तलासरी वसतिगृहात संगणक कक्ष | |
तलासरी : आदिवासी विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, त्यांना संगणक चांगल्यारितीने हाताळता यावा यासाठी आदिवासी विकास विभागाकडून तलासरीतील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाला नऊ संगणक पुरविण्यात आले. या संगणक कक्षाचे उद्घाटन तलासरीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त डहाणू विधानसभेचे आमदार राजाराम ओझरे यांच्या हस्ते करण्यात आले. तलासरी आदिवासी मुलांच्या वसतीगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. राजाराम ओझरे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांचे पूजन केले. यावेळी आदिवासी मुलांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, आदिवासी मुलांनी चांगल्याप्रकारे शिक्षण घ्यावे तसेच संगणकीय ज्ञान अवगत करुन आपला विकास करावा. आदिवासींसाठी शासन अनेक योजना राबविते त्याचा फायदा आदिवासी समाजाने घ्यावा. (वार्ताहर) |