|| वैयक्तिक अनुभव :*कोरियातील ७वा आठवडा*||

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 2, 2023, 9:42:38 AM2/2/23
to AYUSH google group
_*"Artifical Intelligence will have a more profound impact on humanity than fire, electricity and the Internet"*_ - Sundar Pichai, Google CEO 

|| वैयक्तिक अनुभव :*कोरियातील ७वा आठवडा*||

▪️[स्थानिक *आदिवासी भाषा* : निहरी]
ते दिस आमचे हाफिसात ते दिस एक म्होटी मिटिंग झाली आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर, भलतां भारीं विषय आहे. येणारे १०-२० वरसात भलतां काहीं बदलल ते नुसार आपलीं कामा/नोकऱ्या हो गायचेन बदलातीलां, बेस तयारिं करून रेहुं. हलूं हलूं नवां सीकुन घेंव ना हारीं हारीं जुन्या बेस गोठी हो ठेंवू. बेस रेहा.  
 
▪️लल्लन टॉप (हिंदी, 12.17 मिनिटे)

▪️सुंदर पिचाई, (इंग्लिश, 12.55 मिनिटे)

▪️[साधारण *मराठी बोली* भाषा]
त्या दिवशी एक वर्कशॉप झाला, गेले वर्षभर AI वर काम अधिक सोप्पे कसे करता येईल याची प्रत्येक्ष उदाहरणे प्रत्येक टीम ने करून दाखवली. 

नंतर सहज उत्सुकता म्हणून मी काही टूल्स वापरून बघितले, खूप छान आहे. इंटरनेट वर खूप सारी माहिती उपलब्ध आहे, पण त्यातून आपल्यांना हवी ती मिळवण्यासाठी खूप सारे सर्च करावे लागते आणि चेक करावे लागते. पण एक उदाहरण घ्या chatGPT ला जे पाहिजे ते विचारले तर खुप्प छान पद्धतीने माहिती लगेच उपलब्ध करते. सहज उत्सुकता म्हणून टेक्निकल, इंजिअरिंग, आदिवासी, इत्यादी कोणत्याही *प्रश्नावर माझ्या पेक्षा खूप छान उत्तरे देत होते.* इम्प्रेसिव्ह! 😊👌🏻

AI सगळ्या गोष्टी बदलणारा विषय आहे. येणाऱ्या काही वर्षांत याचा प्रभाव जगभरा सगळ्या ठिकाणी दिसेल. 

▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡
तंत्रज्ञान, जीवनशैली, जीवनपद्धती वर्षानुवर्षांपासून बदलत आली आहे, बदलत राहील. *वातावरणानुसार आवश्यक बदल करणे निसर्ग नियम आहे,* आणि हे आपण आदिवासी पिढ्या न पिढ्या जाणतो आहोत. म्हणून तर लिखित धर्मग्रंथापेक्षा प्रत्येक्ष आचरणात/मौखिक साहित्यात असलेली *आदिवासी जीवन मूल्य पूर्वी, सध्या आणि भविष्यात हि सगळ्यांसाठी (खासकरून निसर्ग, पर्यावरण व जिवश्रृष्ठी) अनुकूल/मार्गदर्शक ठरत आहेत.*

असो, सध्याच्या आधुनिक व्याख्येत आदिवासी *विध्यार्थी/युवक यांना आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक तयारी/वातावरण पुरेसे वाटत नाही.* जग AI वापरून बिजिनेस मॉडेल/नोकऱ्या/कामे उलथे पालथे करायची तयारी करत आहेत. आणि आपले युवक अजून स्वतःच्या पायावर उभे राहणायसाठी धडपडत असतील तर प्रथिकतेने *समाज म्हणून एकत्र उभे राहून त्यांना पाठबळ/प्रोत्साहन देणारे वातावरण* बनवायला हवे. 

यासाठी *समाजातून वातावरणात, युवकांमध्ये आवश्यक जागरूकता, सोबत योग्य प्रतिनिधीत्व/नेतृत्वाला पुढाकार* देऊन आणि त्या मार्फत *व्यवस्थेमध्ये संवेदना जागृत* करणे महत्वाचे वाटते. तुम्हाला काय वाटते? काही करता येईल?🤔 Let’s do it together! जोहार
Reply all
Reply to author
Forward
0 new messages