|| *आदिवासी कला केंद्राचे उदघाटन @ विवळवेढे* ||

9 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Oct 13, 2021, 12:19:55 PM10/13/21
to AYUSH google group
|| *आदिवासी कला केंद्राचे उदघाटन @ विवळवेढे* ||  

*स्थानिक भगत, तारपकरी, सोयीन, धवलेरी, सवासीन यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने उदघाटन करण्यात आले. या वेळेस गावातील मान्यवर, काही कलाकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पाहुणे उपस्थित होते.*

_आदिवासी कलाकरांना हस्तकला माध्यमातून आदिवासी कला संस्कृती आणि जीवनमूल्य विषयी जागरूकते सोबत आर्थिक स्वावलंबनासाठी आयुश मार्फत विविध उपक्रम राबविले जातात या माध्यमातून *महालक्ष्मी येथे येणाऱ्या पर्यटकांना/भाविकांना वारली चित्रकला तसेच इत्तर हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध करून आदिवासी कलाकारांना प्रोत्सहनासाठी आयुश कला केंद्र विवळवेढे येथे १० ऑक्टोबर रोजी उदघाटन करण्यात आले.* पालघर जिल्ह्यातील आयुश संपर्कात असलेल्या ५०० पेक्षा जास्त आदिवासी कलाकारांना या केंद्राच्या माध्यमातून लाभ मिळेल._
................................................................  
सोयीन - वेणी वरठा, धवलेरी - चांगुणा वांगडा, धवलेरी - शांती वरठा, सवासीन - कला सातवी, सवासीन -कमळा सातवी, भगत - लक्ष्मण कोरडा, लखू वसावले - तारपकरी यांच्या हस्ते उदघाटन करून नवीन पिढी समोर एक वेगळे उदाहरण तयार करण्यात आले आहे. जेणेकरून सांस्कृतिक दायित्व आणि सामाजिक व्यवस्थे विषयी नवीन पिढीत माहिती आणि जागरूकता होण्यास हातभार लागेल. 

नरेश भगत यांनी सूत्रसंचालन केले, सुरेंद्र वसावले यांनी सांस्कृतिक माहिती देऊन, स्वप्निल दिवे यांनी व्हिडीओ प्रेझेन्टेशन, सुचिता कामडी यांनी विशेष रांगोळी काढून, अजय बीज, बबिता वरठा पूनम चौरे यांनी कलावस्तू प्रदर्शन माध्यमातून उत्तम मांडणी केली होती.  

या कार्यक्रमाला माजी आदिवासी विकास राज्य मंत्री आणि पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांनी भेट देऊन कलावस्तू बघितल्या तसेच उपक्रमाविषयी माहिती घेऊन अयोग्य पद्धतीने थांबविले क्लस्टर पूर्ववत सुरु करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन दिले. 

या वेळेस सचिन सातवी, संचिता सातवी, डॉ अमित सातवी, बच्चू सातवी, सुनिता सातवी, सुनिल भुजड, मंगेश लिलका, जगन सातवी आणि नवीन कलाकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. *कार्यक्रमाचे फोटो* https://photos.app.goo.gl/qrEEEAP6EYpPmyse7 
................................................................ 
इच्छुकांनी नोंदणी करून उपक्रमात सहभागी व्हावे किंवा. तसेच आपण आणि संपर्कात महालक्ष्मीला गेल्यास नक्कीच केंद्राला भेट द्यावी. महामार्गावर गुजरात दिशेला जाताना उड्डाण पुलाच्या शेवट जवळच गाळा आहे. *नकाशा* - https://g.page/r/CbXJJ1jTck4uEAE ( *रिव्हिव्ह लिहावे* 💡). पारंपारिक ज्ञानातून आदिवासी समाजात आर्थिक स्वावलंबनाच्या पर्यायांना व्यापक स्वरूप देण्यासाठी समाज, स्वयंसेवक, CSR, शासन योजना इ. सहकार्याने सामाजिक उद्यामितेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.Let's do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!
_________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम 
💡 *उपक्रम फीडबॅक येथे नोंदवावा*

Avinash Patil_GMAIL

unread,
Oct 19, 2021, 1:34:27 AM10/19/21
to adi...@googlegroups.com

Good one , Appreciated Sachin and Aayush team.. best Wishes as always.

Regards,

Avinash

 

Sent from Mail for Windows

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0okxDf-A4OWVoa_W7DVgmZoT0Rwx77xuwyjS0ypEO5PA%40mail.gmail.com.

 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages