशीर पद्धतीने आदिवासी समाज हित जपण्यासाठी PIL दाखल करून पाठपुरावा, अनेक प्रश्नावर समर्पक उपायोजना करण्यासाठी मोठा वाटा
६) *संपत देवजी ठाणकर* (गंगानगाव, पालघर जिल्हा)
आदिवासी पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भरीव कार्य. अनेक वर्ष अभ्यास करून आदिवासी संस्कृती आणि परंपरा यावर स्वखर्चाने ७ पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण व प्रकाशन. * गावदेव जागरण उपक्रमा* मार्फत गावा गावात हिंडून आदिवासी संस्कृती आणि परंपरा विषयी जागरूकता
७) *नामदेव आणि भास्कर भोसले* (उरळी, पुणे जिल्हा)
पारधी समाजा विषयी परंपरा संस्कृती या विषयी अभ्यास करून विविध लिखाण, कादंबरी प्रकाशन. पारधी समाजाच्या विविध प्रशांवर पद्धतशीर आंदोलनात महत्वाची भूमिका.
८) *राजेंद्र मरस्कोले* (नागपूर)
*OFROT (ऑरगॅनिझशन फॉर ट्रायबल राईट्स)* चे नेतृत्व. आदिवासी हक्क बाधित ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग. आदिवासी समाज हितासाठी कायदेशीर मार्गाने विविध प्रकरने सोडविण्यात महत्वाची भूमिका
सहज लक्षात आले, प्रत्येक क्षेत्रात आपले अनेक यशस्वी उदाहरणे आहेत. आदिवासी यशोगाथांचा संग्रह व्हावा या साठी आपण प्रयत्न करीत आहोत.
आपल्या संपर्कातील समाजावर प्रभाव पडणाऱ्या सक्सेस स्टोरी येथे जमा करू शकता www.sucess.adiyuva.in
आदिवासी समाज हितासाठी असलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न मजबूत करूया,
Lets do it together!
जोहार !