डॉ पायल तडवी यांच्या संस्थात्मक हत्येच्या अनुषंघाने

5 views
Skip to first unread message

Bhavesh Lokhande

unread,
May 26, 2019, 12:47:06 AM5/26/19
to adi...@googlegroups.com

२००५-२००८ हा कालखंड देशात युथ फॉर इक्वॅलिटी नावाच्या महाहरामखोर (याहून चांगला शब्द वाचकांनी अपेक्षित धरावा) अवलादींनी गाजवला होता. देशभर आरक्षणाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याची सुपारी घेतलेले अनेक महाभाग याच्या मागे होते.गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीनंतर सुरु झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाला काटशह देण्यासाठी या देशातल्या सुपारीबाज सरकारने हा मुद्दा ऑर्केस्ट्रा केला होता.
समाजमाध्यमांवर एकच एक मुद्दा रोजच्या रोज लोकांच्या मनावर बिंबवला जात होता तो म्हणजे आरक्षणामुळे देशातल्या फार मोठ्या वर्गावर अन्याय होतो. गुणवत्ता डावलली जातेय आणि योग्य उमेदवार ,विद्यार्थ्यांची जागा अयोग्य उमेदवाराला, विद्यार्थ्याला दिली जातेय.ह्या मुद्द्यासाठी मीडिया चॅनेल्सवर रोजच्यारोज महाचर्चा घडत होत्या, दिल्लीला चाललेलं आंदोलन रोज लाईव्ह टेलिकास्ट होत होतं , मध्येच सत्ताधारी ,कधी विरोधी पक्षातले चमकेश नेते कॅमेऱ्यासमोर जाऊन आंदोलनकर्त्यांची लाल करत. सोशल मीडियावर टोकाच्या विसंगत पोस्टचा भडीमार केला जाई.सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं. 
या कालखंडात दहावी बारावीला असणारी ,सीईटीचा अभ्यास करणारी मुले या प्रकाराने बावचळून गेली होती.आमच्यासारखे चळवळे आरक्षणामागची वैचारिक भूमिका मांडून या सर्व राक्षसी प्रोपोगंड्याचा तोकडा प्रतिकार करीत होती. मी कित्येकदा कॅंम्पस मध्ये उभा राहून आरक्षण विरोधकांचे बौद्धिक घेतलेय. गेटबाहेरच्या कट्यावर उभे राहून हे आंदोलन कसे दिशाभूल करतेय हे घसा फाटेस्तोवर सांगितलेय.बहुजन ,आदिवासी मुलांवर होणारा अन्याय, जातीवादाचे जुने-नवे रूप,आरक्षणाची गरज ,त्यामागची भूमिका आणि संघर्ष हे सगळं सांगायचो. खोट्या जात प्रमाणपत्रावर प्रवेश घेऊन गरिबांचे हक्क मारणाऱ्यांविरुद्ध,अनुशेष ठेवत जागा विकणाऱ्यांच्याविरुद्ध,जातीवरून होणाऱ्या मानहानी आणि रॅगिंगच्या विरोधात आवाज उठवायचो.अनेक जण यावर हुज्जत घालायचे.असं नसतंच,आता कोणी जातीयता नाही पाळत वगैरे जस्टिफिकेशन्स द्यायचे. जनरल कॅटेगरीच्या मुलांना कसा त्रास होतो याच्याबद्दल तावातावाने बडबड करायचे. 
  यादरम्यान त्या आंदोलनाचा टीव्हीवर पाहिलेला एक प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला आहे. दिल्लीच्या एम्स किंवा तत्सम महाविद्यालयात एमबीबीएस च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातून आलेल्या मुलीची प्रतिक्रिया मला आठवते कि ती जरी आरक्षित प्रवर्गातील असली तरी तिला वाटते कि आरक्षण काढून टाकायला हवे कारण जनरल कॅटेगरीवर अन्याय होतोय वगैरे वगैरे. 
  आज डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येबाबत वाचले तेव्हा मला हे सारे जुने दिवस , त्यावेळचे सगळे अनुभव आठवले. 
डॉ. पायल तडवी आणि मागच्या अनेक वर्षांत घडलेल्या शैक्षणिक संस्थांमधल्या , कामावरच्या ठिकाणी जातीवरून झालेल्या अत्याचार-अन्यायामुळे झालेल्या आत्महत्यांना कोण जबाबदार आहेत याचे उत्तर स्पष्ट आहे - जबाबदार ते लोक आहेत ज्यांनी युथ ऑफ इक्वॅलिटीला-इंडिया अगेन्स्ट रिझर्वशेन सारख्या वायझेडना जोरदार सपोर्ट केला, स्वतः आरक्षित प्रवर्गातले असतानाही आरक्षणाला विरोध केला, आरक्षित वर्गातील विद्यार्थी- उमेदवारांच्या गुणवत्ता तपासल्या. जातवास्तव नाकारून शोषकांच्या नॅरेटिव्ह्सन बळी पडत स्वतःच्या समाजबांधवांच्या हक्काना पायदळी तुडवत स्वतःच्या वैयक्तिक हितसंबंधांना महत्व देत इथल्या आरक्षण समर्थकांचा आवाज,चळवळ क्षीण केली. आरक्षण विरोधकांत बहुतांश असे लोक आहेत ज्यांनी स्वतः कधीतरी आरक्षणाचा लाभ घेतलाय. यांची स्वतःची पोटे भरली,यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची,नैसर्गिक कर्तव्याची जाण नाही.
डॉ. पायल तडवी यांची हि आत्महत्या , नव्हे संस्थात्मक हत्येला जबाबदार जेवढे युथ फॉर इक्वालिटी सारखे दांभिक लोक , इंडिया अगेन्स्ट रिझर्व्हेशन सारखे सोशल मीडिया हॅन्डल्स जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार त्यांची तळी उचलून धरत आपल्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येत शोषकांच्या बाजूने उभे राहणारे आरक्षित प्रवर्गातील आरक्षणविरोधक लोकही आहेत !

- भावेश लोखंडे 

Parag Patil

unread,
May 26, 2019, 1:32:25 AM5/26/19
to adi...@googlegroups.com
अगदी बरोबर आहे.
दीड हजार वर्षे ज्या लोकांनी या देशातल्या आदिवासी (फक्त एस टी नाही तर इतर मागास बहुजन आणि एस सी) लोकांवर अमानुष अत्याचार केला. ज्यांनी आपल्या सर्वांना शिक्षण नाकारले, त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली . त्यांना आज आपला विकास होताना पाहून वाईट वाटत असेल.

जे सवर्ण लोक आय आय टी, अमेरिकन युनिव्हर्सिटी , आय आय एम, शिकतात. आणि ते जेव्हा आरक्षणाला विरोध करतात, वास्तविक, त्यांना आरक्षणाची गरज समजते, पण ते हे जाणून बुजून करतात. कारण , एवढ्या शिकलेल्या लोकांना हे समजत नाही , हे चुकीचे आहे.

मोठे मोठाले लोक, जेव्हा आरक्षणला विरोध करतात ( जाणून बुजून) तेव्हा ते उपेक्षितांना मागे सोडतात. अश्या बिनडोक लोकांच्या मागे साधारण विद्यार्थी लागून मनाची चुकीची भ्रांती करून आपल्या समाजाची अधोगती करतात. 

आरक्षण, हे भीक आणि एखाद्या समाजाची अगर सरकारची आपल्या प्रति दिलगिरी नसून, आपला हक्क आहे. 

भेदभावामुळे होणाऱ्या संस्थात्मक आत्महत्या ह्या, फक्त हत्याचं आहेत. या मध्ये काहीही दुमत नाही. 
मोठ्या संस्थानमध्ये, आपल्या ला इंग्रजी येत नाही, आपले राहणीमान साधे असल्यामुळे, पैसे कमी असल्यामुळे, मनाची घालमेल होते आणि आपण कमकुवत होतो. एखाद्या साधारण परिसंवादामध्ये पण आपण बाहेर होतो कारण, आपण त्या लायकीचे नाहीत हे आपण आणि बाकीचे समजतात.

 ज्या खाजगी कंपन्या जॉब साठी येतात , त्या फक्त कुलकर्णी, जोशी, पाटणकर यांनाच नोकऱ्या देतात. कारण , नोकऱ्या देणारे लोक ही तेच. कंपन्या पण त्यांच्याच. 

