।। आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ।।

12 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Sep 11, 2018, 10:36:48 AM9/11/18
to AYUSH | adivasi yuva shakti

।। *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ।।

 

आदिवासी कलाकार एकत्रीकरण हा विषय घेऊन बैठक आयोजित करीत आहोत. आपल्या संपर्कात असलेल्या सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी होण्यास सांगावे.

 

आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी खात्री आहे.

 

*उद्देश* : कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न.

ठिकाण : (लवकरच कळवले जाईल)

दिनांक : (लवकरच कळवले जाईल)

 

*अपेक्षित सहभागी*

१) आदिवासी कलाकार आणि युवक

(चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे, शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)

२) आणि सदर विषयाला धरून रचनात्मक मार्गदर्शन करणारे)

 

*बैठकीचे विषय*:

- आदिवासी कलेतून आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी लागणारी तयारी

- आयुश तर्फे आगामी उपक्रम माहिती (वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती, महिला गट बांधणी विशेष उपक्रम)

 

*वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन* :

- वस्त्र मंत्रालय दिल्ली येथून हस्तशिल्प विकास आयुक्त कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन

 

*नोंदणी*

सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी : www.event.adiyuva.in

 

आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे

 

आयुश । आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | ay...@adiyuva.in | 0 9246 361 249

Nikhil Mestry

unread,
Sep 11, 2018, 2:18:20 PM9/11/18
to adi...@googlegroups.com
प्रति
टीम आयुष
आयुषमार्फत आजतागायत आदिवासींसाठी घेतल्या गेलेल्या आपल्या आजपर्यंतच्या कार्यक्रमाचे कौतुक आहे।

आजपर्यंत आपण वारली चित्रकला, हस्तकला आदी विषयी एकत्रीकरण करून रोजगार निर्मितीसाठी व्यासपीठ मिळवून दिले असले तरी या पलीकडे जाऊन मार्गदर्शन म्हणा किंवा सल्ला आपणास देत आहे तो खलील प्रमाणे।

परदेशातील नृत्य संस्कृती भारतात भर पाडत आहे। पाश्चिमात्य नृत्य संस्कृती भारतीय आपलेसे करून घेत आहेत। याला कारणेही अनेक आहेत। या पाश्चिमात्य नृत्यातून व्यावसायिक मंच बनविणे व तो यशस्वीही होत आहे।
   
       या पार्श्वभूमीवर त्या पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा आदिवासी तारपा नाच असो वा पारंपरिक नाच तो भारताच्या नव्हे तर जगाच्या पटलावर कसा नेऊन ठेवता किंवा मांडता येईल ज्याने व्यावसायिक व्यासपीठ तयार होईल व खऱ्या अर्थाने रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होईल।

त्यासाठी जिल्ह्यातील व त्याबाहेरील नृत्य समूहाला आपल्याकडे नोंदणीकृत करावे। त्यामाध्यमातून त्यांची चित्रफिती बनवून अनेक ठिकाणी भेट देऊन त्याठिकाणी तारपा नाच, पारंपरिक नाच यासाठी अप्रोच करावे। ज्याने त्या ठिकाणी त्याला वाव मिळेल आणि साहजिकच 100 लोकांमधून आणखीन असे लोक त्या आवडत्या नृत्याला दाद देऊन आपणास संपर्क करतील। त्यामुळे व्यसपीठासह रोजगाराचा प्रश्न सुटण्यासही मदत होईल।

आणखीन मार्गदर्शनासाठी किंवा सल्ल्यासाठी माझा संपर्क: 8087696613 निखील मेस्त्री,लोकसत्ता पालघर

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/70ff5e14-0b56-4e5c-b0fb-57baa60a12af%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

AYUSH main

unread,
Sep 11, 2018, 3:29:10 PM9/11/18
to adi...@googlegroups.com

धन्यवाद, हो नक्कीच निखिल दा.

यावर विचार करून उपक्रम सुरु केले जातीतील . सध्या प्रायोगिक तत्वावर आहेत त्याला स्वरूप देऊन नियोजन बद्द उपक्रम करूयात.

 

आपल्या सुचने साठी आभारी!

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

 

--

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.


To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages