गणपतीच्या सुट्टित आपल्या मुलांना, मित्र-मैत्रीणी आणि सर्व समाज बांधवांनी गावदेव, गवर आणि गौरी नृत्य मध्ये सहभागी व्हायला विसरु नका.
निसर्गाचे जतन करून जीवन सृष्टी आणि प्रकृतीला आपले परिवार मानणारी आपल्या सांस्कृतिक मुल्य जतन करून जागरूकता करण्याचीआवशक्यता आहे.
आपल्या भावंडा सोबत अळू, अनुन, वालुक, चेरभूट खाण्या साठी वाड्यात जरूर जावे. पावोलीत पिकायला ठेवलेल्या अनुन सगळ्यांसोबत वाटून खाने.
कान टोपे, पान मोड्या (सावेल्या), चामट्या सगळ्यांनी एकत्र पंगत करून आजी आजोबा कडून गोष्टी ऐकणे.
सामाजिक एकात्मता अधिक जागृत करून सामाजिक जबाबदारीची जागरूकता करूया. युवक आणि अनुभवी यांनी एकत्र येवून आपल्या समाजा पुढील संकटे आणि उपाय यावर चर्चा करून यावर कायमची उपाय योजना आखून कृती साठी प्रयत्न करूया.
सांस्कृतिक आणि सामाजिक जबाबदारीचे कार्य करणाऱ्या भगत, सवासीन, धवलेरी, वऱ्हाडक्या, उंबऱ्या, इत्यादी सगळ्यांची ओळख नवीन पिढी ला करून देणे. व्यसन आणि इत्तर समाज विघातक गोष्टींचे समाजातून हद्द पार करूया.
या टीवी आणि शहरीकरण या गडबडीत आपली सांस्कृतिक ओळखच नष्ट नष्ट तर होत नाही ना याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपले उत्सव सांस्कृतिक मुल्य आणि महत्वाचे म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती याचे जतन करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
इत्तराना चुकीचे आणि आपण श्रेष्ठ सांगण्याची पद्धत आपल्या आदिवासी समाजात नाही पण इतकाच उत्साह आणि उर्जा आपली आदिवासी सांस्कृतिक ओळख जतन करून आदिवासी समाजा साठी उपयोगात आणूया.. Lets do it together!