मित्रांनो, माझं म्हणणं एवढेच आहे की , आपली लढाई मोठी आहे. आपल्याला फक्त नोकऱ्या नाही, तर नोकरी देणारे बनावे लागेल. यासाठी, आपल्याला आपल्या मनातील जिद्द दुप्पट नाही, तिप्पट नाही तर हजारपट करावी लागेल.
जर इंग्रजी येत नसेल, तर यूट्यूब वर चित्रपट , गाणी पाहण्यापेक्षा इंग्रजी कंटेंट पाहावे लागेल. 
अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत, जे फ्री आहेत ते पाहावे लागतील. 
अनेक चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, जसे आय आय टी, आय आय एम, टी. आय.आय. एस. यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी धडपड करावी लागेल.
एक जोमाचे नेतृत्व उभे करावे लागेल, जे लोभी नसेल, आणि समाजासाठी झटणारे असेल.
आंबेडकरांनी दिलेल्या मंत्रात आपल्याला मंत्रमुग्ध व्हावे लागेल , आणि तो मन्त्र आहे, 'शिका, एकत्र व्हा आणि संघर्ष करा' !!

थोडक्यात काय तर, आपण या देशाचे मालक आहोत, देश आपल्या आणि फक्त आपल्या बापाचा आहे. आपल्याला कोणाला ही घाबरायची गरज नाही. आपण जिंकण्यासाठी लढू आणि करून दाखवू !!!

जोहार !!
(आयुष च्या या प्लॅटफॉर्म ला अनेक कारणांसाठी मनापासून धन्यवाद)
Parag Patil,
PhD Scholar,
Discipline of Chemical Engineering,
IIT Gandhinagar

+91-9421178717

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

vkantela

unread,
May 26, 2019, 1:52:30 AM5/26/19
to adi...@googlegroups.com
Very well said. Let us do it together. 



Sent from my Samsung Galaxy smartphone.

Bhavesh Lokhande

unread,
May 28, 2019, 6:47:41 AM5/28/19
to adi...@googlegroups.com
मला आश्चर्य वाटतेय,
डॉ पायल तडवींच्या संस्थानिक हत्येच्या विरोधात आदिवासी समाजाकडून होणारा विरोध इतका क्शिण कसा?
हैदराबादेहून Ambedkarite Students Association पत्रक काढून विरोध दर्शवते,
वंचित बहुजन आघाडी नायर हॉस्पिटलला मोर्चा नेते.
आंबेडकरवादी तुटून पडलेत समाजमाध्यमांवर ...
पण
आदिवासी नेते,संस्था,संघटना कुठे आहेत?


Vasavi Kiro

unread,
May 28, 2019, 10:26:12 AM5/28/19
to adi...@googlegroups.com
It is highly objectionable. Need to protest very strongly.Asia Ville news agency  from Delhi had called for opinion/discussion.
Need to  file FIR  against Hema Ahuja, Ankita Khandelwal and Bhakti mehar and apply SC ST Atrocities Act.
with solidarity
Dr. Vasavi Kiro

You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

Sanjay Dabhade

unread,
May 28, 2019, 10:47:28 PM5/28/19
to adi...@googlegroups.com
In Pune we have done large protest at Goodluck chowk , fc road... today...
Adivasis, Ambedkarites, Left and socialists all participated .

Dr. Sanjay Dabhade
Pune 
9823529505

चेतन Chetan

unread,
May 29, 2019, 2:53:07 AM5/29/19
to adi...@googlegroups.com
समाज बांधव ठीक ठिकाणी निषेध नोंदवून न्यायाची मागणी करत आहे मात्र महाराष्ट्रातील मुंबई जवळील नेते, आमदार खासदार यांना कशाचे सोयर सुतक नाही. मिडिया आदिवासींच्या मोर्चे मागणी ला पुरेसे ब्रोद्कास्त करत नाही, यापूर्वीही कुपर रुग्णालयात दोन आदिवासी नर्स नी त्रास दिला जातोय याची तक्रार केली होती.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

Bhavesh Lokhande

unread,
May 30, 2019, 5:27:12 AM5/30/19
to adi...@googlegroups.com
I have been going through the facebook pages like India against reservation, Say no reservation etc. which have been constantly spreading hatred against people form reserved categories. One can easily correlate the institutional murder of Dr Payal Tadavi and other atrocious incidents took place in educational institutes and workplaces.
These kind of social media instruments should be countered well and FIR/complaints should be registered against them with Police/cyber cell.
Please also not to forget reporting these facebook pages as well.







