|| *वारली चित्रकला उपक्रम* : ३१ ऑगस्ट २०२० ||

9 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Aug 31, 2020, 11:08:30 AM8/31/20
to AYUSH google group
|| *वारली चित्रकला उपक्रम* : ३१ ऑगस्ट २०२० ||

आपल्या माहितीसाठी उपक्रम माहिती.

*१) GI राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सहभाग* 
विषय : “Geographical Indications - Protection & Promotion in India”
२० ऑगस्ट रोजी, या कॉन्फरन्स मध्ये *"GI संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचे साधन"* या विषयावर आयुश तर्फे सचिन सातवी पेनॅलिस्ट म्हणून सहभाग घेतला. 
आयोजक : Department for Promotion of Industry and Internal Trade
(Ministry of Commerce and Industry)
Chair on IPR & CIPRA- *National Law School of India University,* Bangalore
In Association with GI Controller General of Patents, Designs & Trademarks, India.
   
*२) NCERT तर्फे १२ला हस्तकला विषयावर धडा*
स्थानिक हस्तकला विषयी एक धडा १२च्या पुस्तकात घेतला जातो आहे. यात धोकरा, पिठोरा, गोंड, तेरेकोटा, मधुबनी, मिथिला, पठचीत्र, पिचवयी चित्रकला सोबत वारली चित्रकलेचाही समावेश करण्यात आला आहे, त्या बद्दल *संबंधितांनी हाय रिझोल्युशन फोटो ची मागणी केली होती. आयुश तर्फे ते जमा करण्या आले.*     

*३) हस्तशिल्प विकास आयुक्तालय तर्फे शिबीर*
आयुश च्या नोंदणीकृत कलाकारांसाठी वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विकास आयुक्तालया मार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे. आयुक्तालयातील अधिकारी शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या *संपर्कातील सगळ्या कलाकारांना कळवून शिबिराचा लाभ घ्यावा* 
*दिवस* : ४ सप्टेंबर २०२०, शुक्रवार
*वेळ* : सकाळी १० ते २ पर्यंत
*ठिकाण* : आयुश वारली चित्रकला केंद्र खंबाळे, 
बिरसा मुंडा हाऊस शेजारी, ता डहाणू, जि पालघर https://g.page/Warlipaintingkhambale?share
*आयोजक* : Handicraft Development Commission, Ministry of Textile

*४) आदिवासी लोणचे चटणी निर्मिती*
करोनाच्या प्रभावामुळे हस्तकला क्षेत्र प्रभावित झाले आहे. आवश्यक पर्याय निर्मित म्हणून समन्वयक पुढाकार घेऊन आदिवासी चटणी, लोणचे चा उपक्रम सुरु करीत आहेत. फीडबॅक नुसार त्याला मोठे स्वरूप देण्यात येईल. सध्या *खारातले शिंद, करटोल, टेटवि, खारेशेंग माध्यमातून सुरवात केली आहे.* इच्छुक गटांना नमुना जमा करण्यास कळविले आहे. [COVID Response]

*५) पारंपरिक आदिवासी खेळणी निर्मिती*
पारंपरिक खेळणी निर्मिती विषयावर अभ्यास गट तयार करतो आहोत, सदर विषयात *रुची असलेल्यांनी आयुश समन्वयकांशी संपर्क साधावा.* कलाकारांसाठी पर्यायी उपक्रम नियोजन करतो आहोत. [COVID Response]

*६) आदिवासी उद्यमीता सशक्तीकरण प्रस्थाव* 
हस्तकला, वनोपज, शेती माध्यमातून *आदिवासी उद्यमीतेला हातभार लावण्यासाठी इन्होवेटिव्ह योजने अंतर्गत १० प्रस्थाव मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स ला जमा करण्यात आले.* ठाणे, पालघर जिल्हा (महाराष्ट्र), दादरा नगर हवेली, दमण दीव, वलसाड जिल्हा (गुजरात) या क्षेत्रासाठी उपक्रम प्रास्तवित केलेत. 

*पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मिती* आणि त्यातुन *आर्थिक स्वावलंबन* पर्याय मजबूत करूया. 
Lets do it together, जल जंगल जमिन जीव.... आदिवासीत्व, जोहार !

_____________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
Reply all
Reply to author
Forward
0 new messages