|| वैयक्तिक अनुभव:*कोरियातील 3रा आठवडा*||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 3, 2023, 5:37:16 AM1/3/23
to AYUSH google group
|| वैयक्तिक अनुभव:*कोरियातील 3रा आठवडा*||

▪️[स्थानिक *आदिवासी भाषा* : निहरी]
कोरियात हिंडताना, पोलिसां रस्त्यावर गाड्या थांबवून कागदा तपासीत का लोखाना अडचण/वखत/खोटी होल असां करतांना नीही दिसलीं. निस्ता दुरसीं पोलीस स्टेशन नांगला त्याहो भलतां बेस दिसला, बिहवला नीही. गरज लागली लगेच मजतीला पोलीस येत पण ते हो मयतर दसं. लोखां हो बेस नियम पालींत ना पोलिंसा हो त्यांचा काम अरामात करींत होवीं. बेस रेहा. 

▪️[साधारण *मराठी भोली* भाषा]
माझ्या येथील अनुभवात कोरियन पोलिसांचा वावर, पोलीस स्टेशन चे वातावरण, लोकांसोबत चे वागणे खूप मैत्रीपूर्ण वाटले. कधीही इतरांना त्रास होईल असे असा एक हि अनुभव मला नाही आला. *तंत्र्यज्ञानाचा उपयोग, लोकांची जागरूकता/स्वयंशिस्त हा हि एक महत्वाचा मुद्दा* असावा कदाचित. सहज माहितीसाठी - https://youtu.be/Ja54rv_ma8Y 

पालघर पोलिसांनी गेल्या आठवड्यात कासा येथे जनसंवाद अभियाना मार्फत कार्यक्रम आयोजित केला होता. *स्थानिक कलाकारांच्या मार्फत कार्यक्रम झाल्याने, युनिकपणा जाणवला. आयोजकांचे खूप सारे कौतुक.💐* पूर्ण कार्यक्रम बघण्यासाठी -https://youtu.be/A2M0YIFIGYg 

अशा विविध उपक्रमांनी पोलिसिंग दरम्यान सामान्य नागरिकांना आपलेसे/आधार/सकारात्मकता वाटेल असे वातावरण तयार केल्यास नक्कीच पोलिसांबद्दल ची प्रतिमा सुधारण्यासाठी हातभार लागेल. व सोबत सामान्य नागरिक म्हणून आपण पण नियम/शिस्त स्वतःहून पाळायला हवेत. 

▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡
खासकरून युवा पिढीत वाढणारे व्यसनाधीनता, मानसिक तणाव, एकटेपणा, बेरोजगारी, उत्पन्नापेक्षा जास्त महाग जीवनशैली, नकारात्मक/गुन्हा/सोप्प्या/अयोग्य पद्धतीने पैसे कमावण्याचे आकर्षण, इत्यादी विविध विषयी योग्य प्रमाणे *जागरूकता आणि मार्गदर्शन समाजातील सुशिक्षित पिढीने स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या गाव स्थरावर* करायला हवे. 

आपल्या पिढ्या न पिढ्यांनी उपयोगात आणून विकसित केलेली समाज *संवादाची व्यवस्था तपासून पुन्हा पुनर्जीवित/सशक्त करायला हवी.* जसे आपले *आदिवासी सण/उत्सव*💡 (कॅलेंडर मध्ये नसलेले) ज्या माध्यमातून सहज एकत्र येणे, संवाद करणे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, सहकार्य करणे, समाज एक कुटुंब हि भावना रुजवणे, व्यक्त होण्यासाठी/मानसिक आधारासाठी एक प्लॅटफॉर्म, इत्यादी. 

जेणेकरून या *बदलत्या वातावरणात त्या सोबत जुळवण्याची क्षमता समाजात तयार होईल.* तुम्हाला काय वाटते? चलो सामाजिक जागरूकतेला हातभार लावूया. Let’s do it together! जोहार
Reply all
Reply to author
Forward
0 new messages