--
Bhavesh Lokhande

vasant karbat

unread,
May 30, 2019, 5:27:17 AM5/30/19
to adi...@googlegroups.com
आदिवासी नेते या वेळेस महिलाच जास्त निवडून आल्या आहेत काय करतात ह्या महिला एकाच देखील साधी कमेंट नाही . आणि आपला समाज मूग गिळून गप्प. आंबेडकरी समाज लढा देत आहे पण आपले लोक फार कमी सहभागी आहेत. आमदार खासदार यांनी राजीनामा द्या.
          डॉ . लोकांना भरण्यास प्रवृत्त केले जाते मग सामान्य आदिवासी माणसाला किती त्रास देत असतील . आदिवासी म्हणून मला देखील खूप चटके  बसलेत पण आता आवाज उठवतो.

On Thu, 30 May 2019, 12:27 am vasant karbat, <vasant...@gmail.com> wrote:
आजच्या आधुनिक युगात अश्या घटना घडणे खूप वाईट आहे. मनूवादी मानसिकता याला कारणीभूत आहे. सरकारच मनूवादी असल्यामुळे तथाकथित सवर्ण फार माजले आहेत. आपला समाज देखील त्यांनाच निवडून देत आहे हे फार मनाला खटकते. 
         त्यांना अटक केली पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मनुवादी असल्याने लगेच जामिनावर सुटका करून घेतील . 

Vasavi Kiro

unread,
May 30, 2019, 5:38:28 AM5/30/19
to adi...@googlegroups.com
big protest was necessary. 

vasant karbat

unread,
May 30, 2019, 5:39:00 AM5/30/19
to adi...@googlegroups.com
आजच्या आधुनिक युगात अश्या घटना घडणे खूप वाईट आहे. मनूवादी मानसिकता याला कारणीभूत आहे. सरकारच मनूवादी असल्यामुळे तथाकथित सवर्ण फार माजले आहेत. आपला समाज देखील त्यांनाच निवडून देत आहे हे फार मनाला खटकते. 
         त्यांना अटक केली पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मनुवादी असल्याने लगेच जामिनावर सुटका करून घेतील . 

On Wed, 29 May 2019, 12:23 pm चेतन Chetan, <chet...@gmail.com> wrote:

Vasavi Kiro

unread,
May 30, 2019, 7:50:14 AM5/30/19
to adi...@googlegroups.com
YES OF COURSE. NEED TO ENCOUNTER AND ARGUED STRONGLY.

Dr. Pradeep Valvi

unread,
May 30, 2019, 8:34:11 AM5/30/19
to adi...@googlegroups.com
All adivasi leader busy in making money looting adivasi people and now election also over so their is no scope n time to waste  for them so they are enjoying their MP/MLA seat any we foolish people still elect them .. where is dr. heena gavit (M P) , adv. K.c padvi(mla), rajendra gavit (MP) other st leaders dr bharti pawar (mp). We don't need any other people to us our leaders are sufficient they are worst then  general people never stand with adivasi without any  reason . 5 years they doNt have reason also to stand for us. 

The mentality of general public changing due to change of centre politics what they wise is on the ground now .  Welcome to new India welcome back to our old ram rajya upper n lower caste system. 

You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

Bhavesh Lokhande

unread,
Jun 4, 2019, 5:20:48 AM6/4/19
to adi...@googlegroups.com

I am sure that this group have many people who are ex-bureaucrats,journalists, close aides of political figures,but still there is no strong action had been seen over the Dr Payal Tadavi institutional murder from AYUSH.

At least try to protest by announcing Dahanu/Palghar Band for a day by coordinating with like minded organizations.







