||* वारली चित्रकला उपक्रम* : २/२/२०१९ ||
तुम्ही जवळ असल्यास नक्कीच भेट देवुन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे. आदिवासी सांस्कृतिक संपदा या बद्दल जागरूकता आणि स्वावलंबन मजबुतीसाठी प्रयत्न मजबूत करूया
१) काळाघोडा आर्ट फेस्टिवल, मुंबई
२ ते १० फेब्रुवारी, महा ट्राईब्स अंतर्गत स्टॉल वर प्रोडक्ट्स साठी संजय दा पऱ्हाड आणि कल्पेश गोवारी प्रतिनिधित्व करीत आहेत. महाराष्ट्रातील विविध कलाकृतींसाठी आदिवासी विकास विभागा तर्फे २ स्टॉल वर प्रदर्शित केले आहेत.
फोटो https://www.facebook.com/media/set/?set=a.2480607842009290&type=1&l=3d09d67b68
आदिवासी कालचक्र थीम आधारित साकारलेली ३D प्रतिमा प्रदर्शना साठी ठेवली आहे. या विषयी सविस्तर पुढच्या मेसेज मध्ये.
हि कलाकृती बाणवणताना चे फोटो https://www.facebook.com/media/set/?set=a.2481530805250327&type=1&l=4223029fa4
२) सुरजकुंड आर्ट फेस्टिवल, फरिदाबाद
Surajkund International Crafts Mela (Faridabad) by Haryana Tourism Department
१ ते १५ फेब्रुवारी, हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कमिशन आणि MTDC तर्फे संदीप दा भोईर, संदेश दा राजड यांचा एक स्टॉल आहे आणि TRTI मार्फत विजय दा वाडु आणि सोबतच्या इत्तर कलाकारांसाठी स्टॉल मिळावण्यासाठी संबंधित अधिकारी प्रयत्न करीत आहेत. या वर्षी महाराष्ट्रातून TRTI मार्फत अंदाजे ८० कलाकार सहभागी असावेत. कम्युनिकेशन ग्याप मुळे आधी आपण सुचवलेल्या ५ कलाकारांचे नाव अंतिम यादीत नव्हते, स्टॉल उपलबध झाल्यावर यातील कलाकार जाण्याचे ठरले आहे.
फोटो https://www.facebook.com/media/set/?set=a.2480672032002871&type=1&l=9fa6541500
३) चिक्कू फेस्टिवल, बोर्डी
२ ते ३ फेब्रुवारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत स्टॉल वर कलाकारांनी आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. जयवंत दा सोमण, श्रीनाथ दा झिरवा, कल्पेश दा वावरे, रोशन दा गवळी, रोहित दा गवळी, भागेश दा गोवारी, मुकेश दा धानप, मंगेश दा कडू, प्रताप दा सुमडा, कीर्ती ताई वरठा सहभागी झाले आहेत. प्रकल्प कार्यालयाकडून विविध गटांना स्टॉल देण्यात आले आहेत.
फोटो : https://www.facebook.com/media/set/?set=a.2480710401999034&type=1&l=b89f47343e
आदिवासी विकास निधीतुन आग्रहाने आदिवासी समाज हित जपणारा *तारपा महोत्सव सारखे कार्यक्रम होणे गरजेचे वाटते*, २०१४ सालीच्या तारपा महोत्सव विषयी येथे https://www.facebook.com/Tarpa.Mahotsav/ अधिक सविस्तर विश्लेषण वेगळ्या मेसेज मध्ये
४) लर्निंग अँड स्किल एक्स्पो, दिल्ली
Indian Engineering & Technology Trade Fair (Learning and Skill Expo 2019) by CII
३ ते ५ फेब, कॉन्फीडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तर्फे आयोजित डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशन अंतर्गत वारली चित्रकला GI साठी प्रदर्शनात अभिजित दा पिलेना प्रगती मैदान दिल्ली येथे सहभागी झाले आहेत. देश भरातून निवडक १० नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनी हँडीक्राफ्ट ना संधी मिळाली आहे.
फोटो : https://www.facebook.com/media/set/?set=a.2481777645225643&type=1&l=a6082684be
या अश्या अनेक कार्यक्रमात सहभागी झाल्यावर वेग वेगळ्या अनुभवातून हे लक्षात येतेय आदिवासी युवकांचे नियोजन बद्ध स्किल/कॉम्पिटन्सी, कम्युनिकेशन, मार्केटिंग मटेरियल, लीडरशिप, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापर, इत्यादी वाढवणे गरजेचे आहे. तसेच *शासकीय यंत्रणेत आदिवासी समाजा बद्दल ची संवेदना तयार करणे गरजेचे आहे*. जेणेकरून एकमेकांच्या समन्वयाने समाज हिताची अनेक कामे प्रभावी होऊ शकतात.
आपण आयुश तर्फे नवीन सुरु करण्यात येणाऱ्या उपक्रमात या साठी प्रयोग करणार आहोत. आपले मार्गदर्शन अपेक्षित.
जल जंगल जमीन जीव सोबत आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू प्रयत्न करूया. Lets do it together!
जोहार!
____________
आयुश फीडबॅक लिहा .how.adiyuva.in