अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून शांत असलेल्या आदिवासींना पेटवू नका, असा खणखणीत इशारा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्याच आघाडी सरकारला दिला. विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही पिचडांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये, असा आघाडी सरकारला आज घरचा आहेर दिला. खऱ्या आदिवासी जमातीमधील बिगरआदिवासी जातींची घुसखोरी थांबविण्यासाठी विविध पक्ष- संघटनांतर्फे आयोजित केलेल्या आदिवासींच्या निर्धार मेळाव्यात हे दोन्ही नेते आज बोलत होते. पिचड म्हणाले, की "एसटी'मध्ये अन्य जातींचा समावेश करू नये यासाठी राज्यातील सर्व
आदिवासी आमदारांनी सनदशीर मार्गाने शासनाला निवेदने दिली आहेत. मात्र, आपल्या स्वाभिमानासाठी व आपल्या हक्कांसाठी सर्व आदिवासींनी जागरूक राहिले पाहिजे.
नव्याने होऊ घातलेला पालघर जिल्हा हा घटनेच्या सहाव्या सूचीनुसार स्वायत्त व्हायला हवा.
त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्राच्या विकासासाठी मदत
मिळेल आणि पुढच्या पिढीला स्वाभिमानी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. या समाजासाठी आज सर्व
आमदार व खासदार राजकारण सोडून एकत्र आले आहेत. वसंत पुरके म्हणाले, की आदिवासींच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण पाहता आजची रात्रच नव्हे, तर दिवसही वैराचा आहे
---------- Forwarded message ----------
From:
AYUSH Adivasi Yuva Shakti (Google+) <noreply-...@plus.google.com>
Date: Thu, Jun 19, 2014 at 9:41 PM
Subject: Shared a post - "नाशिक - अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा..."
To:
warli-pai...@pages.plusgoogle.com
AYUSH Adivasi Yuva Shakti shared a post.
|  |
 |
नाशिक - अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून शांत असलेल्या आदिवासींना पेटवू नका, असा खणखणीत इशारा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्याच आघाडी सरकारला दिला. विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही पिचडांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये, असा आघाडी सरकारला आज घरचा आहेर दिला. खऱ्या आदिवासी जमातीमधील बिगरआदिवासी जातींची घुसखोरी थांबविण्यासाठी विविध पक्ष- संघटनांतर्फे आयोजित केलेल्या आदिवासींच्या निर्धार मेळाव्यात हे...
|
You received this notification because AYUSH Adivasi Yuva Shakti was in a circle that you had subscribed to.
Unsubscribe from these emails.
Google Inc., 1600 Amphitheatre Pkwy, Mountain View, CA 94043 USA