--
Bhavesh Lokhande

ashvini maraskolhe

unread,
Jun 4, 2019, 5:22:30 AM6/4/19
to adi...@googlegroups.com
आजच्या आधुनिक युगात अश्या घटना घडणे खूप वाईट आहे. मनूवादी मानसिकता याला कारणीभूत आहे. सरकारच मनूवादी असल्यामुळे तथाकथित सवर्ण फार माजले आहेत. आपला समाज देखील त्यांनाच निवडून देत आहे हे फार मनाला खटकते. 
         त्यांना अटक केली पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मनुवादी असल्याने लगेच जामिनावर सुटका करून घेतील . 

mangeshsingh _Solankey Rashtriy Gadilohar Mahasabha

unread,
Jun 4, 2019, 8:06:47 AM6/4/19
to adi...@googlegroups.com
Shetji bhatji and Bubji these Rediculus Rats. ज्यादा से ज्यादा जानकारी हिंदी में भी share कीजिए

On Tue, Jun 4, 2019, 10:57 AM mangeshsingh _Solankey Rashtriy Gadilohar Mahasabha <shivr...@gmail.com> wrote:
Shame। SHAME। Shame


Who's had there rights but they couldn't use it but what about NTDNT they Are not yet  just in Race ...
  I m shocked if ST catogery getting reservation by  Contistution  with Budget 
  This now still There is condition 

mangeshsingh _Solankey Rashtriy Gadilohar Mahasabha

unread,
Jun 5, 2019, 12:15:43 AM6/5/19
to adi...@googlegroups.com
Shame। SHAME। Shame


Who's had there rights but they couldn't use it but what about NTDNT they Are not yet  just in Race ...
  I m shocked if ST catogery getting reservation by  Contistution  with Budget 
  This now still There is condition 

On Thu, May 30, 2019, 6:04 PM Dr. Pradeep Valvi <drprade...@gmail.com> wrote:

AYUSH adivasi yuva shakti

unread,
Jun 5, 2019, 6:16:02 AM6/5/19
to AYUSH | Adivasi Yuva Shakti

पायल तडवी प्रकरण खूप डोळे उघडणारे आहे. लवकरात लवकर यासाठी कारणीभूत असल्याना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. सगळी कडे तीव्र निषेध होतोय, प्रतिक्रिया उमटत आहेत.

शहरातील नामांकित महाविद्यालयात हि परिस्थिती आहे, तर इत्तर ठिकाणी काय असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
आदिवासींबद्दल महाविद्यालयात इत्तर विद्यार्थ्यांकडून कशी वागणूक मिळते हे बहुतेक सगळ्यांनी अनुभवलंय. इत्तर सगळ्यात जागरूकता होणे महत्वाचे आहेच पण समाज म्हणून आपली पण जबाबदारी आहे कि जर कुणी अशा परिस्थितीत असेल तर हक्काचे ठिकाण हवे जिथे त्याचे प्रश्न विश्वासाने सोडवले जातील.

आपण जर (संस्थात्मक किंवा सामाजिक) प्लॅटफॉर्म बनवू शकलो तर अशी अनेक प्रकरणे थांबवता येईल आणि अनेक उच्च शिक्षित आदिवासी युवक आपले शिक्षण अर्ध्यावर/अपूर्ण सोडणार नाहीत किंवा जीवनाचा अंत करणार नाहीत. ३ पातळीवर उपाय योजना महत्वाची वाटते सामान्य लोकांत आदिवासींबद्दल जागरूकता करणे, आदिवासी विद्यार्थ्यांत कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमता तयार करणे, कुणाला काही अडचण/संकट/अन्याय होत असल्यास विश्वासाने प्रश्न सोडविण्याचे ठिकाण तयार करणे आणि त्या विषयीची माहिती सगळ्यात पोचविणे.


गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघितल्यास तरुणांच्या आत्महत्या गंभीर विषय लक्षात येईल. कासा, तलासरी, डहाणू, पालघर, जव्हार येथील काही ताजी उदाहरणे डोळ्यांसमोर सहज येतील. कायमस्वरूपी उपाय साठी मार्गदर्शन व्हावे
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

Anil Davkhar

unread,
Jul 16, 2019, 1:34:08 PM7/16/19
to adi...@googlegroups.com

Nice work sir


--
Reply all
Reply to author
Forward
0 new messages