|| माहिती: *वारली विश्व कला दालन उदघाटन* ||

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 19, 2020, 10:59:40 PM1/19/20
to AYUSH google group

|| माहिती: *वारली विश्व कला दालन उदघाटन* ||

आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्याने आदिवासी कलाकृती आणि कारागिरी च्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनासाठी *"आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम"* मार्फत पर्यटकांना, कार्यालय, सामान्य ग्राहक  यांना डहाणू येथे भेटवस्तू/कलाकृती सहज उपलब्ध व्हावे यासाठी *"वारली विश्व कला दालन"* सुरु करीत आहोत. आपली उपस्थिती आणि मार्गदर्शन अपेक्षित.

_सदर दालनाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्या मार्फत केले जाणार आहे._

*दिवस* : १७/१/२०१०, सकाळी 10.30 वाजता
*ठिकाण* : वारली विश्व कला दालन, शॉप क्रमांक ४, महालक्ष्मी प्लाझा, सागर नाका, डहाणू, जिल्हा पालघर

*Warli World - Tribal Art Store*
Gogle Map :https://g.page/Warliworld

_____________________________________
आयुश वारली चित्राला क्लस्टर निर्मिती उपक्रम

AYUSH main

unread,
Jan 19, 2020, 11:14:15 PM1/19/20
to AYUSH google group
*महासंमेलना दरम्यान आयुश स्टॉल ला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आभारी.* 
अक्षरशः सुरवाती पासून ते शेवटच्या दिवशी स्टॉल खोलून ठेवे पर्यंत स्टॉल वर व्हिजिटर्स होते. सतत पूर्णवेळ टिब्बल लाईन असल्याने अनेकांना विविध कलावस्तू पूर्ण बघायला मिळाल्या नसाव्यात कदाचित.

_विविध *सामाजिक/कार्यालयीन/कौटुंबिक कार्यक्रमात भेटवस्तू देण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी/सजावटी साठी आदिवासी कलाकृतींचा चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या बद्दल जागरूकता करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.* हे पर्याय वेवस्तीत तपासून घेता यावे यासाठी कायम स्वरूपाचे डहाणू येथे तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र सुरु करीत आहोत. आपल्या सवडीनुसार नक्कीच एकदा भेट देऊन  कलाकृतींना प्रोत्साहन द्यावे_

*वारली विश्व कला दालनाचे उदघाटन*

आज १७ जानेवारी २०२० रोजी सौरभ कटारिया, उप जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्या तर्फे उदघाटन करण्यात आले. पारंपरिक भगत यांच्याकडून पूजा करून, तारपा नृत्य सोबत आयुश टिम, समन्वयक, कलाकार प्रतिनिधी, क्वेस्ट मीडिया प्रतिनिधी, प्रकल्प कार्यालय कर्मचारी, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तारप्याच्या आवाजाने अनेक जण दालनाकडे उत्सुकतेने बघत होते. 

आदिवासी कलाकृतींना तालुक्याच्या ठिकाणी हक्काचा प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने. पर्यटक आणि ग्राहक यांना एका ठिकाणी विविध आदिवासी कलाकृती सुलभतेने मिळावे या साठी "आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम" मार्फत वारली विश्व कला दालन महत्वाची भूमिका पार पाडेल. 

बाजारपेठेत सरळ संपर्क आणि विविध मागण्या यांचा अभ्यास/निरीक्षण करून आवश्यक कलावस्तू निर्मितीला हातभार लावणे शक्य होईल. तसेच इंटरनेट,  कुरियर, स्टेशन जवळ चे ठिकाण इत्यादींमुळे ऑनलाईन ऑर्डर्स हाताळणे सोयीस्कर होईल. 

आदिवासी विकास विभाग यांच्या सहकार्याने, आदिवासी कलासंस्कृतीच्या माध्यमातुन रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनासाठी हातभार लावण्यासाठी "आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम" मार्फत प्रयत्न सुरु आहेत.  Let's do it together! जोहार 

_____________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम 
वारली विश्व (नकाशा): https://g.page/warli-world

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T25BkCBnWWUxV_URGvq9uOsyZ-z2umQdm0zE9cHg4dCZw%40mail.gmail.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages